व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कृपाळूपणा

कृपाळूपणा

यहोवा कृपाळू आहे हे कशावरून दिसतं?

रोम ३:२३, २४; तीत ३:३-६; इब्री २:९; १पेत्र ५:५

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • योन ३:१०; ४:११—यहोवाने पश्‍चात्ताप केलेल्या निनवेच्या लोकांना दया दाखवली आणि क्षमा केली; इतकंच काय, तर त्याने त्यांच्या प्राण्यांचीसुद्धा पर्वा केली

    • लूक ६:३२-३६—येशूने आपल्याला इतरांना दया दाखवायचं प्रोत्साहन दिलंय; कारण यहोवा अगदी उपकार न मानणाऱ्‍यांवर आणि दुष्ट लोकांवरही दया आणि कृपा करतो

आपण कोणत्या मार्गांनी इतरांना दया आणि कृपा दाखवू शकतो?

नीत १९:१७; २२:९; लूक ६:३५; इफि ४:३२

हेसुद्धा पाहा: नीत ११:१७; ३१:१०, २६; इब्री १३:१६

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • मार्क १४:३-९; योह १२:३—लाजरची बहीण मरीयाने प्रेमाने आणि उदारपणे एक चांगलं काम केलं, आणि त्याबद्दल येशूने तिची प्रशंसा केली

    • २ती १:१६-१८—प्रेषित पौल तुरुंगात असताना अनेसिफरने त्याला प्रोत्साहन दिलं