व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास ५

अचूक वाचन

अचूक वाचन

१ तीमथ्य ४:१३

सारांश: जे लिहिलं आहे ते मोठ्याने व अचूक वाचा.

हे कसं कराल:

  • चांगली तयारी करा. हा उतारा का लिहिला होता त्यावर विचार करा. फक्‍त एकेक शब्द नव्हे तर शब्दसमूह वाचण्याचा सराव करा. वाचताना आणखी शब्द टाकून वाचणं, शब्द गाळणं किंवा जो शब्द लिहिला आहे त्याच्याऐवजी दुसरा शब्द टाकून वाचण्याचं टाळा. वाचताना सर्व विरामचिन्हांकडे लक्ष द्या.

  • प्रत्येक शब्दाचा उच्चार योग्य प्रकारे करा. एखाद्या शब्दाचा उच्चार कसा करायचा हे माहीत नसेल तर डिक्शनरीत पाहा. किंवा त्या प्रकाशनाचं ऑडियो रेकॉर्डिंग असेल तर ते ऐका किंवा एखाद्या चांगल्या वाचकाची मदत घ्या.

  • स्पष्ट बोला. शब्दांचा योग्य उच्चार करा. खाली न बघता समोर बघून आणि तोंड उघडून वाचा. प्रत्येक शब्द स्पष्टपणे वाचण्याचा प्रयत्न करा.