व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मन

मन

बायबलमधून कसं कळतं, की ‘मन’ किंवा ‘हृदय’ हे सहसा आपले विचार, हेतू, गुण आणि भावना यांना सूचित करतं?

स्तो ४९:३; नीत १६:९; लूक ५:२२; प्रेका २:२६

हेसुद्धा पाहा: अनु १५:७; स्तो १९:८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • लूक ९:४६-४८—आपल्या प्रेषितांच्या मनात श्रेष्ठ होण्याची भावना आहे हे ओळखून येशूने त्यांना सुधारण्यासाठी सल्ला दिला

आपल्या हृदयाचं रक्षण करणं महत्त्वाचं का आहे?

१इत २८:९; नीत ४:२३; यिर्म १७:९

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प ६:५-७—माणसांच्या मनातल्या दृष्टपणामुळे हिंसा वाढली होती आणि म्हणून देवाने संपूर्ण पृथ्वीवर जलप्रलय आणला

    • १रा ११:१-१०—शलमोन राजाने आपल्या मनाचं रक्षण केलं नाही. त्याने विदेशी स्त्रियांशी लग्न केलं आणि त्यांनी त्याचं मन यहोवापासून बहकवलं

    • मार्क ७:१८-२३—येशूने म्हटलं, की सगळे दुष्ट विचार माणसाच्या हृदयातून निघतात आणि देवाला घृणा वाटेल अशा गोष्ट करायला त्याला लावू शकतात

आपण आपल्या मनाचं रक्षण कसं करू शकतो?

स्तो १९:१४; नीत ३:३-६; लूक २१:३४; फिलि ४:८

हेसुद्धा पाहा: एज ७:८-१०; स्तो ११९:११

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • इफि ६:१४-१८; १थेस ५:८—आध्यात्मिक शस्त्रसामग्रीचं वर्णन करताना प्रेषित पौलने म्हटलं, की कवच जसं हृदयाचं संरक्षण करतं अगदी तसंच नीतिमत्त्व, विश्‍वास आणि प्रेम आपल्या लाक्षणिक हृदयाचं रक्षण करू शकतात

आपलं लाक्षणिक हृदय चांगल्या स्थितीत नाही हे आपल्याला कसं समजू शकतं?

नीत २१:२-४; इब्री ३:१२

हेसुद्धा पाहा: नीत ६:१२-१४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २इत २५:१, २, १७-२७—अमस्या राजा काही काळासाठी यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला, पण पूर्ण मनाने नाही; नंतर मात्र तो गर्विष्ठ आणि अविश्‍वासू बनला आणि याचे वाईट परिणाम त्याला भोगावे लागले

    • मत्त ७:१७-२०—येशूने म्हटलं, की कीड लागलेल्या झाडाला जसं खराब फळ येतं. तसंच मनात वाईट विचार असतील, तर आपल्या हातून वाईटच घडेल

आपण चांगलं मन का विकसित केलं पाहिजे, आणि आपण ते कसं करू शकतो?

नीत १०:८; १५:२८; लूक ६:४५

हेसुद्धा पाहा: स्तो ११९:९७, १०४; रोम १२:९-१६; १ती १:५

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २रा २०:१-६—हिज्कीया राजा विश्‍वासू होता आणि त्याने पूर्ण मनाने यहोवाची सेवा केली होती; म्हणून जेव्हा आजारपणामुळे तो मरायला टेकला तेव्हा त्याने मदतीसाठी यहोवाकडे कळकळून विनंती केली

    • मत्त २१:२८-३२—येशूने उदाहरण देऊन समजवलं की माणूस जे बोलतो त्यापेक्षा तो जे करतो, त्यावरून त्याच्या मनाची स्थिती कशी आहे हे कळतं

आपल्या मनात काय आहे हे यहोवा पाहू शकतो हे दिलासा देणारं का आहे?

१इत २८:९; यिर्म १७:१०

हेसुद्धा पाहा: १शमु २:३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १शमु १६:१-१३—शमुवेल संदेष्ट्याला हे शिकायला मिळालं, की यहोवा बाहेरचं रूप पाहून प्रभावित होत नाही, तर तो माणसाचं हृदय पाहतो

    • २इत ६:२८-३१—शलमोन राजाने यहोवाच्या मंदिराच्या समर्पणाच्या वेळी केलेल्या प्रार्थनेवरून दिसून आलं, की आपल्या मनात काय आहे हे यहोवा खऱ्‍या अर्थाने ओळखू शकतो. आणि त्याप्रमाणे तो आपल्याशी दयाळूपणे आणि प्रेमळपणे वागतो