व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा १२

बायबलचा अभ्यास करत राहायला तुम्हाला कशामुळे मदत होईल?

बायबलचा अभ्यास करत राहायला तुम्हाला कशामुळे मदत होईल?

बायबलचा अभ्यास करणं हा एक आनंद देणारा प्रवास आहे. पण हा प्रवास नेहमीच सोपा असेल असं नाही. कधीकधी तर, हा अभ्यास असाच पुढे चालू ठेवता येईल का, असं तुम्हाला वाटेल. पण अडचणी असूनसुद्धा बायबलचा अभ्यास करत राहायला तुम्हाला कशामुळे मदत मिळेल? आणि यासाठी होईल तितके प्रयत्न करणं का महत्त्वाचं आहे?

१. आपण बायबलचा अभ्यास का केला पाहिजे?

“देवाचं वचन जिवंत आणि प्रभावशाली आहे.” (इब्री लोकांना ४:१२) आपण बायबलचा अभ्यास केला पाहिजे, कारण त्यातून आपल्याला देवाचे विचार आणि त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे कळतं. या अभ्यासामुळे ज्ञान तर मिळतंच, पण यासोबतच आपलं जीवन सुधारतं आणि भविष्यासाठी आशाही मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे तुम्हाला यहोवाशी मैत्री करता येईल. खरंच, बायबलचा अभ्यास केल्यामुळे तुमच्या जीवनावर खूप चांगला प्रभाव पडेल.

२. बायबलमधल्या सत्यांचं मोल ओळखणं का महत्त्वाचं आहे?

बायबलमधली सत्यं मौल्यवान रत्नांसारखी आहेत. म्हणूनच बायबल म्हणतं, सत्यं “विकत घे; त्यांना विकू नकोस.” (नीतिवचनं २३:२३) बायबलची सत्यं किती मौल्यवान आहेत हे आपण नेहमी आठवणीत ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपल्यासमोर कितीही अडचणी आल्या, तरी बायबल अभ्यास करण्यासाठी आपण मेहनत घेत राहू.​—नीतिवचनं २:४, ५ वाचा.

३. अभ्यास चालू ठेवण्यासाठी यहोवा तुम्हाला कशी मदत करेल?

आपला निर्माणकर्ता यहोवा, सर्वशक्‍तिमान आहे. तसंच तो एका जवळच्या मित्रासारखा आहे. आणि म्हणून त्याच्याबद्दल शिकून घेण्यासाठी तो आपल्याला मदत करायला तयार आहे. यासाठी तो आपल्याला ‘इच्छा आणि ताकदही’ देतो. (फिलिप्पैकर २:१३ वाचा.) कधीकधी तुम्हाला अभ्यास करावासा वाटणार नाही किंवा शिकलेल्या गोष्टींप्रमाणे वागणं तुम्हाला कठीण जाईल. अशा वेळी यहोवा तुमच्या मनात ती इच्छा निर्माण करू शकतो. तसंच, तुमच्यासमोर अडचणी येतात किंवा विरोध होतो, तेव्हा त्यांचा सामना करण्यासाठी लागणारी ताकद तो तुम्हाला देऊ शकतो. म्हणून यहोवाला नेहमी प्रार्थना करा आणि बायबलचा अभ्यास चालू ठेवण्यासाठी त्याला मदत मागत राहा.​—१ थेस्सलनीकाकर ५:१७.

आणखी जाणून घेऊ या

वेळ काढणं कठीण असलं किंवा विरोध होत असला, तरी तुम्ही बायबल अभ्यास कसा चालू ठेवू शकता हे जाणून घेऊ या. आणि असं करायला यहोवा तुम्हाला कशी मदत करेल हेही पाहू या.

४. बायबल अभ्यासाला महत्त्व द्या

आजच्या धकाधकीच्या जीवनात कधीकधी आपल्याला वाटू शकतं की आपल्याकडे बायबल अभ्यास करायला वेळच नाही. मग अशा वेळी आपण काय करू शकतो? फिलिप्पैकर १:१० वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • तुमच्या मते जीवनात कोणत्या गोष्टी “जास्त महत्त्वाच्या” आहेत?

  • बायबल अभ्यास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता?

  1. १. बादलीत रेती टाकली आणि मग दगड टाकले तर ते मावणार नाहीत

  2. २. पण आधी दगड टाकले तर जवळजवळ सगळी रेती मावेल. तसंच, जर तुम्ही “जास्त महत्त्वाच्या” गोष्टी आधी केल्या तर त्या करण्यासोबतच इतर गोष्टींसाठीही तुमच्याकडे वेळ राहील

आपल्या सगळ्यांमध्ये देवाला जाणून घ्यायची आणि त्याची उपासना करायची भूक असते. आणि ही भूक आपण बायबल अभ्यास करण्याद्वारे भागवू शकतो. मत्तय ५:३ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • बायबल अभ्यासाला महत्त्व दिल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो?

५. विरोध झाला तरी हार मानू नका

कधीकधी काही जण तुम्हाला बायबल अभ्यास करण्यापासून रोखायचा प्रयत्न करतील. फ्रांचेस्कोचं उदाहरण पाहू या. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • फ्रांचेस्कोने तो शिकत असलेल्या गोष्टी आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला सांगितल्या तेव्हा त्यांना कसं वाटलं?

  • हार न मानल्यामुळे त्याला कोणते आशीर्वाद मिळाले?

२ तीमथ्य २:२४, २५ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • तुम्ही जे शिकताय त्याबद्दल तुमच्या घरच्यांना आणि मित्रांना काय वाटतं?

  • तुम्ही बायबल शिकताय यावरून काही जण नाराज झाले, तरी या वचनांप्रमाणे तुम्ही काय केलं पाहिजे? आणि का?

६. यहोवा तुम्हाला नक्की मदत करेल!

यहोवासोबत आपली मैत्री जसजशी घट्ट होते, तसतसं आपल्याला त्याच्या इच्छेप्रमाणे वागावंसं वाटतं. पण तरी कधीकधी आपल्याला स्वतःमध्ये बदल करणं कठीण जाऊ शकतं. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर निराश होऊ नका. यहोवा तुम्हाला मदत करेल. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी जिमने स्वतःमध्ये कोणते बदल केले?

  • जिमच्या अनुभवात तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं?

इब्री लोकांना ११:६ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • यहोवाचा “मनापासून शोध घेणाऱ्‍यांना,” म्हणजेच त्याच्याबद्दल शिकून त्याच्या इच्छेप्रमाणे वागायचा प्रयत्न करणाऱ्‍यांना तो कशी मदत करतो?

  • या वचनाप्रमाणे, बायबल अभ्यासासाठी तुम्ही जी मेहनत घेत आहात ती पाहून यहोवाला कसं वाटतं?

कदाचित कोणी विचारेल: “बायबलचा अभ्यास करून काय मिळणारए?”

  • तुम्ही त्यांना काय सांगाल?

थोडक्यात

बायबलचा अभ्यास करणं नेहमीच सोपं नसलं, तरी त्यामुळे तुम्हाला कायम जीवनाचा आनंद घेणं शक्य होईल. यहोवावर नेहमी भरवसा ठेवा म्हणजे तो तुम्हाला आशीर्वाद देईल.

उजळणी

  • बायबलची सत्यं मौल्यवान आहेत असं तुम्हाला का वाटतं?

  • बायबलचा अभ्यास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता?

  • बायबल अभ्यास करत राहायला तुम्ही यहोवाकडे मदत का मागितली पाहिजे?

ध्येय

हेसुद्धा पाहा

वेळेचा चांगला उपयोग करण्यासाठी मदत करणाऱ्‍या चार गोष्टी पाहा.

“कीमती वक्‍त​—उसका सही खर्च” (सजग होइए!,  अप्रैल-जून २०१४)

पतीने विरोध केला तरी यहोवाने एका स्त्रीला त्याची उपासना करायला कशी मदत केली ते पाहा.

आपला भार उचलण्यासाठी यहोवा आपल्याला बळ देतो  (५:०५)

पत्नीने धीर न सोडल्यामुळे तिच्या पतीला कसा फायदा झाला ते पाहा.

मी सत्यालाच कठड्यात उभं केलं!  (६:३०)

यहोवाचे साक्षीदार कुटुंबात फूट पाडतात असं काही जण म्हणतात. पण हे खरंय का?

“यहोवाचे साक्षीदार कुटुंबात फूट पाडतात की त्यांना जवळ आणतात?” (वेबसाईटवरचा लेख)