व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास ३

प्रश्‍नांचा उपयोग

प्रश्‍नांचा उपयोग

मत्तय १६:१३-१६

सारांश: आवड वाढवण्यासाठी, आवड टिकवून ठेवण्यासाठी, ऐकणाऱ्‍यांसोबत तर्क करण्यासाठी आणि मुख्य मुद्द्‌यांवर जोर देण्यासाठी व्यवहारकुशलतेने प्रश्‍नांचा उपयोग करा.

हे कसं कराल:

  • आवड वाढवा आणि ती टिकवून ठेवा. असे प्रश्‍न विचारा ज्यामुळे ऐकणारे लोक तुम्ही सांगितलेल्या मुद्द्‌यावर विचार करायला लागतील किंवा मग त्यांच्या मनात उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता वाढेल.

  • तर्क करा. असे प्रश्‍न विचारा ज्यामुळे लोक विषयाबद्दल मनातल्या मनात तर्क करतील आणि मग ते स्वतःच योग्य निष्कर्ष काढतील.

  • मुख्य मुद्द्‌यांवर जोर द्या. एखादा मुख्य मुद्दा सांगण्याआधी, उत्सुकता वाढेल असा प्रश्‍न विचारा. महत्त्वपूर्ण मुद्द्‌यावर चर्चा केल्यानंतर किंवा तुमच्या सादरतेची समाप्ती करताना उजळणी प्रश्‍न विचारा.