व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ५१

तुम्ही आपल्या बोलण्याने यहोवाला कसं आनंदित करू शकता?

तुम्ही आपल्या बोलण्याने यहोवाला कसं आनंदित करू शकता?

यहोवाने आपल्याला बनवलं तेव्हा त्याने आपल्याला एक अनोखी देणगी दिली. ती म्हणजे बोलण्याची क्षमता. आपण या क्षमतेचा कसा वापर करतो याने त्याला काही फरक पडतो का? हो नक्कीच पडतो. (याकोब १:२६ वाचा.) तर मग, यहोवाला आनंद होईल अशा प्रकारे आपण आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा कसा वापर करू शकतो?

१. आपण बोलण्याच्या क्षमतेचा कसा वापर केला पाहिजे?

बायबल सांगतं, ‘एकमेकांना प्रोत्साहन देत राहा आणि एकमेकांना बळकट करत राहा.’ (१ थेस्सलनीकाकर ५:११) तुम्हाला असं कोणी आठवतंय का ज्याला सांत्वनाची, प्रोत्साहनाची गरज आहे? मग त्यांना थोडं बरं वाटावं म्हणून तुम्हाला काय करता येईल? तुम्हाला त्यांची काळजी आहे याची त्यांना जाणीव करून द्या. तुम्ही कदाचित त्यांच्या एखाद्या चांगल्या गोष्टीची प्रशंसा करू शकता. किंवा मग तुम्हाला एखादं वचन आठवतं का, ज्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल? अशी कितीतरी वचनं आहेत. त्यातलं एखादं योग्य वचन तुम्ही निवडू शकता. पण हे सगळं करताना हे लक्षात असू द्या, की तुम्ही जे बोलता त्यासोबतच तुम्ही ज्या पद्धतीने ते बोलता तेही महत्त्वाचंय. कारण त्यामुळे इतरांच्या भावनांवर परिणाम होऊ शकतो. म्हणून नेहमी प्रेमळपणे आणि सौम्यपणे बोलायचा प्रयत्न करा.—नीतिवचनं १५:१.

२. आपण कशा प्रकारे बोलायचं टाळलं पाहिजे?

बायबलमध्ये म्हटलंय, “तुमच्या तोंडून कोणताही वाईट शब्द निघू नये.” (इफिसकर ४:२९ वाचा.) याचा अर्थ आपण कधीही बोलताना शिव्या देऊ नये, कोणाला घालूनपाडून बोलू नये, किंवा मुद्दाम त्यांच्या भावना दुखावण्यासाठी त्यांना टोचून बोलू नये. तसंच, आपण कधीही कोणाच्या चुगल्या करू नये आणि त्यांची बदनामी करू नये.—नीतिवचनं १६:२८ वाचा.

३. दुसऱ्‍यांना प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारे बोलण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

सहसा, आपण ज्या गोष्टींबद्दल बोलतो, त्यांवरून आपल्या मनात नेमकं काय आहे किंवा आपण कशाबद्दल विचार करतो हे दिसून येतं. (लूक ६:४५) म्हणून आपण नेहमी चांगल्या गोष्टींबद्दल विचार करायला शिकलं पाहिजे. म्हणजेच “जे काही नीतिमान, जे काही शुद्ध, जे काही प्रिय मानण्यालायक, . . . आणि जे काही प्रशंसनीय आहे,” अशाच गोष्टींचा आपण नेहमी विचार केला पाहिजे. (फिलिप्पैकर ४:८) आणि यासाठी आपण खूप सावधपणे आपले मित्र आणि मनोरंजन निवडलं पाहिजे. (नीतिवचनं १३:२०) तसंच, काहीही बोलण्याआधी आपण विचार केला पाहिजे. आपल्या शब्दांचा दुसऱ्‍यांच्या भावनांवर काय परिणाम होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बायबल म्हणतं, “विचार न करता बोललेले शब्द तलवारीच्या घावांसारखे असतात, पण बुद्धिमानाच्या शब्दांमुळे घाव भरून निघतात.”नीतिवचनं १२:१८.

आणखी जाणून घेऊ या

ज्यामुळे यहोवाला आनंद होईल आणि दुसऱ्‍यांना प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारे आपण कसं बोलू शकतो हे जाणून घेऊ या.

४. आपण बोलण्यावर नियंत्रण कसं ठेवू शकतो?

आपण कित्येकदा असं काहीतरी बोलून जातो, ज्याचा आपल्याला नंतर पस्तावा होतो. (याकोब ३:२) गलतीकर ५:२२, २३ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवता यावं, म्हणून यांपैकी कोणते गुण वाढवण्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता? या गुणांमुळे तुम्हाला कशी मदत होईल?

१ करिंथकर १५:३३ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • तुम्ही ज्या प्रकारचं मनोरंजन निवडता आणि ज्यांच्यासोबत उठता-बसता, त्यांचा तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवर कसा परिणाम होऊ शकतो?

उपदेशक ३:१, वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • कोणकोणत्या परिस्थितीत शांत राहणं किंवा बोलण्यासाठी योग्य संधीची वाट पाहणं चांगलं राहील?

५. दुसऱ्‍यांबद्दल चांगलं बोला

कोणाचा अपमान होईल किंवा त्यांचं मन दुखावेल अशा गोष्टी बोलायचं आपण कसं टाळू शकतो? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • व्हिडिओमधला भाऊ ज्या प्रकारे इतरांबद्दल बोलायचा, त्यात त्याला बदल करावासा का वाटला?

  • मग त्याने तो बदल कसा केला?

उपदेशक ७:१६ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • एखाद्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलावंसं वाटतं, तेव्हा आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

उपदेशक ७:२१, २२ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • दुसरे आपल्याबद्दल चुकीचं बोलतात, तेव्हा आपण खूप जास्त वाईट वाटून घेऊ नये. यासाठी ही वचनं आपल्याला कशी मदत करू शकतात?

६. घरच्यांशी बोलताना प्रेमळपणे बोला

यहोवाची इच्छा आहे की आपण आपल्या घरच्यांशी प्रेमाने आणि आदराने बोलावं. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • घरच्यांशी प्रेमळपणे बोलण्यासाठी तुम्हाला कशामुळे मदत होईल?

इफिसकर ४:३१, ३२ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • कशा प्रकारे बोलल्यामुळे कुटुंबातल्या सगळ्यांना प्रोत्साहन मिळेल?

यहोवाने आपल्या मुलावर म्हणजे येशूवर त्याचं किती प्रेम आहे हे बोलून दाखवलं. मत्तय १७:५ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • घरच्यांशी बोलताना तुम्ही यहोवाचं अनुकरण कसं करू शकता?

आज तुमच्याजवळ कोणाची प्रशंसा करायची संधी आहे का?

काही जण म्हणतात: “मी मनात काही ठेवत नाही, जे आहे ते बोलतो, मग समोरच्याला वाईट वाटलं तरी चालेल.”

  • तुम्हाला हे पटतं का? का पटतं किंवा का नाही?

थोडक्यात

शब्दांमध्ये खूप ताकद असते. म्हणून आपण काय बोलतो, केव्हा बोलतो आणि कसं बोलतो याचा नीट विचार केला पाहिजे.

उजळणी

  • तुम्ही आपल्या बोलण्याने दुसऱ्‍यांना प्रोत्साहन कसं देऊ शकता?

  • आपण कशा प्रकारचं बोलणं टाळलं पाहिजे?

  • दुसऱ्‍यांशी प्रेमळपणे आणि प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारे बोलण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

ध्येय

हेसुद्धा पाहा

दुसऱ्‍यांबद्दल चांगलं बोलण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होईल?

बोलने से पहले सोचिए  (८:०४)

घाणेरडी भाषा कशी टाळता येईल हे जाणून घ्या.

“क्या गाली देने में कोई बुराई है?” (ऑनलाईन लेख)

दुसऱ्‍यांबद्दल वाईट बोलून त्यांचं नुकसान करण्याचं आपण कसं टाळू शकतो ते पाहा.

मी इतरांबद्दल वाईट बोलणं कसं टाळू शकतो?  (२:३६)

शिव्या द्यायची सवय असलेल्या एका माणसाला यहोवाने कशी मदत केली हे या अनुभवात वाचा.

“माझं जीवन कोणत्या दिशेनं चाललं आहे याचा मी गांभीर्यानं विचार करू लागलो” (टेहळणी बुरूज,  १ ऑक्टोबर, २०१३)