व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ४१

शारीरिक संबंधांबद्दल बायबलचा काय दृष्टिकोन आहे?

शारीरिक संबंधांबद्दल बायबलचा काय दृष्टिकोन आहे?

बऱ्‍याच लोकांना शारीरिक संबंधांबद्दल म्हणजेच सेक्सबद्दल बोलताना थोडं अवघडल्यासारखं वाटतं. पण बायबलमध्ये शारीरिक संबंधांचा जिथेजिथे उल्लेख करण्यात आला आहे, तिथे तो खूप स्पष्टपणे आणि आदरणीय पद्धतीने केला आहे. त्यात जे काही सांगितलंय ते आपल्या फायद्याचं आहे. आणि हे साहजिकच आहे, कारण यहोवाने आपल्याला निर्माण केलंय. त्यामुळे आपल्यासाठी काय चांगलंय हे त्यालाच माहीत आहे. आपण काय करावं आणि काय करू नये हे तो आपल्याला स्पष्टपणे सांगतो. जर आपण त्याच्या सांगण्याप्रमाणे वागलो तर त्याला आनंद होईल आणि आपल्यालाही कायम जीवनाचा आनंद घेता येईल.

१. शारीरिक संबंधांबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन आहे?

यहोवाने मानवांना अनेक चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. शारीरिक संबंधसुद्धा त्यांपैकीच एक आहे. पण यहोवाची अशी इच्छा आहे की फक्‍त पतीने आणि पत्नीने एकमेकांसोबत या संबंधांचा आनंद घ्यावा. या क्षमतेमुळे ते मुलांना जन्म देऊ शकतात आणि यासोबतच एकमेकांबद्दल असलेलं प्रेमसुद्धा व्यक्‍त करू शकतात. हे देवाने ठरवलेल्या व्यवस्थेनुसार आहे आणि यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणूनच देवाच्या वचनात असं म्हटलंय: “आपल्या तारुण्यातल्या बायकोसोबत आनंदी राहा.” (नीतिवचनं ५:१८, १९) यहोवा ख्रिस्ती पती-पत्नींकडून अशी अपेक्षा करतो की त्यांनी एकमेकांना विश्‍वासू राहावं. म्हणून त्यांनी आपल्या जोडीदाराला सोडून दुसऱ्‍या कोणत्याही व्यक्‍तीशी शारीरिक संबंध ठेवू नये.—इब्री लोकांना १३:४ वाचा.

२. अनैतिक लैंगिक कृत्यांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?

बायबल आपल्याला सांगतं की “अनैतिक लैंगिक कृत्यं करणारे . . . देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत.” (१ करिंथकर ६:९, १०) बायबलच्या लेखकांनी हे शब्द ग्रीक भाषेत लिहिले होते. आणि अनैतिक लैंगिक कृत्यं यासाठी त्यांनी पोर्निया  हा शब्द वापरला. यात पुढे दिलेल्या गोष्टींचा समावेश होतो: (१) एकमेकांशी लग्न न झालेल्या स्त्री-पुरुषांमधले शारीरिक संबंध, a (२) समलैंगिक संबंध आणि (३) प्राण्यांशी लैंगिक संबंध. जेव्हा आपण अशा “अनैतिक लैंगिक कृत्यांपासून स्वतःला दूर” ठेवतो तेव्हा यहोवाला आनंद होतो आणि आपल्यालाही फायदा होतो.—१ थेस्सलनीकाकर ४:३.

आणखी जाणून घेऊ या

आपण अनैतिक लैंगिक कृत्यांपासून दूर कसं राहू शकतो आणि देवाच्या नजरेत शुद्ध राहिल्यामुळे आपल्याला काय फायदा होईल यावर विचार करू या.

३. अनैतिक लैंगिक कृत्यांपासून पूर्णपणे दूर राहा

योसेफ हा यहोवाचा एक विश्‍वासू उपासक होता. पण तरीसुद्धा यहोवाच्या स्तरांप्रमाणे स्वतःला शुद्ध ठेवणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. उत्पत्ती ३९:१-१२ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • योसेफ का पळून गेला?—९ वं वचन पाहा.

  • योसेफने योग्य निर्णय घेतला असं तुम्हाला वाटतं का? आणि तुम्हाला असं का वाटतं?

योसेफप्रमाणेच आज तरुण लोक अनैतिक लैंगिक कृत्यांपासून कसं दूर राहू शकतात? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.

यहोवाची इच्छा आहे की आपण सर्वांनीच अनैतिक कामांपासून दूर राहावं. १ करिंथकर ६:१८ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • कोणत्या परिस्थितींमध्ये एखाद्या व्यक्‍तीला अनैतिक कामं करण्याचा मोह होऊ शकतो?

  • तुम्ही अनैतिक कामांपासून दूर कसं राहू शकता?

४. तुम्ही मोहांवर मात करू शकता

अनैतिक काम करण्याच्या मोहावर मात करणं कशामुळे कठीण जाऊ शकतं? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • चुकीचा विचार आणि काम केल्यामुळे आपण आपल्या पत्नीला धोका देऊ, हे व्हिडिओमधल्या भावाला जाणवलं तेव्हा त्याने काय केलं?

जे यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत आहेत, त्यांच्या मनातही कधीकधी चुकीचे विचार येऊ शकतात. पण अशा अनैतिक गोष्टींवर विचार करत राहण्याचं तुम्ही कसं टाळू शकता? फिलिप्पैकर ४:८ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • आपण कशा प्रकारच्या गोष्टींवर विचार केला पाहिजे?

  • बायबल वाचल्यामुळे आणि यहोवाच्या सेवेत व्यस्त राहिल्यामुळे, आपल्याला वाईट काम करण्याच्या मोहावर मात करायला कशी मदत मिळू शकते?

५. यहोवाच्या स्तरांप्रमाणे वागल्यामुळे आपल्याला फायदा होतो

आपल्यासाठी काय चांगलंय हे यहोवाला माहीत आहे. म्हणून आपण शुद्ध कसं राहू शकतो आणि असं केल्यामुळे कोणते फायदे होतात हे तो आपल्याला सांगतो. नीतिवचनं ७:७-२७ वाचा किंवा व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • एक तरुण कशा प्रकारे मोहात पाडणारी परिस्थिती स्वतःवर ओढवून घेतो?—नीतिवचनं ७:८, ९ पाहा.

  • नीतिवचनं ७:२३, २६ मधून कळतं, की अनैतिक लैंगिक कृत्यं केल्यामुळे भयानक परिणाम होऊ शकतात. पण देवाच्या नजरेत शुद्ध राहिल्यामुळे आपण कोणत्या समस्या टाळू शकतो?

  • अनैतिक गोष्टींपासून दूर राहिल्यामुळे आपल्याला भविष्यात कोणते आशीर्वाद मिळतील?

काही लोकांना वाटतं की बायबलमध्ये समलैंगिकतेबद्दल दिलेली आज्ञा खूप कठोर आहे. पण खरं पाहिलं तर यहोवाचं आपल्या सर्वांवर खूप प्रेम आहे आणि त्याची इच्छा आहे, की सर्वांनी कायम जीवनाचा आनंद घ्यावा. पण ते जीवन मिळवण्यासाठी आपण आपल्या जीवनात आवश्‍यक ते बदल करून यहोवाच्या स्तरांप्रमाणे जगलं पाहिजे. १ करिंथकर ६:९-११ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • देवाच्या नजरेत फक्‍त समलैंगिक कामंच चुकीची आहेत की इतर गोष्टीसुद्धा आहेत?

तर यावरून कळतं, की देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी आपल्या सर्वांनाच स्वतःमध्ये काही बदल करावे लागतात. पण हे बदल केल्यामुळे काही फायदा होतो का? स्तोत्र १९:८, ११ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • यहोवाच्या स्तरांचं पालन करणं शक्य आहे असं तुम्हाला वाटतं का? का वाटतं किंवा का नाही?

यहोवाने बऱ्‍याच जणांना त्याचे नीतिनियम पाळायला मदत केली आहे. तो तुम्हालाही नक्कीच मदत करेल

काही जण म्हणतात: “दोघांचं एकमेकांवर प्रेम असेल तर सेक्स करण्यात काय हरकत आहे?”

  • तुम्ही कसं उत्तर द्‌याल?

थोडक्यात

यहोवाने मानवांना बऱ्‍याच चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. शारीरिक संबंधसुद्धा त्यांपैकी एक आहे. यहोवाची इच्छा आहे की पती-पत्नीने एकमेकांसोबत याचा आनंद घ्यावा.

उजळणी

  • अनैतिक लैंगिक कृत्यांमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो?

  • अनैतिक कामं टाळण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होईल?

  • यहोवाच्या स्तरांप्रमाणे स्वतःला शुद्ध ठेवल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होतो?

ध्येय

हेसुद्धा पाहा

विवाहाच्या व्यवस्थेला यहोवा महत्त्व का देतो हे जाणून घ्या.

“लग्न न करता सोबत राहण्याबद्दल बायबल काय म्हणतं?” (वेबसाईटवरचा लेख)

समलैंगिक संबंधांबद्दल बायबलचे स्तर आपल्याला कोणाचाही द्वेष करायला शिकवत नाहीत, असं का म्हणता येईल हे या लेखातून जाणून घ्या.

“समलैंगिकता चुकीची आहे का?” (वेबसाईटवरचा लेख)

लैंगिक गोष्टींबद्दल देवाने दिलेले नियम आपलं कसं रक्षण करतात हे जाणून घ्या.

“क्या मुख मैथुन (ओरल सेक्स) सच में सेक्स है?” (वेबसाईटवरचा लेख)

पूर्वी समलैंगिक जीवनशैली असलेल्या एका व्यक्‍तीने देवाचं मन आनंदित करण्यासाठी स्वतःमध्ये बदल कसा केला हे, “ते माझ्याशी आदराने वागले” असं शीर्षक असलेल्या अनुभवातून जाणून घ्या.

“बायबलने बदललं जीवन” (ऑनलाईन लेख)

a या चुकीच्या संबंधांमध्ये बऱ्‍याच गोष्टी येतात. जसं की लैंगिक संभोग, मुखमैथुन (ओरल सेक्स), गुदमैथुन आणि दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या गुप्तांगांना कुरवाळणं.