व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ४८

विचार करून मित्र निवडा!

विचार करून मित्र निवडा!

जिवाभावाचे मित्र आपल्याला सुख-दुःखात साथ देतात. पण बायबल आपल्याला सांगतं की प्रत्येकच मित्राला चांगला मित्र म्हणता येणार नाही. मग तुम्ही चांगले मित्र कसे निवडू शकता? यासाठी खाली दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

१. तुम्ही निवडलेल्या मित्रांचा तुमच्यावर कसा परिणाम होऊ शकतो?

जेव्हा आपण एखाद्या व्यक्‍तीसोबत बराच वेळ घालवतो, तेव्हा हळूहळू आपण त्या व्यक्‍तीसारखं बनू लागतो; मग ते प्रत्यक्षात वेळ घालवणं असो किंवा सोशल मिडियावर. त्या व्यक्‍तीचा आपल्यावर एकतर चांगला परिणाम होऊ शकतो किंवा वाईट. म्हणूनच बायबल म्हणतं: “बुद्धिमानांसोबत चालणारा बुद्धिमान होईल, पण मूर्खांची [यहोवावर प्रेम न करणाऱ्‍यांची] संगत धरणाऱ्‍याचं नुकसान होईल.” (नीतिवचनं १३:२०) ज्यांचं यहोवावर प्रेम आहे आणि जे त्याची उपासना करतात, असे मित्र आपल्याला यहोवासोबत जवळचं नातं टिकवून ठेवायला आणि जीवनात चांगले निर्णय घ्यायला मदत करतात. पण जर आपण यहोवाची सेवा न करणाऱ्‍या लोकांशी जवळची मैत्री केली, तर आपण हळूहळू यहोवापासून दूर जाऊ शकतो. म्हणूनच बायबलमध्ये आपल्याला विचार करून मित्र निवडण्याचा सल्ला दिलाय. जेव्हा आपण देवावर प्रेम करणाऱ्‍यांशी मैत्री करतो, तेव्हा आपल्याला आणि त्यांनाही फायदा होतो. कारण यामुळे आपण एकमेकांना प्रोत्साहन देऊ शकतो आणि एकमेकांचा विश्‍वास मजबूत करू शकतो.—१ थेस्सलनीकाकर ५:११.

२. आपण निवडलेल्या मित्रांबद्दल यहोवाला कसं वाटतं?

यहोवा स्वतः विचार करून मित्र निवडतो. बायबल सांगतं, की “सरळ माणसाशी त्याची जवळची मैत्री असते.” (नीतिवचनं ३:३२) यहोवावर ज्यांचं प्रेम नाही असे मित्र जर आपण निवडले तर त्याला कसं वाटेल? नक्कीच त्याला खूप वाईट वाटेल! (याकोब ४:४ वाचा.) त्याच्या अगदी उलट, यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांशी जर आपण मैत्री केली तर त्याला खूप आनंद होईल. आणि जर आपण वाईट संगतीपासून दूर राहून यहोवाच्या जवळ जायचा प्रयत्न केला, तर तो आपल्याशी मैत्री करेल.—स्तोत्र १५:१-४.

आणखी जाणून घेऊ या

विचार करून मित्र निवडणं इतकं महत्त्वाचं का आहे आणि आपण चांगले मित्र कसे निवडू शकतो, हे पाहू या.

३. वाईट संगतीपासून सावध राहा

वाईट संगत म्हणजे असे लोक ज्यांचं देवावर आणि त्याच्या स्तरांवर प्रेम नाही. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • आपण नकळत वाईट संगतीत कसं अडकू शकतो?

१ करिंथकर १५:३३ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • कशा प्रकारची व्यक्‍ती तुमच्यासाठी वाईट संगत ठरू शकते? आणि का?

स्तोत्र ११९:६३ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • मित्र निवडताना तुम्ही त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत?

एका सडलेल्या फळामुळे बाकीची सगळी फळं खराब होतात. मग एका वाईट मित्रामुळे तुमच्यावर काय परिणाम होईल?

४. आपल्यापेक्षा खूप वेगळे असलेले लोकसुद्धा आपले चांगले मित्र बनू शकतात

बायबलमध्ये दावीद आणि योनाथान या दोन मित्रांबद्दल सांगितलंय. त्यांचं वय आणि त्यांची परिस्थिती एकमेकांपासून खूप वेगळी होती, तरीही ते एकमेकांचे जिवलग मित्र होते. १ शमुवेल १८:१ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • आपल्या मित्रांचं वय आणि परिस्थिती आपल्यासारखीच असली पाहिजे हे गरजेचं का नाही?

रोमकर १:११, १२ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • यहोवावर प्रेम करणारे मित्र एकमेकांना प्रोत्साहन कसं देऊ शकतात?

एका तरुण भावाने अपेक्षा केली नव्हती, अशा ठिकाणी त्याला मित्र कसे मिळाले ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा. मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • अखिलने शाळेतल्या मुलांशी मैत्री केली तेव्हा त्याच्या आईवडिलांना चिंता का वाटली?

  • शाळेतले मित्र चांगले आहेत असं अखिलला सुरुवातीला का वाटत होतं?

  • त्याने त्याच्या एकटेपणावर मात कशी केली?

५. चांगले मित्र कसे बनवायचे?

तुम्हाला चांगले मित्र कसे मिळवता येतील आणि तुम्ही स्वतः एक चांगला मित्र कसे बनू शकता, यावर विचार करा. व्हिडिओ पाहा.

नीतिवचनं १८:२४ आणि २७:१७ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • खरे मित्र एकमेकांना कशी मदत करतात?

  • तुम्हाला असे चांगले मित्र आहेत का? जर नसतील तर तुम्ही चांगले मित्र कसे बनवू शकता?

फिलिप्पैकर २:४ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • तुम्हाला चांगले मित्र हवे असतील, तर तुम्ही स्वतः एक चांगला मित्र असलं पाहिजे. मग तुम्ही एक चांगला मित्र कसे बनू शकता?

तुम्हाला चांगले मित्र हवे असतील, तर तुम्ही स्वतः एक चांगला मित्र असलं पाहिजे

काही जण म्हणतात: “इतका विचार करत बसलो तर आपल्याला एकही मित्र मिळणार नाही.”

  • तुम्ही काय म्हणाल?

थोडक्यात

जेव्हा आपण विचार करून मित्र निवडतो, तेव्हा यहोवाला तर आनंद होतोच पण आपल्यालाही त्याचा फायदा होतो.

उजळणी

  • आपण विचार करून मित्र निवडावेत असं यहोवाला का वाटतं?

  • आपण कशा प्रकारच्या लोकांशी मैत्री करू नये?

  • जे यहोवावर प्रेम करतात अशा लोकांशी आपण मैत्री कशी वाढवू शकतो?

ध्येय

हेसुद्धा पाहा

चांगले मित्र आपल्याला कठीण प्रसंगांत कशी मदत करू शकतात, हे जाणून घ्या.

“अंत येण्याआधी भाऊबहिणींसोबत आपली मैत्री घनिष्ठ करा” (टेहळणी बुरूज,  नोव्हेंबर २०१९)

चांगले मित्र बनवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, हे पाहा.

“मैं अच्छे दोस्त कैसे बनाऊँ?” (ऑनलाईन लेख)

इंटरनेटवर कोणाशीही मैत्री करताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

सोशल नेटवर्कचा सावधपणे वापर करा  (४:१२)

“वडिलांच्या प्रेमासाठी मी आसुसलो होतो,” या अनुभवात एका माणसाने आपल्या पूर्वीच्या मित्रांना का सोडून दिलं, हे जाणून घ्या.

“बायबलने बदलले जीवन!” (टेहळणी बुरूज,  १ जुलै, २०१२)