व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शोक

शोक

एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा शोक करणं स्वाभाविक आहे हे बायबलमधल्या कोणत्या उदाहरणांवरून दिसतं?

शोक करणाऱ्‍यांचं सांत्वन करायला यहोवा आतूर आहे हे कशावरून दिसतं?

मेल्यावर माणसाचं काय होतं हे जाणून घेतल्यामुळे आपल्याला कशा प्रकारे दिलासा मिळतो?

उप ९:५, १०; १थेस ४:१३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • लूक २०:३७, ३८—येशूने म्हटलं की मृत लोकांचं पुनरुत्थान होईल ही गोष्ट इतकी पक्की आहे, की यहोवाच्या नजरेत ते जणू जिवंतच आहेत

    • योह ११:५, ६, ११-१४—येशूचा जवळचा मित्र लाजर वारला, तेव्हा येशूने मृत्यूची तुलना झोपेशी केली

    • इब्री २:१४, १५—प्रेषित पौलने स्पष्ट केलं, की बऱ्‍याच लोकांना मृत्यूची नको तितकी भीती वाटते; पण आपल्याला त्यांच्याइतकं मृत्यूला घाबरायची गरज नाही

जन्मापेक्षा मृत्यूचा दिवस बरा असं बायबल का म्हणतं?

बायबलमध्ये मृत्यूचं वर्णन कसं केलंय, आणि देव लवकरच काय करणार आहे?

भविष्यात पुनरुत्थान होईल याची आपल्याला पक्की खातरी का आहे?

यश २६:१९; योह ५:२८, २९; प्रेका २४:१५

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • बायबलमध्ये नऊ पुनरुत्थानांबद्दल सांगितलंय; त्यांतल्या आठ जणांचं पुनरुत्थान पृथ्वीवरच्या जीवनासाठी झालं. आपल्या प्रियजनांच्या मृत्यूमुळे जे शोक करतात त्यांना या प्रत्येक अहवालातून सांत्वन आणि आशा मिळू शकते

      • १रा १७:१७-२४—अलीशा संदेष्ट्याने सीदोन देशातल्या सारफथ नगरात राहणाऱ्‍या एका विधवेच्या मुलाचं पुनरुत्थान केलं

      • २रा ४:३२-३७—अलीशा संदेष्ट्याने शूनेममध्ये एका मुलाचं पुनरुत्थान केलं आणि त्याला त्याच्या आईवडिलांकडे दिलं

      • २रा १३:२०, २१—अलीशा संदेष्ट्याच्या हाडांचा स्पर्श झाल्यावर नुकताच मेलेला एक माणूस जिवंत झाला

      • लूक ७:११-१५—नाईन नावाच्या गावात लोक एका विधवेच्या मुलाला पुरण्यासाठी नेत होते, तेव्हा येशूने त्यांना थांबवलं आणि त्या मुलाचं पुनरुत्थान केलं

      • लूक ८:४१, ४२, ४९-५६—येशूने सभास्थानाचा अधिकारी असलेल्या याईरच्या लहान मुलीचं पुनरुत्थान केलं

      • योह ११:३८-४४—येशूने आपल्या जवळच्या मित्राचं, लाजरचं पुनरुत्थान केलं आणि यामुळे मार्था आणि मरीयाला त्यांचा भाऊ परत भेटला

      • प्रेका ९:३६-४२—इतरांसाठी बरीच चांगली काम करणाऱ्‍या दुर्कस नावाच्या एका प्रिय ख्रिस्ती बहिणीचं प्रेषित पेत्रने पुनरुत्थान केलं

      • प्रेका २०:७-१२—युतुख नावाचा एक तरुण खिडकीतून खाली पडून मेला, तेव्हा प्रेषित पौलने त्याचं पुनरुत्थान केलं

    • यहोवाने येशूचं स्वर्गात अमर जीवन जगण्यासाठी पुनरुत्थान केलं; यामुळे भविष्यात देवाची सगळी अभिवचनं नक्कीच पूर्ण होतील याची आपल्याला खातरी मिळते

    • स्वर्गातल्या जीवनासाठी पुनरुत्थान झालेला आणि अमर जीवन मिळालेला येशू पहिलाच होता. पण त्यानंतर आणखीनही काहींचं असंच पुनरुत्थान होणार होतं; ते म्हणजे १,४४,००० अभिषिक्‍त जनांचं

जवळच्या व्यक्‍तीच्या मृत्यूमुळे शोक करणाऱ्‍यांना आपण कशी मदत करू शकतो?