व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कुटुंब

कुटुंब

यहोवाने कुटुंबाची सुरुवात केली

आईवडील

पाहा “आईवडील

वडील

पाहा “वडील

आई

पाहा “आई

पती-पत्नी

पाहा “विवाह

मुलं आणि मुली

कुटुंबात मुलांची काय जबाबदारी आहे?

मुलांनी आईवडिलांचं का ऐकलं पाहिजे?

इफि ६:१-३; कल ३:२०

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • स्तो ७८:१-८—मुलांनी बंड करू नये तर यहोवावर भरवसा ठेवावा म्हणून इस्राएली पालकांनी मुलांना आपल्या पूर्वजांनी काय केलं याबद्दल सांगितलं

    • लूक २:५१, ५२—येशू परिपूर्ण असला तरी लहानाचा मोठा होत असताना तो आपल्या अपरिपूर्ण पालकांच्या आज्ञेत राहिला

मुलांना आईवडिलांचा आदर करणं कठीण का वाटू शकतं?

आईवडिलांचं न ऐकणाऱ्‍या मुलांबद्दल यहोवाला कसं वाटतं?

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • अनु २१:१८-२१—मोशेच्या नियमशास्त्रानुसार जर एखादा मुलगा हट्टी, बंडखोर आणि दारुडा असला, तर त्याला मृत्यूची शिक्षा दिली जायची

    • २रा २:२३, २४—काही मुलांनी जेव्हा अलीशा संदेष्ट्याची थट्टा करून खरंतर देवाच्या माणसाचा घोर अपमान केला, तेव्हा दोन अस्वलांनी त्यांना मारून टाकलं

मुलांना वाढवण्याबद्दल पालकांना कसं वाटलं पाहिजे?

स्तो १२७:३; १२८:३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • लेवी २६:९—मुलं देवाकडून मिळालेला आशीर्वाद आहे असं इस्राएली लोक मानायचे

    • ईयो ४२:१२, १३—ईयोब कठीण परिस्थितीतही यहोवाला विश्‍वासू राहिल्यामुळे यहोवाने त्याला आणि त्याच्या पत्नीला आणखी दहा मुलं देऊन आशीर्वाद दिला

भावंडांनी एकमेकांसोबत कसं वागावं असं यहोवाला वाटतं?

स्तो ३४:१४; नीत १५:२३; १९:११

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प २७:४१; ३३:१-११—याकोबने आपल्या भावाचा, एसावचा आदर करण्यासाठी आणि त्याच्याशी शांतीचे संबंध जोडण्यासाठी खूप काही केलं आणि त्यामुळे एसाव खूप आपुलकीने त्याच्याशी वागला

मुलं मोठी झाल्यावर आईवडील आणि आजीआजोबा यांच्या बाबतीत त्यांची काय जबाबदारी आहे?

नीत २३:२२; १ती ५:४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प ११:३१, ३२—ऊर देश सोडून जात असताना अब्राहामाने आपले वडील तेरह यांनाही सोबत घेतलं आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांची चांगली काळजी घेतली

    • मत्त १५:३-६—येशूने नियमशास्त्राचा उपयोग करून हे सांगितलं, की मुलं मोठी झाल्यावर आईवडिलांना गरज असते तेव्हा मुलांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे

सासरचे लोक

पाहा “सासरचे लोक

आजीआजोबा

पाहा “आजीआजोबा