व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ४६

तुम्ही समर्पण करून बाप्तिस्मा घेणं का महत्त्वाचं आहे?

तुम्ही समर्पण करून बाप्तिस्मा घेणं का महत्त्वाचं आहे?

तुम्ही यहोवाला समर्पण करता तेव्हा तुम्ही प्रार्थनेत त्याला सांगता, की तुम्ही फक्‍त त्याचीच उपासना कराल आणि जीवनात नेहमी त्यालाच पहिलं स्थान द्याल. (स्तोत्र ४०:८) यानंतर तुम्ही बाप्तिस्मा घेता. असं करून तुम्ही इतरांना दाखवता की तुम्ही समर्पण केलं आहे. यहोवाला आपलं जीवन समर्पित करण्याचा निर्णय हा आपल्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे. पण जीवन बदलून टाकणारा हा महत्त्वाचा निर्णय तुम्ही कशामुळे घेऊ शकाल?

१. एक व्यक्‍ती कशामुळे समर्पण करायचा निर्णय घेते?

यहोवावर प्रेम असल्यामुळे आपण आपलं जीवन त्याला समर्पित करतो. (१ योहान ४:१०, १९) बायबल आपल्याला असं प्रोत्साहन देतं, की “आपला देव यहोवा याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्‍तीने प्रेम करा.” (मार्क १२:३०) हे प्रेम आपण फक्‍त बोलूनच नाही तर आपल्या कार्यांतूनही दाखवतो. उदाहरणार्थ, एखाद्या तरुण मुलाचं आणि मुलीचं एकमेकांवर खरं प्रेम असतं तेव्हा ते लग्न करतात. त्याच प्रकारे, यहोवावर प्रेम असल्यामुळे आपण आपलं जीवन त्याला समर्पित करून बाप्तिस्मा घेतो.

२. बाप्तिस्मा घेतलेल्या आपल्या सेवकांना यहोवा कोणते आशीर्वाद देतो?

तुम्ही बाप्तिस्मा घ्याल तेव्हा तुम्ही यहोवाच्या आनंदी कुटुंबाचे सदस्य बनाल. मग तुम्ही बऱ्‍याच मार्गांनी यहोवाचं प्रेम अनुभवाल आणि त्याच्या आणखी जवळ याल. (मलाखी ३:१६-१८ वाचा.) तुम्हाला यहोवाचं पित्यासारखं प्रेम अनुभवता येईल. यासोबतच, त्याच्यावर प्रेम करणारे जगभरातले तुमचे भाऊबहीणसुद्धा तुमच्यावर प्रेम करतील. (मार्क १०:२९, ३० वाचा.) पण बाप्तिस्मा घेण्याआधी तुम्ही काही पावलं उचलली पाहिजेत. तुम्ही यहोवाबद्दल शिकून घेतलं पाहिजे, त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि त्याच्या मुलावर विश्‍वास ठेवला पाहिजे. यानंतर तुम्ही यहोवाला तुमचं जीवन समर्पित केलं पाहिजे. जर तुम्ही ही सगळी पावलं उचलून बाप्तिस्मा घेतला, तर कायम जीवनाचा आनंद घेण्याची तुमची आशा आणखी पक्की होईल. कारण देवाचं वचन सांगतं की ‘बाप्तिस्मा आपल्याला वाचवतो.’१ पेत्र ३:२१.

आणखी जाणून घेऊ या

तुम्ही यहोवाला समर्पण करून बाप्तिस्मा घेणं का महत्त्वाचं आहे, हे आता पाहू या.

३. कोणाची सेवा करायची हे आपल्यापैकी प्रत्येकाला ठरवावं लागेल

जुन्या काळात इस्राएलमध्ये काही लोकांना वाटायचं, की आपण यहोवाची उपासनाही करू शकतो आणि त्याच वेळी बआल या खोट्या देवाचीही उपासना करू शकतो. पण ते किती चुकीचा विचार करत होते, हे सांगण्यासाठी यहोवाने एलीया संदेष्ट्याला त्यांच्याकडे पाठवलं. १ राजे १८:२१ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • इस्राएली लोकांना कोणती निवड करायची होती?

इस्राएली लोकांप्रमाणेच आपल्यापैकी प्रत्येकाला हे ठरवावं लागेल की आपण कोणाची सेवा करणार. लूक १६:१३ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • यहोवासोबतच आपण आणखी कोणाची किंवा कशाचीही उपासना का करू शकत नाही?

  • आपण फक्‍त यहोवाचीच उपासना करायचा निर्णय घेतलाय, हे आपण कसं दाखवू शकतो?

४. यहोवाने तुमच्यावर किती प्रेम केलंय यावर मनन करा

यहोवाने आपल्याला कितीतरी चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. मग आपण त्याला काय देऊ शकतो? व्हिडिओ पाहा.

यहोवाने तुमच्यावर असलेलं प्रेम कोणकोणत्या मार्गांनी दाखवलंय? स्तोत्र १०४:१४, १५ आणि १ योहान ४:९, १० वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • यहोवाने ज्या चांगल्या गोष्टी दिल्या आहेत त्यांपैकी तुम्ही सगळ्यात जास्त कशासाठी आभारी आहात?

  • यहोवाने दिलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल तुम्ही विचार करता, तेव्हा तुम्हाला यहोवाबद्दल कसं वाटतं?

कोणी आपल्याला एखादं छानसं गिफ्ट देतं, तेव्हा आपण त्यांना हे दाखवतो की आपण त्यांचे किती आभारी आहोत. अनुवाद १६:१७ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • यहोवाने तुमच्यासाठी कायकाय केलंय याचा जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा तुम्हाला त्याला काय द्यावंसं वाटतं?

५. समर्पण केल्यामुळे भरपूर आशीर्वाद मिळतात

बऱ्‍याच लोकांना वाटतं की जीवनाच्या एखाद्या क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी मिळवल्यामुळे किंवा भरपूर पैसा कमवल्यामुळे ते आनंदी होतील. पण हे खरंय का? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • व्हिडिओमधल्या भावाला पूर्वी फुटबॉलचं खूप वेड होतं. मग त्याने कशामुळे त्याचं हे करिअर सोडलं?

  • त्याने फुटबॉलला नाही तर यहोवाला आपलं जीवन समर्पित करायचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य होता असं तुम्हाला वाटतं का? आणि तुम्हाला असं का वाटतं?

ख्रिस्ती बनण्याआधी प्रेषित पौलकडे भरपूर यश आणि एक मोठं नाव कमवायची संधी होती. त्याने एका प्रसिद्ध शिक्षकाकडून यहुदी कायद्याचं प्रशिक्षणही घेतलं होतं. पण ख्रिस्ती बनण्यासाठी त्याने या सगळ्या गोष्टींकडे पाठ फिरवली. पौलला याचा कधी पस्तावा झाला का? फिलिप्पैकर ३:८ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • ख्रिस्ती बनण्याआधी पौल जे करत होता, त्याला त्याने “केरकचरा” का म्हटलं?

  • या सगळ्या गोष्टी सोडून दिल्यावर त्याला त्याच्या बदल्यात काय मिळालं?

  • यहोवाच्या सेवेच्या तुलनेत तुम्ही जगात जे मिळवू शकता, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

ख्रिस्ती बनण्यासाठी पौलने जे गमावलं त्याच्या कितीतरी पटीने जास्त आशीर्वाद त्याला मिळाले

काही जण म्हणतात: “पूर्ण आयुष्यच देवाला समर्पित करायची काय गरज आहे?”

  • यहोवाला आपलं जीवन समर्पित करणं महत्त्वाचं आहे, असं तुम्हाला का वाटतं?

थोडक्यात

यहोवावर प्रेम असल्यामुळेच आपण त्याला आपलं जीवन समर्पित करतो आणि बाप्तिस्मा घेतो.

उजळणी

  • यहोवावर मनापासून प्रेम करणं आणि त्याचीच उपासना करणं का गरजेचं आहे?

  • बाप्तिस्मा घेतलेल्या साक्षीदारांना यहोवा कोणते आशीर्वाद देतो?

  • तुम्हाला तुमचं जीवन यहोवाला समर्पित करायला आवडेल का?

ध्येय

हेसुद्धा पाहा

संगीताच्या आणि खेळाच्या क्षेत्रात असलेल्या दोन जणांनी यहोवाला आपलं जीवन समर्पित करायचं का ठरवलं, ते पाहा.

तरुण लोक विचारतात—मी जीवनात काय करणार?—मागे पाहताना  (६:५४)

समर्पण करण्याच्या आणखी काही कारणांवर विचार करा.

“तुम्ही यहोवाला समर्पण का केले पाहिजे?” (टेहळणी बुरूज,  १५ जानेवारी, २०१०)

यहोवाला समर्पण केल्यामुळे किती आनंद होतो, हे या संगीत व्हिडिओमध्ये पाहा.

मी वाहिलं जीवन तुला!  (४:३०)

“मला नेहमी प्रश्‍न पडायचा, की ‘आपण नेमकं कशासाठी जगतो?’” या अनुभवात एका स्त्रीला तिच्या जीवनात काय महत्त्वाचं आहे यावर विचार करायला कोणत्या गोष्टीमुळे प्रेरणा मिळाली, हे पाहा.

“बायबलने बदललं जीवन” (ऑनलाईन लेख)