व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ०८

तुम्ही यहोवाशी मैत्री करू शकता!

तुम्ही यहोवाशी मैत्री करू शकता!

यहोवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या गुणांबद्दल, त्याच्या कामांबद्दल आणि मानवांसाठी तो काय करणार आहे, याबद्दल जाणून घ्यावं. कारण त्याला माहीत आहे, की तुम्ही याबद्दल जितकं जास्त जाणून घ्याल तितकी तुम्हाला त्याच्याशी मैत्री करावीशी वाटेल. पण देवाशी मैत्री करणं खरंच शक्य आहे का? (स्तोत्र २५:१४ वाचा.) देवाशी मैत्री करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? आणि यहोवाच तुमचा सगळ्यात चांगला मित्र आहे असं का म्हणता येईल? बायबल या प्रश्‍नांची उत्तरं देतं.

१. यहोवा तुम्हाला काय करायचं प्रोत्साहन देतो?

“देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.” (याकोब ४:८) पण याचा काय अर्थ होतो? इथे यहोवा तुम्हाला त्याच्याशी मैत्री करायचं प्रोत्साहन देतोय. काही जण म्हणतील, की ‘आपण तर देवाला पाहू शकत नाही, मग त्याच्याशी मैत्री कशी करायची?’ हे खरंय की आपण यहोवाला पाहू शकत नाही. पण त्याने त्याच्या वचनात म्हणजे बायबलमध्ये स्वतःबद्दल बरीच माहिती सांगितली आहे. आणि यामुळे आपण त्याच्याशी जवळचं नातं जोडू शकतो. यहोवा बायबलद्वारे आपल्याशी बोलतो. आणि म्हणून, आपण जरी त्याला पाहिलेलं नसलं, तरी बायबल वाचल्यामुळे त्याच्यासोबतची आपली मैत्री वाढत जाते.

२. यहोवापेक्षा चांगला मित्र असूच शकत नाही, असं का म्हणता येईल?

यहोवा तुमच्यावर जितकं प्रेम करतो, तितकं कोणीही करू शकत नाही. तुम्ही आनंदी असावं असं त्याला वाटतं. आणि तुम्हाला जेव्हाही मदतीची गरज असते, तेव्हा तो मदत करायला तयार असतो. बायबल म्हणतं, “सगळ्या चिंता त्याच्यावर टाकून द्या, कारण त्याला तुमची काळजी आहे.” (१ पेत्र ५:७) यहोवा नेहमी त्याच्या मित्रांच्या पाठीशी उभा राहून त्यांना सांत्वन देतो आणि त्यांचं ऐकून घ्यायला तयार असतो.​—स्तोत्र ९४:१८, १९ वाचा.

३. यहोवा कशा प्रकारच्या लोकांशी मैत्री करतो?

यहोवा सगळ्यांवर प्रेम करतो, “पण सरळ माणसाशी त्याची जवळची मैत्री असते.” (नीतिवचनं ३:३२) यहोवा अशा लोकांशी मैत्री करतो, जे त्याच्या दृष्टीने योग्य ते करतात आणि त्याला न आवडणाऱ्‍या गोष्टींपासून दूर राहतात. काहींना भीती वाटते, की यहोवाच्या अपेक्षा पूर्ण करणं त्यांना जमणार नाही. पण यहोवाचं मन खूप मोठं आहे. जे त्याच्यावर मनापासून प्रेम करतात आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागायचा होईल तितका प्रयत्न करतात, त्यांच्याशी मैत्री करायला तो तयार असतो.​—स्तोत्र १४७:११; प्रेषितांची कार्यं १०:३४, ३५.

आणखी जाणून घेऊ या

तुम्ही यहोवाशी मैत्री कशी करू शकता? आणि यहोवापेक्षा चांगला मित्र असूच शकत नाही, असं का म्हणता येईल, हे जाणून घेऊ या.

४. अब्राहाम यहोवाचा मित्र होता

बायबलमध्ये अब्राहाम (किंवा अब्राम) नावाच्या एका माणसाबद्दल सांगितलंय. त्याच्या अहवालातून देवाशी मैत्री करण्याचा काय अर्थ होतो हे आपल्याला कळतं. उत्पत्ती १२:१-४ मध्ये अब्राहामबद्दल वाचा. मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • यहोवाने अब्राहामला काय करायला सांगितलं?

  • यहोवाने त्याला काय वचन दिलं?

  • यहोवाने अब्राहामला काही सूचना दिल्या तेव्हा त्याने काय केलं?

५. यहोवा आपल्या मित्रांकडून काय अपेक्षा करतो?

सहसा, आपल्या मित्रांकडून आपल्या काही अपेक्षा असतात.

  • तुमच्या मित्रांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?

१ योहान ५:३ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • आपण काय करावं अशी यहोवाची अपेक्षा आहे?

यहोवाची आज्ञा पाळण्यासाठी आपल्याला आपल्या वागण्या-बोलण्यात किंवा स्वभावात कदाचित काही बदल करावे लागतील. यशया ४८:१७, १८ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • यहोवा आपल्या मित्रांना आपल्या आज्ञा पाळायला का सांगतो?

एक चांगला मित्र नेहमी अशा गोष्टींची आठवण करून देईल, ज्यांमुळे आपलं भलं होईल. यहोवाही त्याच्या मित्रांसाठी हेच करतो

६. जे यहोवाशी मैत्री करतात त्यांची साथ तो सोडत नाही

यहोवा त्यांना समस्यांचा सामना करायला मदत करतो. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • नकारात्मक विचारांशी आणि भावनांशी लढायला यहोवाने या स्त्रीला कशी मदत केली?

यशया ४१:१०, १३ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • यहोवाने आपल्या सगळ्या मित्रांना कोणतं वचन दिलंय?

  • यहोवा एक चांगला मित्र आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि तुम्हाला असं का वाटतं?

चांगला मित्र गरजेच्या वेळी मदत करतो. यहोवाही तुम्हाला अशीच मदत करेल

७. आपण यहोवाशी बोललं पाहिजे आणि त्याचं ऐकलं पाहिजे

मित्र एकमेकांशी बोलतात आणि एकमेकांचं ऐकतात, तेव्हा त्यांची मैत्री घट्ट होते. स्तोत्र ८६:६, ११ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • आपण यहोवाशी कसं बोलू शकतो?

  • यहोवा आपल्याशी कसं बोलतो?

आपण प्रार्थनेत यहोवाशी बोलतो; आणि तो आपल्याशी बायबलद्वारे बोलतो

काही जण म्हणतात: “मैत्री? आणि देवाशी? शक्यच नाही!”

  • आपण यहोवाशी मैत्री करू शकतो हे एखाद्याला सांगण्यासाठी तुम्ही कोणतं वचन दाखवाल?

थोडक्यात

यहोवाला तुमच्याशी मैत्री करायची आहे आणि तो तुम्हाला त्याच्याशी जवळचं नातं जोडायला मदत करेल.

उजळणी

  • यहोवा आपल्या मित्रांना कशी मदत करतो?

  • यहोवा आपल्या मित्रांना काही बदल करायला का सांगतो?

  • यहोवा खूप जास्त अपेक्षा करतो असं तुम्हाला वाटतं का? आणि तुम्हाला असं का वाटतं?

ध्येय

हेसुद्धा पाहा

यहोवाशी मैत्री केल्यामुळे तुमचं जीवन कसं बदलू शकतं?

“यहोवा जाणण्यायोग्य देव” (टेहळणी बुरूज, १५ फेब्रुवारी, २००३)

देवासोबत मैत्री कशी करायची हे जाणून घ्या.

“मैं परमेश्‍वर से दोस्ती कैसे कर सकता हूँ?” (ऑनलाईन लेख)

यहोवाशी मैत्री केल्यामुळे एका स्त्रीचं जीवन कसं सुधारलं, हे पाहा.

“मला मरण नको होतं!” (टेहळणी बुरूज क्र. १ २०१७)

काही तरुणांना यहोवाबद्दल काय वाटतं हे त्यांच्याच तोंडून ऐका.

देवाशी मैत्री करणं म्हणजे नेमकं काय?  (१:४६)