व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास १७

इतरांना समजायला सोपं

इतरांना समजायला सोपं

१ करिंथकर १४:९

सारांश: लोकांना तुम्ही सांगत असलेला संदेश समजायला मदत करा.

हे कसं कराल:

  • तुम्ही सादर करणार असलेल्या माहितीचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. तुमचा विषय तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे समजून घेतला पाहिजे की तो तुम्हाला साध्या-सोप्या व स्वतःच्या शब्दांत सांगता येईल.

  • छोटी व सोपी वाक्यं बोला. कधीकधी लांबलचक वाक्यं बोलली तर चालतील; पण मुख्य मुद्दे छोट्या वाक्यांत व थोडक्या शब्दांत व्यक्‍त करणं आणखी उत्तम असेल.

  • कठीण शब्द समजावून सांगा. लोकांना माहीत नसलेले शब्द कमी वापरा. तुम्हाला एखादा शब्द, बायबलमधील एखाद्याचं नाव किंवा जुन्या काळातलं मोजमाप अथवा प्रथा यांविषयी सांगावं लागणार असेल तर त्यांचं स्पष्टीकरण द्या.