व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ५०

कुटुंब आनंदी राहावं म्हणून तुम्ही काय करू शकता?—भाग २

कुटुंब आनंदी राहावं म्हणून तुम्ही काय करू शकता?—भाग २

मुलं ही यहोवाकडून मिळालेला एक आशीर्वाद आहेत. आणि म्हणून तो अशी अपेक्षा करतो, की आईवडिलांनी आपल्या मुलांची चांगली काळजी घ्यावी. या बाबतीत आईवडिलांना मदत व्हावी म्हणून त्याने चांगलं मार्गदर्शनही दिलंय. तसंच, त्याने मुलांसाठीही सल्ला दिलाय, ज्यामुळे कुटुंब आनंदी होण्यासाठी तेसुद्धा हातभार लावू शकतील.

१. यहोवाने आईवडिलांना कोणता सल्ला दिलाय?

आईवडिलांनी आपल्या मुलांवर प्रेम करावं आणि त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा अशी यहोवाची इच्छा आहे. तसंच त्यांनी वाईट गोष्टींपासून मुलांचं संरक्षण करावं आणि बायबल तत्त्वांनुसार त्यांना वळण लावावं, अशीही त्याची इच्छा आहे. (नीतिवचनं १:८) तो वडिलांना सांगतो: “[आपल्या मुलांना] यहोवाच्या . . . शिक्षणात वाढवत राहा.” (इफिसकर ६:४ वाचा.) यहोवाची इच्छा आहे की आईवडिलांनी मुलांना वाढवण्याची जबाबदारी दुसऱ्‍या कोणावरही टाकू नये. जेव्हा आईवडील त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्या मुलांना वाढवतात, तेव्हा त्याला आनंद होतो.

२. यहोवाने मुलांना कोणता सल्ला दिलाय?

यहोवा मुलांना सांगतो: “आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा.” (कलस्सैकर ३:२० वाचा.) जेव्हा मुलं आईवडिलांचा आदर करतात आणि त्यांचं ऐकतात, तेव्हा त्यांच्या आईवडिलांना आणि यहोवालाही आनंद होतो. (नीतिवचनं २३:२२-२५) या बाबतीत येशूचं खूप सुंदर उदाहरण आहे. येशू परिपूर्ण होता तरी त्याने त्याच्या आईवडिलांचं ऐकलं आणि त्यांचा आदर केला.—लूक २:५१, ५२.

३. कुटुंब मिळून आपण देवासोबतचं नातं कसं मजबूत करू शकतो?

आईवडील या नात्याने नक्कीच तुमची इच्छा असेल, की तुमच्या मुलांनी तुमच्यासारखंच यहोवावर प्रेम करावं. मग यासाठी तुम्हाला काय करता येईल? बायबलचा हा सल्ला लागू करा: “[यहोवाच्या] आज्ञा तुम्ही आपल्या मुलांच्या मनावर बिंबवा आणि घरात बसलेले असताना, रस्त्याने चालत असताना . . . त्यांबद्दल त्यांच्याशी बोलत जा.” (अनुवाद ६:७) ‘बिंबवणं’ म्हणजे एखादी गोष्ट शिकवण्यासाठी ती वारंवार सांगणं. तुम्हाला माहीतच असेल की मुलांना एखादी गोष्ट लक्षात राहावी, म्हणून ती बऱ्‍याचदा सांगावी लागते. या वचनात हेच सांगितलंय, की तुम्ही यहोवाबद्दल मुलांशी बोलण्यासाठी नेहमी संधी शोधली पाहिजे. तसंच, तुम्ही दर आठवडी कुटुंब मिळून यहोवाची उपासना करण्यासाठी काही वेळ काढला पाहिजे. मुलं नसलेली जोडपीसुद्धा दर आठवडी देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढतात, तेव्हा त्यांनाही याचा फायदा होतो.

आणखी जाणून घेऊ या

कुटुंबात सगळ्यांनी खूश राहावं आणि त्यांना सुरक्षित वाटावं, म्हणून कोणते काही सल्ले लागू करता येतील, ते पाहू या.

४. मुलांना प्रेमाने वळण लावा

मुलांना वळण लावणं सोपं नाही. पण बायबल आपल्याला या बाबतीत कशी मदत करू शकतं? याकोब १:१९, २० वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • मुलांवर आपलं प्रेम आहे हे आईवडील त्यांच्याशी बोलताना कसं दाखवू शकतात?

  • आईवडिलांनी कधीही रागाच्या भरात आपल्या मुलांना शिक्षा का देऊ नये? a

५. आपल्या मुलांचं संरक्षण करा

मुलांचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही आपल्या प्रत्येक मुलाला लैंगिक शिक्षण देणं खूप गरजेचं आहे. कदाचित तुम्हाला याविषयी बोलताना खूप अवघडल्यासारखं वाटत असेल. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • मुलांना लैंगिक गोष्टींबद्दल सांगणं काही आईवडिलांना कठीण का वाटतं?

  • काही आईवडिलांनी आपल्या मुलांना लैंगिक गोष्टींबद्दल माहिती कशी दिली?

बायबलमध्ये आधीच सांगितल्याप्रमाणे सैतानाच्या जगात दुष्टपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय. २ तीमथ्य ३:१, १३ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • १३ व्या वचनात सांगितलेल्या दुष्ट लोकांपैकी काही लोक लहान मुलांचं लैंगिक शोषण करतात. मग मुलांना लैंगिक शिक्षण देणं आणि अशा दुष्ट लोकांपासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे त्यांना शिकवणं का महत्त्वाचंय?

तुम्हाला माहीत होतं का?

यहोवाच्या साक्षीदारांनी अशी बरीचशी माहिती प्रकाशित केली आहे, जी आईवडिलांना उपयोगी पडेल. त्यामुळे मुलांना लैंगिक शिक्षण द्यायला आणि शोषण करणाऱ्‍यांपासून त्यांचं संरक्षण करायला आईवडिलांना मदत होते. उदाहरणार्थ:

६. मुलांनो, आपल्या आईवडिलांना आदर द्या

लहान मुलं आणि तरुण ज्या पद्धतीने आपल्या आईवडिलांशी बोलतात, त्यावरून ते दाखवू शकतात की ते त्यांचा मनापासून आदर करतात. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • आईवडिलांशी आदराने बोलणं मुलांसाठी फायद्याचं का आहे?

  • मुलं आपल्या आईवडिलांशी आदराने कसं बोलू शकतात?

नीतिवचनं १:८ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • आईवडील मुलांना जेव्हा काही सांगतात, तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे?

७. कुटुंब मिळून यहोवाची उपासना करा

यहोवाचे साक्षीदार दर आठवडी त्यांनी ठरवलेल्या एका निश्‍चित वेळी कुटुंब मिळून यहोवाची उपासना करतात. या कौटुंबिक उपासनेत ते कायकाय करतात? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • आपली कौटुंबिक उपासना नियमितपणे व्हावी म्हणून एक कुटुंब काय करू शकतं?

  • कौटुंबिक उपासनेचा सगळ्यांना फायदा व्हावा आणि त्यातून सगळ्यांना आनंद मिळावा, म्हणून आईवडील काय करू शकतात?—धड्याच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.

  • एकत्र मिळून कौटुंबिक उपासना करण्यामध्ये तुम्हाला कोणते अडथळे येऊ शकतात?

जुन्या काळात इस्राएली लोकांना यहोवाने असं सांगितलं होतं, की त्यांनी आपल्या कुटुंबात नेहमी त्याच्या आज्ञांबद्दल बोलावं. अनुवाद ६:६, ७ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • या वचनात जे सांगितलंय ते तुम्ही कसं करू शकता?

तुमच्या कौटुंबिक उपासनेत हे करून पाहा:

काही जण म्हणतात: “मुलांना बायबल काय समजणार?”

  • तुम्ही काय उत्तर द्याल?

थोडक्यात

यहोवाची अशी इच्छा आहे की आईवडिलांनी मुलांवर प्रेम करावं, त्यांना वळण लावावं आणि त्यांचं रक्षण करावं. तसंच, मुलांनी आपल्या आईवडिलांचा आदर करावा आणि त्यांचं ऐकावं. शिवाय, कुटुंबांनी सोबत मिळून उपासना करावी, अशी यहोवाची इच्छा आहे.

उजळणी

  • आईवडील मुलांना वळण कसं लावू शकतात आणि त्यांचं रक्षण कसं करू शकतात?

  • मुलं आपल्या आईवडिलांचा आदर कसा करू शकतात?

  • दर आठवडी कुटुंब मिळून यहोवाची उपासना करण्यासाठी वेळ बाजूला काढल्यामुळे कोणते फायदे होतात?

ध्येय

हेसुद्धा पाहा

मोठेपणी उपयोगी पडतील असे कोणते धडे आईवडील मुलांना शिकवू शकतात?

“मुलांना घडवणाऱ्‍या सहा गोष्टी” (सावध राहा!  क्र. २ २०१९)

वयस्क लोकांची काळजी घेणाऱ्‍यांसाठी बायबलमध्ये कोणता सल्ला दिलाय, हे जाणून घ्या.

“पवित्र शास्त्र बुज़ुर्ग माता-पिता की देखभाल के बारे में क्या कहता है?” (ऑनलाईन लेख)

एका माणसाला चांगला पिता बनण्यासाठी कशामुळे मदत झाली ते पाहा.

मुलांचं पालनपोषण करायला आम्ही यहोवाकडून शिकलो  (५:५८)

वडील आपल्या मुलांसोबतचं नातं कसं मजबूत करू शकतात, हे जाणून घ्या.

“पिता-पुत्र कसे होऊ शकतात मित्र?” (टेहळणी बुरूज,  १ एप्रिल, २०१२)

a बायबलमध्ये “शिक्षा” यासाठी असलेल्या मूळ भाषेतल्या शब्दाचा संबंध शिकवणं, मार्गदर्शन देणं आणि सुधारणं याच्याशी आहे. अपमान करणं किंवा क्रूरपणे मारहाण करणं असा त्याचा कधीच अर्थ होत नाही.—नीतिवचनं ४:१.