व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट २१क

“जमिनीतून काही भाग दान म्हणून वेगळा काढा”

“जमिनीतून काही भाग दान म्हणून वेगळा काढा”

यहेज्केल ४८:८

चला, यहेज्केलसोबत जाऊ आणि यहोवाने जो जमिनीचा पट्टा वेगळा काढला तो जरा जवळून पाहू या. जमिनीच्या या पट्ट्याचे पाच भाग करण्यात आले. ते पाच भाग कोणते आहेत? आणि ते कशासाठी आहेत?

१. ‘दान म्हणून वेगळा काढलेला भाग’ (जमिनीचा पट्टा)

हा भाग सरकारी कामासाठी आहे आणि याला “प्रशासनाचा भाग” म्हटलं आहे.

यहे. ४८:८

२. ‘दान केलेल्या जमिनीचा संपूर्ण भाग’

हा भाग याजकांसाठी, लेव्यांसाठी आणि शहरासाठी वेगळा ठेवण्यात आला आहे. त्यासोबतच, सगळ्या १२ वंशांमधून लोक यहोवाची उपासना करण्यासाठी आणि शहराच्या कामांमध्ये मदत करण्यासाठी या भागात येतात.

यहे. ४८:२०

३. ‘प्रधानासाठी जमीन’

“इस्राएलमध्ये प्रधानाचा हा वाटा असेल.” “तो . . . प्रधानासाठी असेल.”

यहे. ४५:७, ८; ४८:२१, २२

४. ‘पवित्र दान’

या भागाला ‘पवित्र भागही’ म्हटलं जातं. यातला वरचा भाग “लेव्यांसाठी” आहे. तो ‘भाग पवित्र’ आहे. मधला भाग, “याजकांसाठी पवित्र दान” आहे. हा “त्यांच्या घरादारांसाठी आणि मंदिराच्या पवित्र ठिकाणासाठी आहे.”

यहे. ४५:१-५; ४८:९-१४

५. “उरलेला भाग”

हा भाग ‘इस्राएलच्या संपूर्ण घराण्यासाठी’ आहे. हा “सार्वजनिक भाग असून त्याचा वापर घरांसाठी आणि कुरणांसाठी” करायचा आहे.

यहे. ४५:६; ४८:१५-१९

अध्याय २१, परिच्छेद ३ वर परत जाण्यासाठी