व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खरेपणा

खरेपणा

खरेपणा म्हणजे काय?

स्तो १८:२३-२५; २६:१, २; १०१:२-७; ११९:१-३, ८०

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • लेवी २२:१७-२२—यहोवाची अपेक्षा होती की लोकांनी “कोणताही दोष नसलेला,” (अख्खा, पूर्णपणे निर्दोष) प्राणी त्याला अर्पण करावा. “कोणताही दोष नसलेला” यासाठी असलेल्या हिब्रू शब्दाचा आणि “खरेपणा” यासाठी असलेल्या हिब्रू शब्दाचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. हे दोन्ही शब्द एखादी गोष्ट पूर्ण किंवा अखंड असण्याला सूचित करतात. यावरून समजतं की ‘खरेपणा’ यात यहोवाला पूर्णपणे समर्पण करणं सामील आहे

    • ईयो १:१, ४, ५, ८; २:३—ईयोबच्या जीवनावरून दिसून येतं, की यहोवासोबत खरेपणाने चालण्यासाठी एखाद्याला यहोवाबद्दल गाढ आदर असला पाहिजे, त्याने त्याची मनापासून उपासना केली पाहिजे आणि त्याला न आवडणाऱ्‍या गोष्टी टाळल्या पाहिजेत

आपण खरेपणाने चालणं का गरजेचं आहे?

खरेपणाने चालत राहायला आपल्याला कोणती गोष्ट मदत करू शकते?

आपण खरेपणाचा गुण कसा वाढवू शकतो आणि तो टिकवून कसा ठेवू शकतो?

यहो २४:१४, १५; स्तो १०१:२-४

हेसुद्धा पाहा: अनु ५:२९; यश ४८:१७, १८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • ईयो ३१:१-११, १६-३३—ईयोबने अनैतिक कामं टाळली, तो इतरांशी आदराने आणि प्रेमाने वागला. तसंच तो मूर्तिपूजेच्या आणि धनसंपत्तीच्या मागे लागला नाही. असं करून त्याने दाखवलं की तो दररोजच्या जीवनात यहोवासोबत खरेपणाने चालत आहे

    • दान १:६-२१—मूर्तिपूजा करणाऱ्‍या लोकांमध्ये राहत असतानाही, दानीएल आणि त्याच्या तीन मित्रांनी दाखवून दिलं की ते सगळ्या बाबतींत, अगदी खाण्यापिण्याच्या बाबतीतसुद्धा खरेपणाने वागत आहेत

एखाद्याने एकापाठोपाठ बऱ्‍याच गंभीर चुका केल्या असतील, तर त्याला यहोवासोबत पुन्हा खरेपणाने चालता येईल का?

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १रा ९:२-५; स्तो ७८:७०-७२—दावीद राजाने मनापासून पश्‍चात्ताप केल्यामुळे यहोवाने त्याला माफ केलं. आणि खरेपणाने चालणारा म्हणून त्याला आठवणीत ठेवलं

    • यश १:११-१८—यहोवाने म्हटलं की त्याच्या लोकांनी मोठमोठी पापं केली आहेत आणि ते दोषी आहेत. पण जर त्यांनी पश्‍चात्ताप केला आणि वाईट कामं सोडून दिली तर तो त्यांना माफ करेल