व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा १३

धर्म लोकांना देवापासून दूर कसे नेतात?

धर्म लोकांना देवापासून दूर कसे नेतात?

देव तर शिकवतो की सगळ्यांवर प्रेम करा. पण मग आज धर्मांच्या नावाखाली इतक्या वाईट गोष्टी का केल्या जात आहेत? कारण स्पष्टपणे सांगायचं, तर हे धर्म देवाबद्दल सत्य शिकवत नाहीत. उलट, ते लोकांना देवापासून दूर नेतात. त्यांनी लोकांना देवापासून दूर कसं नेलंय? देवाला याबद्दल काय वाटतं आणि लवकरच तो काय करणार आहे?

१. धर्मांच्या चुकीच्या शिकवणी  लोकांना देवापासून दूर कशा नेतात?

बहुतेक धर्म “देवाच्या सत्याऐवजी असत्याला पसंत” करतात. (रोमकर १:२५) जसं की ते लोकांना खऱ्‍या देवाचं नाव काय आहे हे शिकवत नाहीत. पण बायबल सांगतं की देवाचं नाव वापरणं महत्त्वाचं आहे. (रोमकर १०:१३, १४) तसंच एखादी वाईट घटना घडते, तेव्हा काही धर्मपुढारी असं म्हणतात की ही देवाचीच इच्छा होती. पण ही गोष्ट साफ खोटी आहे. कारण देव कधीही वाईट गोष्टी घडवून आणत नाही. (याकोब १:१३ वाचा.) तर, अशा प्रकारच्या चुकीच्या शिकवणी लोकांना देवापासून दूर नेतात. ही खरंच एक दुःखाची गोष्ट आहे!

२. धर्माच्या नावाखाली होणारी चुकीची कामं  लोकांना देवापासून दूर कशी नेतात?

देव सगळ्या लोकांवर खूप प्रेम करतो. पण बहुतेक धर्मांचे पुढारी लोकांशी अशा प्रकारे व्यवहार करत नाहीत. बायबल म्हणतं की चुकीची कामं करणाऱ्‍या या धर्मांच्या “पापांची रास थेट आकाशापर्यंत पोहोचली आहे.” (प्रकटीकरण १८:५) कित्येक शतकांपासून धर्मपुढाऱ्‍यांनी राजकारणात भाग घेतलाय आणि युद्धांनाही पाठिंबा दिलाय. आणि असं केल्यामुळे ते आजपर्यंत असंख्य लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरले आहेत. काही धर्मपुढारी आपल्या भक्‍तांकडून लाखो रुपये उकळतात आणि ऐशआरामात जगतात. त्यांच्या अशा कामांवरून दिसतं, की ते देवाला अजिबात ओळखत नाहीत. आणि म्हणून लोकांना देवाबद्दल शिकवण्याचा त्यांच्याकडे कोणताही अधिकार नाही.—१ योहान ४:८ वाचा.

३. चुकीच्या शिकवणी देणाऱ्‍या आणि चुकीची कामं करणाऱ्‍या धर्मांबद्दल देवाला कसं वाटतं?

धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या वाईट कामांमुळे आपल्यालाच जर इतका राग येतो, तर मग यहोवाला कसं वाटत असेल? यहोवाचं लोकांवर खूप प्रेम आहे. पण जे धर्मपुढारी लोकांना त्याच्याबद्दल खोटं शिकवतात आणि त्यांना वाईट वागणूक देतात, त्यांचा त्याला खूप राग येतो. त्याने वचन दिलंय की अशा धर्मांचा नाश केला जाईल आणि त्यांचा “पुन्हा कधीच . . . पत्ता लागणार नाही.” (प्रकटीकरण १८:२१) लवकरच देव अशा सगळ्या धर्मांचं नामोनिशाण मिटवून टाकेल.—प्रकटीकरण १८:८.

आणखी जाणून घेऊ या

देवाची उपासना करण्याचा दावा करणारे धर्म जेव्हा वाईट कामं करतात तेव्हा देवाला कसं वाटतं हे जाणून घेऊ या. तसंच, या धर्मांनी आणखी कोणत्या वाईट गोष्टी केल्या आहेत, आणि त्यांमुळे तुम्ही यहोवाबद्दल शिकून घ्यायचं का थांबवायला नको, हेही पाहू या.

४. देवाला सगळे धर्म मान्य नाहीत

बऱ्‍याच लोकांना वाटतं की धर्म म्हणजे वेगवेगळे रस्ते आहेत, पण शेवटी ते सगळे देवाकडेच नेतात. पण ही गोष्ट खरी आहे का? मत्तय ७:१३, १४ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • जीवनाकडे जाणाऱ्‍या रस्त्याबद्दल बायबलमध्ये काय सांगितलंय?

व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • देव सगळ्याच धर्मांना स्वीकारतो असं बायबल सांगतं का?

५. बहुतेक धर्मांच्या कामांमधून देवासारखं प्रेम दिसून येत नाही

धर्मांनी आपल्या वाईट कामांमुळे देवाची बदनामी केली आहे. त्यांच्या या वाईट कामांमुळे त्यांना खोटे धर्म असं म्हणता येईल. जसं की त्यांनी युद्धांमध्ये भाग घेतला आहे. याचं एक उदाहरण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा. मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी बऱ्‍याच चर्चच्या लोकांनी काय केलं?

  • त्यांनी जे केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

योहान १३:३४, ३५ आणि १७:१६ वाचा. त्यानंतर या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • धर्म जेव्हा युद्धात भाग घेतात तेव्हा यहोवाला कसं वाटत असेल?

  • खोट्या धर्मांनी देवासारखं प्रेम दाखवण्याऐवजी बरीच वाईट कामं केली आहेत. तुम्ही याचं एखादं उदाहरण पाहिलंय का?

लोकांवर देवासारखं प्रेम करण्याऐवजी खोट्या धर्मांनी खूप वाईट कामं केली आहेत

६. देवाला अशा धर्मांच्या तावडीतून लोकांना सोडवायचंय

प्रकटीकरण १८:४ वाचा, a आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • खोट्या धर्मांनी आजपर्यंत बऱ्‍याच लोकांना देवापासून दूर नेलंय. पण देवाला या लोकांना वाचवायची इच्छा आहे हे कळल्यावर तुम्हाला कसं वाटतं?

७. खऱ्‍या देवाबद्दल शिकायचं सोडू नका

धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या दुष्ट कामांसाठी देवाला दोष देणं योग्य ठरेल का? एक उदाहरण पाहू या. एक मुलगा त्याच्या वडिलांनी लहानपणापासून दिलेली शिकवण विसरून, घर सोडून जातो आणि वाईट मार्गाला लागतो. तो करत असलेली वाईट कामं त्याच्या वडिलांना मुळीच आवडत नाहीत. स्वतःहून वडिलांच्या विरोधात गेलेल्या या मुलाच्या वागणुकीसाठी त्याच्या वडिलांना दोष देणं योग्य राहील का?

  • धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या दुष्ट कामांसाठी यहोवाला दोष देऊन त्याच्याबद्दल शिकून घ्यायचं सोडून देणं योग्य राहील का? तुम्हाला काय वाटतं?

काही जण म्हणतात: “सगळे धर्म सारखेच आहेत, सगळे चांगलंच शिकवतात.”

  • तुम्हाला काय वाटतं?

  • बरेच धर्म चांगल्या गोष्टी शिकवण्याचा दावा करत असले, तरी ते सगळेच देवाला मान्य का नाहीत?

थोडक्यात

खोट्या धर्मांनी चुकीच्या गोष्टी शिकवून आणि दुष्ट कामं करून देवाला बदनाम केलंय. देव या खोट्या धर्मांचा नाश करणार आहे.

उजळणी

  • खोट्या धर्मांच्या शिकवणी आणि कामांबद्दल तुम्हाला काय वाटतं?

  • खोट्या धर्मांबद्दल यहोवाला कसं वाटतं?

  • लवकरच देव खोट्या धर्मांचं काय करणार आहे?

ध्येय

हेसुद्धा पाहा

यहोवाला असं का वाटतं, की आपण त्याची उपासना इतरांसोबत मिळून करावी?

“एखाद्या धार्मिक संघटनेचा भाग असणं गरजेचं आहे का?” (वेबसाईटवरचा लेख)

एक पाळक त्याच्या धर्मामुळे खूप निराश झाला होता. पण त्याने या गोष्टीला देवाबद्दलचं सत्य शिकून घ्यायच्या आड येऊ दिलं नाही.

“एका पाळकाने चर्च का सोडलं?” (ऑनलाईन लेख)

बऱ्‍याच लोकांना वाटतं की देवाला आपली काळजी नाही, तो क्रूर आहे. कारण अनेक शतकांपासून धर्मांनी त्यांना देवाबद्दल खोट्या गोष्टी शिकवल्या आहेत. अशाच तीन गोष्टींबद्दलचं सत्य जाणून घ्या.

“झूठी शिक्षाएँ—परमेश्‍वर से प्यार करने में बाधाएँ” (ऑनलाईन लेख)

a प्रकटीकरण या पुस्तकात खोट्या धर्मांना ‘मोठी बाबेल’ असं नाव असलेली एक स्त्री का म्हटलंय, हे जाणून घेण्यासाठी काही विषयांवर स्पष्टीकरण क्र. १ पाहा.