व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास १३

व्यावहारिक फायदे स्पष्ट करा

व्यावहारिक फायदे स्पष्ट करा

नीतिसूत्रे ३:२१

सारांश: श्रोत्यांना हे समजायला मदत करा, की तुम्ही सांगत असलेल्या विषयाचा त्यांच्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो. आणि ते आपल्या जीवनात शिकत असलेल्या गोष्टींचं पालन कसं करू शकतात तेही त्यांना दाखवा.

हे कसं कराल:

  • श्रोत्यांचा विचार करा. तुम्ही सांगत असलेली माहिती त्यांनी का ऐकली पाहिजे यावर विचार करा. आणि त्यांना कोणत्या माहितीचा जास्त फायदा होऊ शकतो यावरही विचार करा.

  • श्रोत्यांनी काय केलं पाहिजे हे तुमच्या संपूर्ण सादरतेत सांगत राहा. तुम्ही बोलायला सुरुवात करता तेव्हापासूनच श्रोत्यांना ‘ही माहिती माझ्यासाठीच आहे,’ असं वाटलं पाहिजे. आणि मग प्रत्येक मुख्य मुद्दा समजावून सांगताना तो कसा लागू करायचा ते दाखवा. लागू करण्यासाठी विशिष्ट मुद्दे सांगा.