व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विश्‍वास

विश्‍वास

यहोवासाठी विश्‍वास खूप मौल्यवान आहे हे कशावरून दिसतं?

योह ३:१६, १८; गल ३:८, ९, ११; इफि ६:१६; इब्री ११:६

हेसुद्धा पाहा: २कर ५:७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • इब्री ११:१–१२:३—विश्‍वास म्हणजे काय हे प्रेषित पौलने सांगितलं; आणि हाबेलपासून येशू ख्रिस्तापर्यंत विश्‍वास दाखवणाऱ्‍या बऱ्‍याच लोकांची उदाहरणं त्याने दिली

    • याक २:१८-२४—याकोबने अब्राहामचं उदाहरण देऊन सांगितलं की विश्‍वासासोबत कार्यं करणंही महत्त्वाचंय

विश्‍वास मजबूत करायला आपल्याला कशामुळे मदत होईल?

रोम १०:९, १०, १७; १कर १६:१३; याक २:१७

हेसुद्धा पाहा: इब्री ३:१२-१४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २इत २०:१-६, १२, १३, २०-२३—शत्रूंनी देवाच्या लोकांवर हल्ला केला तेव्हा यहोशाफाट राजाने लोकांना सांगितलं, की त्यांनी जर यहोवावर आणि त्याच्या संदेष्ट्यांवर विश्‍वास ठेवला तर ते यशस्वी होतील

    • १रा १८:४१-४६—यहोवाने भयंकर दुष्काळ थांबवायचं जे वचन दिलं होतं ते पूर्ण व्हायची धीराने वाट पाहून एलीया संदेष्ट्याने विश्‍वास दाखवला