व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सांत्वन

सांत्वन

निराशेच्या वेळी सांत्वन देणारी बायबलची वचनं

चिंता

पाहा: “चिंता

दुःख; राग; चीड

बऱ्‍याच समस्यांचा आणि अन्यायांचा सामना करावा लागत असल्यामुळे काही जण आपला आनंद गमावून बसतात

उप ९:११, १२

हेसुद्धा पाहा: स्तो १४२:४; उप ४:१; ७:७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • रूथ १:११-१३, २०—नामी आपल्या पतीच्या आणि दोन्ही मुलांच्या मृत्यूमुळे खूप दुःखी झाली आणि यहोवाने आपल्याला सोडून दिलंय असं तिला वाटलं

    • ईयो ३:१, ११, २५, २६; १०:१—सगळी संपत्ती, दहा मुलं गमावल्यामुळे आणि आजारपणामुळे ईयोब खूप दुःखी झाला

  • सांत्वन देणारी वचनं:

  • सांत्वन देणारे बायबल अहवाल:

    • रूथ १:६, ७, १६-१८; २:२, १९, २०; ३:१; ४:१४-१६—देवाच्या लोकांमध्ये परत आल्यावर, मदत मिळाल्यावर आणि इतरांना मदत केल्यावर नामीला आपला गमावलेला आनंद परत मिळाला

    • ईयो ४२:७-१६; याक ५:११—यहोवाला विश्‍वासू राहून ईयोबने सगळं काही धीराने सहन केलं आणि त्यामुळे यहोवाने त्याला भरभरून आशीर्वाद दिला

वाईट वागणूक मिळाल्यामुळे काही जण आपला आनंद गमावून बसतात

उप ४:१, २

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १शमु १:६, ७, १०, १३-१६—हन्‍नाला पनिन्‍नाकडून वाईट वागणूक मिळाल्यामुळे आणि महायाजक एलीला तिच्याबद्दल गैरसमज झाल्यामुळे ती खूप दुःखी झाली

    • ईयो ८:३-६; १६:१-५; १९:२, ३—सांत्वन द्यायला आलेले ईयोबचे तीन मित्र स्वतःलाच खूप नीतिमान समजत होते. त्यांनी ईयोबवर खोटे आरोप लावले आणि यामुळे त्याला खूप दुःख झालं

  • सांत्वन देणारी वचनं:

  • सांत्वन देणारे बायबल अहवाल:

    • १शमु १:९-११, १८—यहोवासमोर आपलं मन मोकळं केल्यावर हन्‍नाला खूप बरं वाटलं

    • ईयो ४२:७, ८, १०, १७—ईयोबने आपल्या तीन मित्रांना माफ केल्यावर यहोवाने त्याला चांगलं आरोग्य आणि आशीर्वाद दिला

दोषीपणाची तीव्र भावना

एज ९:६; स्तो ३८:३, ४, ८; ४०:१२

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २रा २२:८-१३; २३:१-३—मोशेचं नियमशास्त्र मोठ्याने वाचून दाखवल्यावर योशीया राजाला आणि त्याच्या प्रजेला जाणवलं की त्यांनी खूप मोठं पाप केलंय

    • एज ९:१०-१५; १०:१-४—काही जणांनी यहोवाची आज्ञा मोडून इतर राष्ट्रांच्या स्त्रियांशी लग्न केल्यामुळे, एज्रा आणि तिथल्या लोकांना खूप वाईट वाटलं

    • लूक २२:५४-६२—प्रेषित पेत्रने येशूला तीन वेळा नाकारल्यामुळे त्याचं मन त्याला खाऊ लागलं आणि त्याला नंतर स्वतःचीच खूप लाज वाटली

  • सांत्वन देणारी वचनं:

  • सांत्वन देणारे बायबल अहवाल:

    • २इत ३३:९-१३, १५, १६—यहूदाच्या राजांपैकी मनश्‍शे हा सगळ्यात दुष्ट होता, पण त्याने पश्‍चात्ताप केल्यामुळे यहोवाने त्याच्यावर दया केली

    • लूक १५:११-३२—आपल्या वडिलांना सोडून गेलेल्या मुलाचं उदाहरण देऊन येशूने समजवलं, की यहोवा खूप उदार आहे आणि तो पूर्णपणे क्षमा करायला तयार असतो

इतर जण आपल्यासोबत वाईट वागतात, आपल्याला दुखावतात किंवा धोका देतात तेव्हा येणारी निराशा

आपल्या कमतरता आणि पापांमुळे येणारी निराशा

आपली काही किंमत आहे का याबद्दल शंका

मोठ्या आव्हानाचा सामना करायला किंवा एखादी नेमणूक हाताळायला आपल्याला जमणार नाही असं वाटतं तेव्हा

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • निर्ग ३:११; ४:१०—देवाने मोशेला फारोशी जाऊन बोलायला आणि आपल्या लोकांना इजिप्तमधून बाहेर आणायला सांगितलं, तेव्हा ते आपल्याला जमणार नाही असं मोशे वाटलं

    • यिर्म १:४-६—यहोवाचं न ऐकणाऱ्‍या लोकांना संदेश सांगण्यासाठी आपल्याकडे काहीच अनुभव नाही आणि आपण खूप लहान आहोत असं यिर्मयाला वाटलं

  • सांत्वन देणारी वचनं:

  • सांत्वन देणारे बायबल अहवाल:

    • निर्ग ३:१२; ४:११, १२—यहोवा मोशेला त्याची नेमणूक पूर्ण करायला मदत करेल याची त्याने त्याला वारंवार खातरी करून दिली

    • यिर्म १:७-१०—यहोवाने यिर्मयाला सांगितलं की घाबरू नकोस, कारण कठीण नेमणुकीत तो त्याला मदत करणार होता

ईर्ष्या; हेवा

पाहा: “ईर्ष्या

आजारपणामुळे किंवा वाढत्या वयामुळे येणाऱ्‍या मर्यादा

स्तो ७१:९, १८; उप १२:१-७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २रा २०:१-३—हिज्कीया खूप आजारी पडला आणि मरायला टेकला तेव्हा तो ढसाढसा रडू लागला

    • फिलि २:२५-३०—एपफ्रदीत खूप निराश झाला. कारण त्याच्या आजारपणाबद्दल मंडळीला कळलं होतं. त्यामुळे आपण आपली नेमणूक पूर्ण करण्यात अपयशी ठरलो असं कदाचित मंडळीला वाटेल अशी चिंता त्याला वाटत होती

  • सांत्वन देणारी वचनं:

  • सांत्वन देणारे बायबल अहवाल:

    • २शमु १७:२७-२९; १९:३१-३८—दावीद राजाने वयस्कर बर्जिल्ल्यला खूप आदर दाखवला आणि त्याला एक नेमणूक दिली. पण खूप वय झाल्यामुळे आपण ती पूर्ण करू शकत नाही हे मान्य करून त्याने ती नम्रपणे नाकारली

    • स्तो ४१:१-३, १२—दावीद राजा खूप आजारी होता तेव्हा यहोवा आपली काळजी घेईल याची त्याला खातरी होती

    • मार्क १२:४१-४४—गरीब विधवेने दिलेल्या दानासाठी येशूने तिची प्रशंसा केली कारण तिने तिच्याजवळ होतं नव्हतं ते सगळं दिलं होतं

इतरांकडून वाईट वागणूक मिळाल्यामुळे होणारा भावनिक त्रास

पाहा: “वाईट वागणूक

अयोग्य भीती; भय

पाहा: “भीती

छळ

पाहा: “छळ