व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास २०

प्रभावी समाप्ती

प्रभावी समाप्ती

उपदेशक १२:१३, १४

सारांश: सादरीकरणाच्या समाप्तीला शिकलेल्या गोष्टी स्वीकारून त्या आपल्या जीवनात लागू करण्याचं श्रोत्यांना उत्तेजन द्या.

हे कसं कराल:

  • समाप्तीला तुमच्या संपूर्ण भाषणाच्या विषयाशी जोडा. समाप्तीला पुन्हा एकदा तुमच्या भाषणाचा मुख्य विषय आणि मुख्य मुद्दे यांचा उल्लेख करा.

  • श्रोत्यांना कार्य करण्याचं उत्तेजन द्या. आता त्यांनी काय केलं पाहिजे व असं का केलं पाहिजे त्याची ठोस कारणं त्यांना द्या. मनापासून आणि खातरीने बोला.

  • समाप्ती सोपी आणि संक्षिप्त ठेवा. समाप्तीला नवीन मुद्दे सांगू नका. गरजेनुसार थोडक्यातच श्रोत्यांना कार्य करण्याचं पुन्हा एकदा उत्तेजन द्या.