व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मी तयार आहे का?

मी तयार आहे का?

मी मंडळीसोबत प्रचार करण्यासाठी तयार आहे का?

तुम्ही बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक बनू शकता . . .

  • जर तुम्ही नियमितपणे बायबलचा अभ्यास आणि प्रार्थना करत असाल, तसंच मंडळीच्या सभांना हजर राहत असाल.

  • जर शिकत असलेल्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील, त्यांवर तुमचा विश्‍वास असेल आणि तुम्हाला त्या दुसऱ्‍यांनाही सांगाव्याशा वाटत असतील.

  • जर तुमचं यहोवावर प्रेम असेल आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍यांनाच तुम्ही जवळचे मित्र म्हणून निवडत असाल.

  • जर तुम्ही आता कुठल्याही राजकीय किंवा खोट्या धार्मिक संघटनेचा भाग नसाल.

  • जर तुम्ही यहोवाच्या स्तरांचं पालन करत असाल आणि यहोवाचे साक्षीदार बनायची तुमची इच्छा असेल.

तुम्ही मंडळीसोबत प्रचार करण्यासाठी तयार आहात असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा अभ्यास घेणारे, वडिलांसोबत तुमची भेटण्याची व्यवस्था करतील. मग तुम्ही पात्र कसे ठरू शकता याविषयी वडील तुमच्याशी चर्चा करतील.

मी बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार आहे का?

तुम्ही बाप्तिस्मा घेऊ शकता . . .

  • जर तुम्ही बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक असाल.

  • जर तुम्ही नियमितपणे जमेल तितका प्रचार करत असाल.

  • जर तुम्ही ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाकडून’ मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाला सहकार्य करत असाल आणि त्याप्रमाणे वागत असाल.—मत्तय २४:४५-४७.

  • जर तुम्ही प्रार्थनेत यहोवाला समर्पण केलं असेल आणि कायम त्याची सेवा करायची तुमची इच्छा असेल.

तुम्ही बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार आहात असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा अभ्यास घेणारे, वडिलांसोबत तुमची भेटण्याची व्यवस्था करतील. मग तुम्ही पात्र कसे ठरू शकता याविषयी वडील तुमच्याशी चर्चा करतील.