व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रस्तावना

प्रस्तावना

ख्रिस्ती जीवनासाठी उपयोगी शास्त्रवचनं  या पुस्तकामुळे तुम्हाला समस्यांचा सामना करायला मदत करणारी बायबलची वचनं आणि अहवाल शोधणं खूप सोपं होईल. तसंच, इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना चांगले निर्णय घ्यायला मदत करण्यासाठी योग्य बायबल अहवाल शोधायलाही हे पुस्तक तुम्हाला मदत करेल. त्यासाठी तुम्हाला हवा असलेला विषय निवडा. मग त्याखाली दिलेले प्रश्‍न आणि बायबल अहवालांची थोडक्यात दिलेली माहिती पाहा. (“ हे पुस्तक कसं वापरायचं?” ही चौकटपाहा.) यामुळे देवाच्या वचनातून तुम्हाला हवा असलेला सल्ला, मार्गदर्शन आणि सांत्वन मिळेल. यासोबतच, तुम्हाला इतरांना मदत करता येईल आणि त्यांना प्रोत्साहन देता येईल अशी काही वचनंही सापडतील. अशा प्रकारे देवाच्या वचनात तुम्हाला एक मोठा खजिनाच सापडेल!

या पुस्तकात एखाद्या विषयाबद्दल सगळीच वचनं दिलेली नाहीत. पण संशोधन कसं करायचं हे शिकण्यासाठी हे पुस्तक खूप सुंदर साधन आहे. (नीत २:१-६) सखोल संशोधन करण्यासाठी तुम्ही पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर  यात एखाद्या वचनाशी संबंधित असलेली इतर वचनं पाहू शकता. तसंच, तुम्ही पवित्र शास्त्र का नयी दुनिया अनुवाद यातल्या अध्ययन नोट्‌सही पाहू शकता. इतकंच नाही, तर एखाद्या वचनाचा पूर्ण अर्थ समजून घेण्यासाठी किंवा ते कसं लागू करायचं हे जाणून घेण्यासाठी, तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक  हेसुद्धा वापरू शकता. पण संशोधन करताना त्या वचनाबद्दल अलीकडे प्रकाशित झालेली माहिती पाहा.

ख्रिस्ती जीवनासाठी उपयोगी शास्त्रवचनं  या पुस्तकामुळे तुम्हाला पवित्र शास्त्रातली बुद्धी, ज्ञान आणि समज मिळो! या पुस्तकाचा उपयोग करताना “देवाचं वचन जिवंत आणि प्रभावशाली आहे” याची तुम्हाला आणखी पक्की खातरी होईल.—इब्री ४:१२.