व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास १४

मुख्य मुद्द्‌यांवर जोर द्या

मुख्य मुद्द्‌यांवर जोर द्या

इब्री लोकांना ८:१

सारांश: भाषण देताना श्रोत्यांना तुम्ही सांगत असलेली माहिती समजण्यास मदत करा. आणि प्रत्येक मुद्दा तुमच्या भाषणाच्या उद्देशाशी व विषयाशी कसा संबंधित आहे ते स्पष्ट करा.

हे कसं कराल:

  • भाषणाचा उद्देश ठरवा. तुम्ही सादर करत असलेलं भाषण माहिती देण्यासाठी आहे, खातरी पटवण्यासाठी की श्रोत्यांना कार्य करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आहे याचा विचार करा आणि त्यानुसार ते तयार करा. सर्व मुख्य मुद्दे तुम्हाला तुमच्या भाषणाचा उद्देश साध्य करण्यास मदत करत आहेत याची खातरी करा.

  • भाषणाच्या विषयावर जोर द्या. संपूर्ण भाषणादरम्यान मुख्य शब्दांचा किंवा समानार्थी शब्दांचा अधूनमधून उल्लेख करून भाषणाचा विषय सांगा.

  • मुख्य मुद्दे स्पष्ट व सोप्या पद्धतीने सांगा. तुमच्या विषयाला लागू होणारे मुख्य मुद्देच निवडा ज्यामुळे तुम्ही भाषणासाठी असलेल्या वेळेतच ते प्रभावी पद्धतीने मांडू शकाल. मुख्य मुद्दे कमीच ठेवा. प्रत्येक मुख्य मुद्दा स्पष्टपणे सांगा. एक मुद्दा सांगून झाल्यावर थांबा. आणि एका मुद्द्‌यावरून दुसऱ्‍या मुद्द्‌यावर जाताना त्यांतील संबंध सांगा.