व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा २५

मानवांसाठी देवाची काय इच्छा आहे?

मानवांसाठी देवाची काय इच्छा आहे?

बायबल सांगतं की माणसाचं आयुष्य “फक्‍त काही काळाचं आणि दुःखाने भरलेलं असतं.” (ईयोब १४:१) पण आपण असं जीवन जगावं अशी देवाची इच्छा असेल का? जर नसेल, तर मग आपल्याला बनवण्यामागे त्याचा काय उद्देश होता? तो उद्देश कधी पूर्ण होईल का? याबद्दल बायबलमध्ये जे सांगितलंय ते जाणून तुम्हाला खूप दिलासा मिळेल.

१. आपलं जीवन कसं असावं अशी यहोवाची इच्छा आहे?

यहोवाची अशी इच्छा आहे की आपलं जीवन सर्व दृष्टीने खूप चांगलं आणि आनंदी असावं. म्हणूनच जेव्हा त्याने पहिल्या पुरुषाला आणि स्त्रीला म्हणजेच आदाम आणि हव्वाला निर्माण केलं, तेव्हा त्याने त्यांना एदेन बाग म्हटलेल्या एका सुंदर नंदनवनात ठेवलं. मग “देवाने त्यांना असा आशीर्वाद दिला: ‘फलदायी व्हा, आपली संख्या वाढवा आणि पूर्ण पृथ्वीला भरून टाका आणि तिच्यावर अधिकार चालवा.’” (उत्पत्ती १:२८) यहोवाची इच्छा होती, की त्यांना मुलं व्हावीत, त्यांनी पूर्ण पृथ्वीला एक नंदनवन बनवावं आणि सर्व प्राण्यांची काळजी घ्यावी. त्याचा हाच उद्देश होता, की सर्व लोकांनी पूर्णपणे निरोगी असावं आणि कायम जीवनाचा आनंद घ्यावा.

पण तसं घडलं नाही. a तरीसुद्धा देवाचा मूळ उद्देश आजही बदललेला नाही. (यशया ४६:१०, ११) आजही त्याची हीच इच्छा आहे की त्याच्या आज्ञा पाळणाऱ्‍या मानवांनी कोणत्याही दुःखाशिवाय कायम आनंदाने जगावं.—प्रकटीकरण २१:३, ४ वाचा.

२. आज आपल्याला आनंदी आणि समाधानी जीवन कसं जगता येईल?

सगळ्या मानवांमध्ये मुळातच देवाच्या “मार्गदर्शनाची भूक” असते. म्हणजेच देवाला जाणून घ्यायची आणि त्याची उपासना करायची त्यांना इच्छा असते. कारण यहोवाने आपल्याला अशाच प्रकारे निर्माण केलंय. (मत्तय ५:३-६ वाचा.) त्याला मनापासून असं वाटतं, की आपण त्याच्यासोबत एक जवळचं नातं जोडावं, “त्याच्या सर्व मार्गांवर चालावं, त्याच्यावर प्रेम करावं” आणि “पूर्ण मनाने” त्याची सेवा करावी. (अनुवाद १०:१२; स्तोत्र २५:१४) जेव्हा आपण असं करतो, तेव्हा जीवनात समस्या असूनही आपण खऱ्‍या अर्थाने आनंदी होऊ शकतो. आपण यहोवाची उपासना करतो तेव्हा आपल्याला हे समाधान असतं की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे जगत आहोत. आणि यामुळे आपल्या जीवनाला एक खरा अर्थ मिळतो.

आणखी जाणून घेऊ या

यहोवाने आपल्यासाठी ही पृथ्वी ज्या प्रकारे निर्माण केली त्यावरून त्याचं प्रेम कसं दिसून येतं आणि जीवनाच्या उद्देशाबद्दल त्याचं वचन काय शिकवतं हे जाणून घेऊ या.

३. यहोवाने एक सुंदर उद्देश मनात ठेवून मानवांना बनवलं

व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • देवाने ही सुंदर पृथ्वी का निर्माण केली?

उपदेशक ३:११ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • यावरून माणसांसाठी असलेल्या यहोवाच्या उद्देशाबद्दल काय कळतं?

४. यहोवाचा उद्देश बदललेला नाही

स्तोत्र ३७:११, २९ आणि यशया ५५:११ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • आपल्यासाठी असलेला यहोवाचा उद्देश बदललेला नाही हे कशावरून कळतं?

५. यहोवाची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनाला खरा अर्थ मिळतो

जीवनाचा उद्देश नेमका काय आहे हे समजल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • जीवनाचा उद्देश काय आहे हे समजल्यावर तेरुमीचं जीवन कसं बदललं?

उपदेशक १२:१३ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • यहोवाने आपल्यासाठी खूप काही केलंय. तर मग आपलं काय कर्तव्य आहे?

काही जण म्हणतात: “जो जन्माला आलाय तो एक-ना-एक दिवस जाणारच.”

  • तुम्ही काय म्हणाल?

थोडक्यात

यहोवाची इच्छा आहे की आपण पृथ्वीवर कोणत्याही दुःखाशिवाय कायम जीवनाचा आनंद घ्यावा. जर आपण पूर्ण मनाने त्याची उपासना केली, तर आपल्या जीवनाला भविष्यातच नाही तर आजही खरा अर्थ मिळेल.

उजळणी

  • आदाम आणि हव्वासाठी यहोवाचा मूळ उद्देश काय होता?

  • मानवांसाठी असलेला देवाचा उद्देश आजही बदललेला नाही हे आपल्याला कसं कळतं?

  • तुम्ही जीवनात खऱ्‍या अर्थाने आनंदी आणि समाधानी कसे होऊ शकता?

ध्येय

हेसुद्धा पाहा

एदेन बाग खरोखरच होती याचा पुरावा पाहा.

“अदन का बाग—क्या यह सच में था?” (ऑनलाईन लेख)

पृथ्वीचा कधीही नाश होणार नाही असं आपण खातरीने का म्हणू शकतो हे जाणून घ्या.

“पृथ्वीचा कधी नाश होईल का?” (वेबसाईटवरचा लेख)

जीवनाला खरा अर्थ कसा मिळू शकतो याबद्दल बायबलमधून जाणून घ्या.

“आपल्या जगण्याचा काय उद्देश आहे?” (वेबसाईटवरचा लेख)

सगळं काही असूनही जीवनात नेमकी कशाची कमी आहे, हे एका माणसाला कसं कळलं हे पाहा.

अब मेरी ज़िंदगी का एक मकसद है  (३:५५)

a ते का घडलं नाही याबद्दल आपण पुढच्या धड्यात पाहणार आहोत.