व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दया

दया

दया या गुणामध्ये आणखी कोणत्या गोष्टी सामील आहेत?

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • स्तो ५१:१, २—दावीद राजाने यहोवाकडे दयेची भीक मागितली, तेव्हा तो क्षमेसाठी आणि आपल्या पापापासून पूर्णपणे शुद्ध होण्यासाठी विनंती करत होता

    • लूक १०:२९-३७—एका यहुद्याला प्रेमळपणे मदत करणाऱ्‍या शोमरोन्याचं उदाहरण देऊन येशूने शिकवलं, की आपण दया कशी दाखवली पाहिजे

सगळ्या माणसांना दयेची का गरज आहे?

यहोवा दयाळू आहे हे कशावरून दिसून येतं?

निर्ग ३४:६; नहे ९:१७; स्तो १०३:८; २कर १:३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • ईयो ४२:१, २, ६-१०; याक ५:११—यहोवा ईयोबशी दयेने वागला आणि त्याने त्यालाही दयेने वागायला शिकवलं

    • लूक १५:११-३२—यहोवा किती दयाळू आहे हे सांगण्यासाठी येशूने पश्‍चात्ताप करणाऱ्‍या उधळ्या पुत्राचे वडील त्याच्याशी कसे वागतात हे सांगितलं

यहोवा आपल्याशी दयेने का वागतो?

ख्रिस्ताच्या बलिदानामुळे आपल्या पापांची क्षमा व्हायला कशी मदत होते?

आपण दयेसाठी प्रार्थना का केली पाहिजे आणि या अनमोल भेटीसाठी नेहमी आभारी का असलं पाहिजे?

लूक ११:२-४; इब्री ४:१६

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • स्तो ५१:१-४—दावीद राजाला आपल्या पापांमुळे खूप दोषी वाटत होतं, पण त्याने नम्रपणे यहोवाकडे दयेची भीक मागितली

    • लूक १८:९-१४—येशूने एक उदाहरण देऊन शिकवलं, की जे नम्र आहेत आणि आपल्या चुका कबूल करतात त्यांना यहोवा दया दाखवतो

गंभीर पाप केलेल्यांनासुद्धा दया दाखवली जाऊ शकते हे कशावरून कळतं?

अनु ४:२९-३१; यश ५५:७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २इत ३३:९-१३, १५—मनश्‍शे खूप दुष्ट राजा होता. पण त्याने पश्‍चात्ताप केला आणि यहोवाकडे दयेची भीक मागितली. म्हणून यहोवाने त्याला पुन्हा राजा बनवलं. आणि त्यानंतर त्याने आपल्या कामांतून दाखवून दिलं, की तो खरंच बदललाय

    • योन ३:४-१०—निनवेचे लोक खूप क्रूर होते आणि त्यांनी बऱ्‍याच लोकांना मारून टाकलं होतं. पण त्यांनी पश्‍चात्ताप केला आणि यहोवाने त्यांना दया दाखवली

यहोवाची दया मिळवण्यासाठी पाप केलेल्या व्यक्‍तीने आपलं पाप कबूल करणं आणि स्वतःत बदल करणं का महत्त्वाचंय?

यहोवाने दया दाखवल्यानंतरही आपल्याला कदाचित ताडन दिलं जाऊ शकतं आणि आपल्या चुकांचे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात

आपण इतरांना दया का दाखवली पाहिजे?

आपण जर इतरांना दया दाखवली नाही तर यहोवासोबतच्या आपल्या नात्यावर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो?

मत्त ९:१३; २३:२३; याक २:१३

हेसुद्धा पाहा: नीत २१:१३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • मत्त १८:२३-३५—येशूने उदाहरण देऊन शिकवलं, की आपण जर इतरांना दया दाखवली नाही तर यहोवासुद्धा आपल्याला दया दाखवणार नाही

    • लूक १०:२९-३७—येशूने एक उदाहरण देऊन सांगितलं, की जे दया दाखवत नाहीत त्यांच्यावर यहोवा आणि येशू खूश होत नाहीत; पण जे शोमरोनी माणसासारखी दया दाखवतात त्यांच्यावर ते खूश होतात

जे दया दाखवतात त्यांच्याशी यहोवा कसा वागतो?