व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट १८क

येणाऱ्‍या मोठ्या युद्धाबद्दल यहोवा इशारा देतो

येणाऱ्‍या मोठ्या युद्धाबद्दल यहोवा इशारा देतो

बायबलच्या अनेक भविष्यवाण्यांमध्ये एका शेवटच्या युद्धाबद्दल सांगितलं आहे. या युद्धात यहोवा, त्याचा आणि त्याच्या लोकांचा विरोध करणाऱ्‍या सगळ्यांचा नाश करेल. त्या भविष्यवाण्यांमधल्या काही खाली दिलेल्या आहेत. या इशाऱ्‍यांमध्ये कोणत्या समानता आहेत हे पाहा. या भविष्यवाण्यांवरून आपल्याला हेसुद्धा कळेल, की सगळ्या मानवजातीला हे इशारे ऐकता यावेत आणि त्यांप्रमाणे वागण्याची संधी मिळावी याची यहोवाने खातरी केली आहे.

प्राचीन इस्राएलच्या काळात

यहेज्केल: “सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘मी माझ्या सगळ्या डोंगरांवर गोगच्या विरोधात तलवार चालवायचा हुकूम देईन.’”​—यहे. ३८:१८-२३.

यिर्मया: “[यहोवा] स्वतः सगळ्या लोकांचा न्याय करेल, आणि दुष्टांना तलवारीच्या हवाली करेल.”​—यिर्म. २५:३१-३३.

दानीएल: ‘स्वर्गाचा देव एक असं राज्य स्थापन करेल [जे] या सगळ्या राज्यांचा चुराडा करून त्यांचा नाश करेल.’​—दानी. २:४४.

इ.स. पहिल्या शतकात

येशू: “जगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आलं नाही . . . असं मोठं संकट येईल.”​—मत्त २४:२१, २२.

पौल: ‘येशू आपल्या शक्‍तिशाली स्वर्गदूतांसोबत प्रकट होईल आणि जे देवाला ओळखत नाहीत त्यांचा तो सूड घेईल.’​—२ थेस्सलनी. १:६-९.

पेत्र: “यहोवाचा दिवस चोरासारखा येईल, . . . [आणि] पृथ्वी आणि तिच्यातली सगळी कार्यं उघड होतील.”​—२ पेत्र ३:१०.

योहान: “राष्ट्रांना मारण्यासाठी [येशूच्या] तोंडातून एक लांब, धारदार तलवार निघते.”​—प्रकटी. १९:११-१८.

आजच्या काळात

जगाच्या इतिहासात, बायबल हे सर्वात जास्त भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलेलं आणि सर्वात जास्त वाटप करण्यात आलेलं पुस्तक आहे

आजच्या काळातले यहोवाचे सेवक . . .

  • बायबलवर आधारित असलेल्या साहित्याच्या करोडो प्रतींचं वाटप करतात. हे साहित्य शेकडो भाषांमध्ये उपलब्ध आहे

  • दरवर्षी करोडो तास प्रचार करण्यासाठी खर्च करतात

अध्याय १८, परिच्छेद १३, १४ वर परत जाण्यासाठी