व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ३७

काम आणि पैशांबद्दल बायबलमध्ये काय सांगितलंय?

काम आणि पैशांबद्दल बायबलमध्ये काय सांगितलंय?

तुम्हाला कधी कामाचं किंवा घरखर्च चालवण्याचं टेन्शन येतं का? आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करणं आणि त्यासोबतच यहोवाची मनापासून उपासना करणं कधीकधी कठीण जाऊ शकतं. पण याबाबतीत बायबलमध्ये खूप चांगला सल्ला दिलाय, ज्यामुळे आपल्याला मदत होऊ शकते.

१. कामाबद्दल बायबलमध्ये काय सांगितलंय?

आपण करत असलेल्या कामातून आपल्याला आनंद मिळावा अशी देवाची इच्छा आहे. बायबलमध्ये म्हटलंय, की माणसाने “आपल्या मेहनतीच्या फळाचा आनंद घ्यावा, हेच त्याच्यासाठी सर्वात चांगलं आहे.” (उपदेशक २:२४) यहोवा स्वतः मेहनत करतो. आणि जेव्हा आपण त्याच्यासारखंच मेहनतीने काम करतो तेव्हा त्याला आनंद होतो आणि आपल्यालाही समाधान मिळतं.

काम करणं नक्कीच महत्त्वाचंय. पण आपण यहोवाच्या उपासनेपेक्षा कामाला जास्त महत्त्व कधीच देऊ नये. (योहान ६:२७) यहोवाने वचन दिलंय की जर आपण त्याच्या उपासनेला जीवनात पहिलं स्थान दिलं तर तो आपल्या गरजा भागवेल.

२. पैशांबद्दलचा योग्य दृष्टिकोन काय आहे?

“पैशामुळे . . . संरक्षण मिळतं” ही गोष्ट बायबल मान्य करतं. पण बायबलमध्ये हेही सांगितलंय की फक्‍त पैशामुळे आपण आनंदी होऊ शकत नाही. (उपदेशक ७:१२) म्हणूनच ते आपल्याला सांगतं की आपण पैशाचा लोभ करू नये, तर “आहे त्यात समाधानी” असावं. (इब्री लोकांना १३:५ वाचा.) जर आपण समाधानी असलो तर आपण सतत नवनवीन गोष्टी मिळवण्याची धडपड करणार नाही. आणि यामुळे आपल्याला बराच मनस्ताप टाळता येईल. तसंच, आपण गरज नसताना कर्ज घ्यायचंही टाळू. (नीतिवचनं २२:७) आणि सोबतच, आपण जुगार आणि झटपट श्रीमंत होण्याच्या स्कीम्सना बळी पडणार नाही.

३. आपण दुसऱ्‍यांना मदत करण्यासाठी पैशाचा वापर कसा करू शकतो?

यहोवा देव खूप उदार आहे. आणि जेव्हा आपण ‘मोठ्या मनाने आणि उदारतेने’ दुसऱ्‍यांना मदत करण्यासाठी आपल्या पैशाचा वापर करतो, तेव्हा आपण त्याचं अनुकरण करत असतो. (१ तीमथ्य ६:१८) यासाठी आपण मंडळीला दान देऊ शकतो. तसंच, अडीअडचणीत असलेल्यांना, खासकरून आपल्या भाऊबहिणींना मदत करू शकतो. आपण किती देतो यापेक्षा आपण कोणत्या भावनेने देतो हे यहोवा पाहतो. आपण जेव्हा मोठ्या मनाने दुसऱ्‍यांना मदत करतो तेव्हा आपल्याला आणि यहोवालाही आनंद होतो.—प्रेषितांची कार्यं २०:३५ वाचा.

आणखी जाणून घेऊ या

कामाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवल्यामुळे आणि समाधानी राहिल्यामुळे कोणते फायदे होतात हे पाहू या.

४. यहोवाचा गौरव होईल अशा प्रकारे काम करा

यहोवासोबत आपलं जवळचं नातं असेल, तर आपण कामाबद्दल त्याच्यासारखाच विचार करू. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • कामाबद्दल जेसनचे विचार आणि कामाच्या ठिकाणी त्याचं वागणं-बोलणं तुम्हाला का आवडलं?

  • कामामुळे यहोवाच्या उपासनेकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून जेसनने काय केलं?

कलस्सैकर ३:२३, २४ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • आपण आपलं काम मेहनतीने का केलं पाहिजे?

काम करणं नक्कीच महत्त्वाचंय. पण आपण यहोवाच्या उपासनेपेक्षा कामाला जास्त महत्त्व कधीच देऊ नये

५. समाधानी राहिल्यामुळे आपल्याला फायदा होतो

बरेच लोक पैशांच्या मागे धावत असतात. पण बायबल आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन ठेवायचं प्रोत्साहन देतं. १ तीमथ्य ६:६-८ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • बायबल आपल्याला काय करायचं प्रोत्साहन देतं?

आपण गरीब असलो तरी सुखी राहू शकतो. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • गरिबीतसुद्धा ही कुटुंबं कशामुळे सुखी आहेत?

पण जर भरपूर वस्तू असूनही आपल्याला आणखी वस्तू हव्या असतील तर काय? हे किती धोक्याचं आहे हे सांगण्यासाठी येशूने एक उदाहरण दिलं. लूक १२:१५-२१ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • येशूने दिलेल्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? —१५ वं वचन पाहा.

नीतिवचनं १०:२२ आणि १ तीमथ्य ६:१० ही वचनं वाचा आणि त्यांची तुलना करा. मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • तुमच्या मते जास्त महत्त्वाचं काय आहे, यहोवाशी मैत्री करणं की भरपूर पैसा कमवणं? आणि तुम्हाला असं का वाटतं?

  • पैशांच्या मागे धावल्यामुळे कोणत्या समस्या येतात?

६. यहोवा आपल्या गरजा भागवेल

काम आणि पैशांच्या बाबतीत आपल्याला समस्या येतात, तेव्हा यहोवावर असलेल्या आपल्या विश्‍वासाची परीक्षा होऊ शकते. अशा प्रकारच्या समस्या येतात तेव्हा आपण काय केलं पाहिजे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • व्हिडिओमध्ये, आपल्या भावासमोर कोणत्या समस्या आल्या?

  • या समस्यांचा त्याने कसा सामना केला?

मत्तय ६:२५-३४ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • जे यहोवाला जीवनात पहिलं स्थान देतात त्यांना तो कोणतं वचन देतो?

काही जण म्हणतात: “पोटापाण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. दर वेळी सभांना जाऊन कसं भागेल?”

  • आपण यहोवाच्या उपासनेला पहिलं स्थान दिलं तर तो आपल्या गरजा नक्की भागवेल, याची खातरी तुम्हाला कोणत्या वचनामुळे वाटते?

थोडक्यात

काम आणि पैसा जीवनात महत्त्वाचा आहे. पण या गोष्टींमुळे आपण कधीही यहोवाच्या उपासनेकडे दुर्लक्ष करू नये.

उजळणी

  • कामाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला तुम्हाला कशामुळे मदत मिळेल?

  • समाधानी राहिल्यामुळे कोणता फायदा होतो?

  • यहोवाने आपल्या लोकांच्या गरजा भागवण्याचं जे वचन दिलंय, त्यावर तुमचा भरवसा आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता?

ध्येय

हेसुद्धा पाहा

बायबल पैशाला वाईट म्हणतं का, हे जाणून घ्या.

“पैसा सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे का?” (वेबसाईटवरचा लेख)

देवाला आनंद होईल अशा प्रकारे आपण आपल्या पैशांचा वापर कसा करू शकतो?

“पवित्र शास्त्र दूसरों की मदद करने के बारे में क्या बताता है?” (वेबसाईटवरचा लेख)

पूर्वी जुगार खेळणाऱ्‍या आणि चोरी करणाऱ्‍या एका माणसाने आपलं जीवन कशामुळे बदललं?

“शर्यतीत धावणाऱ्‍या घोड्यांचं मला वेड होतं” (टेहळणी बुरूज,  १ एप्रिल, २०१२)