व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा १८

खरे ख्रिस्ती कोण आहेत हे कसं ओळखायचं?

खरे ख्रिस्ती कोण आहेत हे कसं ओळखायचं?

आज जगात करोडो लोक स्वतःला ख्रिस्ती म्हणतात. पण त्या सगळ्यांचे विश्‍वास आणि शिकवणी सारख्या नाहीत. तर मग, खरे ख्रिस्ती कोण आहेत हे आपल्याला कसं ओळखता येईल?

१. ख्रिस्ती कोणाला म्हणता येईल?

ख्रिस्ती किंवा ख्रिश्‍चन म्हणजे येशू ख्रिस्ताचे शिष्य किंवा त्याचे अनुयायी. (प्रेषितांची कार्यं ११:२६ वाचा.) पण, ते खरोखरच येशूचे शिष्य आहेत हे कसं दिसून येतं? येशूने म्हटलं होतं, “मी शिकवलेल्या गोष्टींचं जर तुम्ही पालन करत राहिला, तर तुम्ही खऱ्‍या अर्थाने माझे शिष्य ठराल.” (योहान ८:३१) याचा अर्थ खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी येशूच्या शिकवणींचं पालन केलं पाहिजे. आणि जसं येशूने नेहमी शास्त्रवचनांच्या आधारावर शिकवलं, तसंच खऱ्‍या ख्रिश्‍चनांचे विश्‍वाससुद्धा बायबलवर आधारित असले पाहिजेत.—लूक २४:२७ वाचा.

२. खरे ख्रिस्ती एकमेकांबद्दल प्रेम कसं दाखवतात?

येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं, “मी तुमच्यावर प्रेम केलंय, तसंच तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा.” (योहान १५:१२) येशूचं आपल्या शिष्यांवर प्रेम होतं, हे त्याने कसं दाखवलं? त्याने त्यांच्यासोबत वेळ घालवला, त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांना मदत केली. एवढंच काय, तर त्याने त्यांच्यासाठी जीवही दिला. (१ योहान ३:१६) येशूप्रमाणेच खरे ख्रिस्तीसुद्धा प्रेमाबद्दल फक्‍त बोलतच नाहीत, तर ते त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दाखवतात की त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे.

३. खरे ख्रिस्ती आज कोणत्या कामात व्यस्त आहेत?

येशूने आपल्या शिष्यांना एक काम सोपवलं होतं. “त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करायला . . . पाठवलं.” (लूक ९:२) सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनी फक्‍त त्यांच्या उपासनेच्या ठिकाणीच नाही, तर इतर सार्वजनिक ठिकाणी आणि लोकांच्या घरोघरी जाऊनही देवाच्या राज्याबद्दल शिकवलं. (प्रेषितांची कार्यं ५:४२; १७:१७ वाचा.) त्याच प्रकारे, आज खरे ख्रिस्तीसुद्धा जिथे जिथे लोक भेटू शकतील अशा सर्व ठिकाणी जाऊन त्यांना बायबलमधली सत्यं सांगतात. त्यांचं लोकांवर प्रेम असल्यामुळे ते बायबलमधला आशेचा आणि सांत्वनाचा संदेश सांगण्यासाठी आपला वेळ आणि शक्‍ती आनंदाने खर्च करतात.—मार्क १२:३१.

आणखी जाणून घेऊ या

जे स्वतःला ख्रिस्ती म्हणतात, पण येशूच्या शिकवणींचं आणि उदाहरणाचं पालन करत नाहीत, त्यांच्यापासून खरे ख्रिस्ती कसे वेगळे आहेत हे जाणून घेऊ या.

४. खरे ख्रिस्ती बायबलमधून सत्य शोधायचा प्रयत्न करतात

सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनी देवाच्या वचनाचं महत्त्व ओळखलं

स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे सगळेच जण बायबलमधून सत्य शोधायचा आणि त्याचं पालन करायचा प्रयत्न करत नाहीत. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • काही चर्चेसनी येशू ख्रिस्ताच्या शिकवणी लोकांपासून कशा लपवून ठेवल्या?

येशूने देवाच्या वचनातून लोकांना सत्य शिकवलं. योहान १८:३७ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • जे ख्रिस्ती लोक “सत्याच्या बाजूने आहेत,” त्यांना आपण कसं ओळखू शकतो? येशू याबद्दल काय म्हणाला?

५. खरे ख्रिस्ती बायबलमधलं सत्य लोकांना शिकवतात

सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनी इतरांना शिकवलं

स्वर्गात परत जाण्याआधी येशूने आपल्या शिष्यांना एक महत्त्वाचं काम सोपवलं. ते काम आजही चालू आहे. मत्तय २८:१९, २० आणि प्रेषितांची कार्यं १:८ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • हे प्रचाराचं काम कधीपर्यंत आणि किती मोठ्या प्रमाणावर केलं जाणार होतं?

६. खरे ख्रिस्ती जसं शिकवतात तसं वागतातही

टॉम नावाच्या एका माणसाला कशामुळे खातरी पटली की त्याला खरे ख्रिस्ती सापडले आहेत? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • धर्मांवरून टॉमचा विश्‍वास का उडाला होता?

  • आपल्याला सत्य सापडलंय याची त्याला कशामुळे खातरी पटली?

आपण जे बोलतो त्यापेक्षा आपण जसं वागतो, ते जास्त महत्त्वाचं असतं. मत्तय ७:२१ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • आम्ही येशूच्या शिकवणी मानतो असं म्हणणं  जास्त महत्त्वाचंय, की ते आपल्या कामांतून दाखवून देणं  जास्त महत्त्वाचंय? येशू याबद्दल काय म्हणाला?

७. खरे ख्रिस्ती एकमेकांवर प्रेम करतात

सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनी एकमेकांबद्दल प्रेम दाखवलं

खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी खरोखरच आपल्या भाऊबहिणींसाठी जीव धोक्यात घातलाय का? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • ब्रदर जोहॅनसनसाठी ब्रदर लॉइड यांनी आपला जीव धोक्यात का घातला?

  • तो खऱ्‍या ख्रिश्‍चनासारखा वागला असं तुम्हाला वाटतं का?

योहान १३:३४, ३५ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • येशूच्या शिष्यांनी (खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी) दुसऱ्‍या वंशाच्या किंवा देशाच्या लोकांशी कसं वागलं पाहिजे?

  • मग दोन देशांमध्ये युद्ध होतं त्या वेळी ते हे प्रेम कसं दाखवू शकतात?

काही जण म्हणतात: “बायबलमध्ये तर खूप चांगल्या गोष्टी शिकवल्याएत, पण ख्रिश्‍चन लोक तसं वागतात कुठे?”

  • तुम्हाला जर कोणी असं म्हटलं, तर खऱ्‍या ख्रिश्‍चनांना कसं ओळखायचं हे तुम्ही त्यांना बायबलमधल्या कोणत्या वचनातून दाखवाल?

थोडक्यात

खरे ख्रिस्ती बायबलच्या शिकवणींप्रमाणे चालतात, निःस्वार्थ प्रेम दाखवतात आणि बायबलमधून लोकांना सत्य शिकवतात.

उजळणी

  • खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या शिकवणी कशावर आधारित असतात?

  • खऱ्‍या ख्रिश्‍चनांची ओळख करून देणारा एक खास गुण कोणता आहे?

  • खरे ख्रिस्ती आज कोणतं महत्त्वाचं काम करत आहेत?

ध्येय

हेसुद्धा पाहा

येशू ख्रिस्ताच्या उदाहरणाचं आणि शिकवणींचं पालन करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्‍या एका गटाबद्दल जाणून घ्या.

यहोवाचे साक्षीदार—आम्ही कोण आहोत?  (१:१३)

विपत्तीचा सामना करणाऱ्‍या आपल्या भाऊबहिणींबद्दल खरे ख्रिस्ती प्रेम कसं दाखवतात हे जाणून घ्या.

विपत्ती येते तेव्हा आपल्या बांधवांना मदत करणं—निवडक भाग  (३:५७)

येशूने आपल्या अनुयायांची ओळख करून देणाऱ्‍या काही गोष्टी सांगितल्या. या गोष्टी सुरुवातीच्या आणि आजच्या खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये कशा दिसून येतात हे जाणून घ्या.

“सच्चे मसीही धर्म को कैसे पहचानें?” (ऑनलाईन लेख)