व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास १८

श्रोत्यांना शिकता येईल अशी माहिती

श्रोत्यांना शिकता येईल अशी माहिती

१ करिंथकर ९:१९-२३

सारांश: श्रोत्यांच्या विचारांना चालना द्या. ते ऐकत असलेल्या विषयावर त्यांना विचार करायला लावा. त्यामुळे आपण काहीतरी महत्त्वाचं शिकलो असं त्यांना वाटेल.

हे कसं कराल:

  • श्रोत्यांकडे आधीच कोणती माहिती आहे याचा विचार करा. त्यांनी आधी ज्या गोष्टी ऐकल्या आहेत त्याच पुन्हा सांगण्याऐवजी त्या विषयाकडे आता एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास त्यांना मदत करा.

  • संशोधन आणि मनन करा. मुख्य मुद्दे समजावून सांगताना श्रोत्यांनी फार कमी वेळा ऐकले असतील अशा मुद्यांचा किंवा चालू घडामोडींचा उल्लेख तुम्ही करू शकता. तुम्ही सादर करत असलेल्या माहितीवर खोलवर विचार करा. आणि ही माहिती व तुम्ही जे मुद्दे सादर करण्याचं ठरवलं आहे त्यात काय संबंध आहे यावरही विचार करा.

  • तुम्ही सांगत असलेल्या संदेशाचा फायदा सांगा. बायबलवर आधारित असलेल्या मुद्द्‌यांचा, श्रोत्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात कसा फायदा होऊ शकतो ते समजावून सांगा. श्रोत्यांना लागू होणाऱ्‍या विशिष्ट परिस्थितींबद्दल चर्चा करा. तसंच त्यांनी कशी मनोवृत्ती दाखवली पाहिजे आणि कोणती कार्यं केली पाहिजेत यांवर चर्चा करा.