व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ६०

पुढेही प्रगती करत राहा

पुढेही प्रगती करत राहा

हा बायबल अभ्यास करताना तुम्ही यहोवाबद्दल बरंच काही शिकला आहात. तुम्हाला जे शिकायला मिळालं त्यामुळे तुम्ही यहोवावर खूप प्रेम करू लागला. कदाचित तुम्ही आपलं जीवन त्याला समर्पित करून बाप्तिस्माही घेतला असेल किंवा लवकरच तसं करायचा तुमचा विचार असेल. पण बाप्तिस्मा घेतल्यावर तुमची प्रगती थांबत नाही. तुम्ही कायम यहोवासोबतचं तुमचं नातं मजबूत करत राहू शकता. ते कसं?

१. यहोवासोबतचं नातं तुम्ही दिवसेंदिवस घट्ट का केलं पाहिजे?

यहोवासोबतचं आपलं नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहिलं पाहिजे. यामुळे आपण कधीही यहोवापासून दूर “वाहवत जाणार नाही.” (इब्री लोकांना २:१) यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत राहायला कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला मदत होईल? आपण प्रचार कार्यात व्यस्त राहायचा प्रयत्न केला पाहिजे. तसंच, देवाची आणखी जास्त प्रमाणात सेवा कशी करता येईल याचाही आपण विचार केला पाहिजे. (फिलिप्पैकर ३:१६ वाचा.) कारण यहोवाची सेवा करणं हाच जीवनात आनंदी होण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे!—स्तोत्र ८४:१०.

२. तुम्ही आणखी काय करत राहिलं पाहिजे?

बायबल अभ्यासाचा हा प्रवास आता संपत आलाय. पण तुमच्या ख्रिस्ती जीवनाचा प्रवास सुरूच राहणार आहे. बायबल आपल्याला सांगतं की आपण नवीन “व्यक्‍तिमत्त्व धारण” केलं पाहिजे. (इफिसकर ४:२३, २४) तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करत राहाल आणि नियमितपणे सभांना याल तेव्हा यहोवाबद्दल आणि त्याच्या गुणांबद्दल तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील. यहोवाच्या या सुंदर गुणांचं जीवनात अनुकरण कसं करता येईल याचा नेहमी विचार करा. आणि यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी जे काही बदल करायची गरज असेल ते करायला नेहमी तयार असा.

३. प्रगती करत राहण्यासाठी यहोवा तुम्हाला कशी मदत करेल?

बायबल म्हणतं, “देव स्वतः तुमचं प्रशिक्षण पूर्ण करेल . . . तो तुम्हाला दृढ करेल, तुम्हाला बळ देईल आणि स्थिर उभं राहायला मदत करेल.” (१ पेत्र ५:१०) चुकीच्या गोष्टी करण्याचा मोह आपल्या सगळ्यांनाच होतो. पण अशा मोहांचा प्रतिकार करण्यासाठी लागणारी मदत यहोवा आपल्याला नक्की देईल. (स्तोत्र १३९:२३, २४) त्याने वचन दिलंय, की त्याची विश्‍वासूपणे सेवा करायची इच्छा तो आपल्या मनात निर्माण करेल आणि त्यासाठी लागणारी ताकदही आपल्याला देईल.—फिलिप्पैकर २:१३ वाचा.

आणखी जाणून घेऊ या

तुम्ही पुढेही प्रगती कशी करू शकता आणि यहोवा तुम्हाला कोणकोणते आशीर्वाद देईल यावर विचार करू या.

४. तुमच्या सगळ्यात चांगल्या मित्राशी बोला आणि त्याचं ऐका

प्रार्थना केल्यामुळे आणि बायबलचा अभ्यास केल्यामुळेच तुम्ही यहोवाशी मैत्री करू शकला. मग याच गोष्टी तुम्हाला त्याच्या आणखी जवळ जाण्यासाठी कशा मदत करतील?

स्तोत्र ६२:८ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • यहोवासोबतची मैत्री घट्ट करण्यासाठी तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे प्रार्थना कशी करू शकता?

स्तोत्र १:२ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • यहोवासोबतची मैत्री घट्ट करण्यासाठी तुम्ही बायबल वाचण्याच्या तुमच्या सवयींत सुधारणा कशी करू शकता?

तुमचा वैयक्‍तिक अभ्यास अजून जास्त अर्थपूर्ण होण्यासाठी तुम्हाला काय करता येईल? याबद्दलचे काही सल्ले जाणून घेण्यासाठी, व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेल्या कोणत्या सल्ल्यांचा उपयोग करायला आवडेल?

  • तुम्हाला कोणत्या विषयांवर अभ्यास करायची इच्छा आहे?

५. यहोवाच्या सेवेत ध्येयं ठेवा

यहोवाची सेवा करताना तुम्ही तुमच्या डोळ्यांपुढे जेव्हा ध्येयं ठेवता, तेव्हा तुम्हाला प्रगती करायला मदत होते. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • यहोवाच्या सेवेत ध्येयं ठेवल्यामुळे कॅमरनला कसा फायदा झाला?

या बहिणीप्रमाणे आपण सगळेच प्रचार करण्यासाठी दुसऱ्‍या देशात जाऊ शकत नाही. पण आपल्याला गाठता येतील अशी ध्येयं आपण नक्कीच ठेवू शकतो. नीतिवचनं २१:५ वाचा, आणि मग तुम्हाला कोणती ध्येयं ठेवायची आहेत यावर विचार करा . . .

  • मंडळीत.

  • प्रचार कार्यात.

या वचनातल्या तत्त्वामुळे तुम्हाला तुमची ध्येयं गाठायला कशी मदत होईल?

काही ध्येयं

  • आणखी अर्थपूर्ण प्रार्थना करा.

  • संपूर्ण बायबल वाचून काढा.

  • मंडळीतल्या सगळ्यांशी ओळख करून घ्या.

  • एक बायबल अभ्यास सुरू करा.

  • सहायक पायनियर किंवा सामान्य पायनियर म्हणून सेवा करा.

  • जर तुम्ही एक भाऊ असाल तर सहायक सेवक बनायचा प्रयत्न करा.

६. कायम जीवनाचा आनंद घ्या!

स्तोत्र २२:२६ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • आता आणि कायम जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे?

थोडक्यात

पुढेही यहोवासोबतची तुमची मैत्री घट्ट करायचा प्रयत्न करत राहा. तसंच त्याच्या सेवेत ध्येयं ठेवून ती गाठायचा प्रयत्न करत राहा. असं केल्यामुळे तुम्ही कायम जीवनाचा आनंद घेऊ शकाल!

उजळणी

  • यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत राहायला तो तुम्हाला नक्कीच मदत करेल याची खातरी तुम्ही का बाळगू शकता?

  • तुम्ही यहोवासोबतची मैत्री घट्ट कशी करू शकता?

  • यहोवाच्या सेवेत ध्येयं ठेवल्यामुळे तुम्हाला प्रगती करत राहायला कशी मदत होईल?

ध्येय

हेसुद्धा पाहा

विश्‍वास सिद्ध करण्यासाठी आपण केलेलं एखादं मोठं काम यहोवाला जास्त मोलाचं वाटतं, की आपलं आयुष्यभर त्याला विश्‍वासू राहणं जास्त मोलाचं वाटतं?

अब्राहामसारखा विश्‍वास दाखवा  (९:२०)

यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करणाऱ्‍यांचाही आनंद कमी होऊ शकतो. तो पुन्हा कसा मिळवायचा ते पाहा.

अभ्यास आणि मनन करून हरवलेला आनंद पुन्हा मिळवा  (५:२५)