व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ५२

आपल्या पेहरावाकडे लक्ष देणं महत्त्वाचं का आहे?

आपल्या पेहरावाकडे लक्ष देणं महत्त्वाचं का आहे?

कपड्यांच्या किंवा पेहरावाच्या बाबतीत आपल्या सगळ्यांच्याच वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात. आणि यात काही चुकीचं नाही. आपण जर बायबलमधल्या काही साध्यासोप्या तत्त्वांचं पालन केलं, तर स्वतःच्या आवडीनिवडींप्रमाणे पेहराव करण्यासोबतच आपण यहोवाचं मनसुद्धा आनंदित करू शकतो. त्यांतली काही तत्त्वं आता आपण पाहू या.

१. पेहराव निवडताना आपण कोणती तत्त्वं लक्षात घेतली पाहिजेत?

आपण ‘शालीनतेने आणि विचारशीलपणे योग्य पेहराव केला पाहिजे.’ तसंच, ‘देवाच्या उपासकाला’ शोभेल असा स्वच्छ आणि नीटनेटका पेहराव आपण केला पाहिजे. (१ तीमथ्य २:९, १०) या तत्त्वांचा काय अर्थ होतो हे पाहू या. (१) आपण “योग्य” असा पेहराव केला पाहिजे. मंडळीच्या सभांमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की यहोवाचे लोक आपापल्या आवडीनिवडींप्रमाणे वेगवेगळा पेहराव करतात. पण त्यांच्या कपड्यांवरून आणि केस करायच्या पद्धतीवरून ते देवाचा आदर करतात हे दिसून येतं. (२) आपण “शालीनतेने” पेहराव केला पाहिजे. म्हणजेच विरुद्धलिंगी व्यक्‍तीच्या मनात चुकीच्या भावना उत्तेजित होतील किंवा आपल्याकडे इतरांचं खूप जास्त लक्ष वेधलं जाईल, असा आपला पेहराव असू नये. (३) तसंच, आपण “विचारशीलपणे” पेहराव निवडला पाहिजे. याचा अर्थ आपण प्रत्येक नवीन फॅशनचं अनुकरण करू नये. (४) आपल्या पेहरावावरून इतरांना नेहमी दिसून आलं पाहिजे, की आपण खऱ्‍या ‘देवाचे उपासक’ आहोत.—१ करिंथकर १०:३१.

२. पेहराव निवडताना आपण मंडळीतल्या भाऊबहिणींचा विचार का केला पाहिजे?

आपल्याला स्वतःच्या आवडीप्रमाणे पेहराव करण्याची मोकळीक असली, तरी इतरांवर त्याचा काय परिणाम होईल याचा आपण विचार केला पाहिजे. आपल्या पेहरावामुळे कोणाला अवघडल्यासारखं वाटावं अशी आपली इच्छा नाही. उलट, आपण नेहमी ‘इतरांच्या भल्याचा विचार करून त्यांना विश्‍वासात मजबूत करायचा प्रयत्न करतो.’रोमकर १५:१, २ वाचा.

३. आपल्या पेहरावामुळे इतरांना खऱ्‍या उपासनेकडे यायला कशी मदत होऊ शकते?

तसं तर आपण प्रत्येकच प्रसंगी योग्य पेहराव करायचा प्रयत्न करतो. पण सभांना आणि प्रचार कार्याला जाताना आपण आपल्या पेहरावाकडे खास लक्ष देतो. आपण जो महत्त्वाचा संदेश लोकांना सांगायला जातो, त्यापासून त्यांचं लक्ष विचलित व्हावं अशी आपली इच्छा नाही. उलट, आपला चांगला पेहराव त्यांना सत्याकडे आकर्षित करू शकतो आणि आपला ‘तारणकर्ता देव याच्या शिक्षणाला शोभा आणतो.’तीत २:१०.

आणखी जाणून घेऊ या

खरे ख्रिस्ती या नात्याने आपला पेहराव योग्य आहे, याची आपण खातरी कशी करू शकतो हे पाहू या.

आपण अधिकाऱ्‍यांचा आदर करतो की नाही, हे आपल्या पेहरावावरून दिसून येतं. यहोवा तर आपलं मनही पाहू शकतो, पण असं असलं तरी आपण त्याचा आदर करतो हे आपल्या पेहरावावरून दिसून आलं पाहिजे

४. चांगल्या पेहरावावरून यहोवाबद्दल आदर दिसून येतो

विचारपूर्वक पेहराव करण्याचं सगळ्यात मुख्य कारण कोणतंय? स्तोत्र ४७:२ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • आपण यहोवाचे उपासक म्हणून ओळखले जातो, ही गोष्ट आपण कपडे निवडताना का लक्षात ठेवली पाहिजे?

  • सभांना आणि प्रचार कार्याला जाताना आपण कसा पेहराव करतो याचा विचार करणं महत्त्वाचंय असं तुम्हाला वाटतं का? आणि तुम्हाला असं का वाटतं?

५. योग्य पेहराव कसा निवडायचा?

व्हिडिओ पाहा.

आपले कपडे महागाचे असोत किंवा साधे, पण ते स्वच्छ, नीटनेटके आणि प्रसंगाला शोभतील असे असले पाहिजेत. १ करिंथकर १०:२४ आणि १ तीमथ्य २:९, १० वाचा. मग आपण खाली दिलेले कपड्यांचे प्रकार का टाळले पाहिजेत, यावर चर्चा करा:

  • गबाळे किंवा मळके कपडे.

  • घट्ट किंवा टाईट, अंगप्रदर्शन करणारे किंवा चुकीच्या भावना उत्तेजित करणारे.

आज खरे ख्रिस्ती मोशेचा नियमशास्त्र पाळत नसले, तरी त्यातल्या नियमांतून यहोवा कसा विचार करतो हे आपल्याला कळतं. अनुवाद २२:५ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • ज्यांमुळे पुरुष स्त्रियांसारखे आणि स्त्रिया पुरुषांसारख्या दिसतात असे कपडे आणि हेअरस्टाईल आपण का टाळल्या पाहिजेत?

१ करिंथकर १०:३२, ३३ आणि १ योहान २:१५, १६ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • आपण ज्या भागात राहतो तिथल्या लोकांना किंवा मंडळीतल्या भाऊबहिणींना जर आपला पेहराव चुकीचा वाटत असेल, तर आपण याकडे दुर्लक्ष का करू नये?

  • तुम्ही राहता त्या भागात आजकाल कोणत्या प्रकारचे कपडे आणि हेअरस्टाईल पाहायला मिळतात?

  • हे सगळेच प्रकार यहोवाच्या साक्षीदारांसाठी योग्य आहेत असं तुम्हाला वाटतं का? आणि तुम्हाला असं का वाटतं?

आपले कपडे आणि हेअरस्टाईल वेगवेगळ्या असल्या, तरी आपण यहोवाचं मन आनंदित करू शकतो

काही जण म्हणतात: “मला जे आवडेल ते मी घालेन.”

  • तुम्हालाही असंच वाटतं का? का वाटतं किंवा का नाही?

थोडक्यात

पेहरावाच्या बाबतीत आपण चांगले निर्णय घेतो, तेव्हा आपण यहोवाबद्दल आणि इतरांबद्दल आदर दाखवतो.

उजळणी

  • पेहरावाच्या बाबतीत आपण योग्य निर्णय घ्यावेत, असं यहोवाला का वाटतं?

  • पेहरावाच्या बाबतीत निर्णय घेताना आपण कोणती तत्त्वं लक्षात ठेवली पाहिजेत?

  • आपल्या चांगल्या पेहरावामुळे इतरांना खऱ्‍या उपासनेकडे यायला मदत कशी होऊ शकते?

ध्येय

हेसुद्धा पाहा

तुमच्या कपड्यांवरून तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाबद्दल काय कळतं हे जाणून घ्या.

“मी असे कपडे घालावेत का?” (वेबसाईटवरचा लेख)

टॅटू काढायचा विचार करण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे हे जाणून घ्या.

“टॅटू काढण्याबद्दल बायबल काय म्हणतं?” (वेबसाईटवरचा लेख)

पेहरावाच्या बाबतीत आणखी कोणती तत्त्वं लक्षात घेणं गरजेचं आहे हे पाहा.

“यहोवाच्या नावाचा गौरव होईल असा तुमचा पेहराव आहे का?” (टेहळणी बुरूज, सप्टेंबर २०१६)

प्रामाणिक मनाची एक स्त्री पेहरावाच्या बाबतीत इतरांच्या निर्णयांबद्दल योग्य प्रकारे विचार कशी करू लागली?

“उनका पहनावा और तैयार होने का तरीका मेरे लिए एक रुकावट था” (ऑनलाईन लेख)