व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सौम्यता

सौम्यता

यहोवा सौम्यता हा गुण दाखवतो हे आपल्याला कशावरून कळतं?

मत्त ११:२८, २९; योह १४:९

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १रा १९:१२—एलीया संदेष्टा चिंतेत होता तेव्हा यहोवा त्याच्याशी “शांत व मंद” आवाजात बोलला

    • योन ३:१०–४:११—योना यहोवाशी रागाने बोलला, पण यहोवाने सौम्यपणे त्याला दयेबद्दल शिकवलं

सौम्यतेचा गुण आपण कसा दाखवू शकतो?

नीत १५:१; इफि ४:१-३; तीत ३:२; याक ३:१३, १७; १पेत्र ३:१५

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • गण ११:२६-२९—संदेष्ट्यांसारखं वागणाऱ्‍या दोन माणसांना मोशेने थांबवावं असं यहोशवाने त्याला सांगितलं, पण मोशेने त्याला खूप सौम्यपणे उत्तर दिलं

    • शास ८:१-३—एफ्राईमची माणसं न्यायाधीश गिदोनवर चिडली आणि त्यांनी त्याच्याशी वाद घातला, तेव्हा गिदोन त्यांच्याशी खूप सौम्यपणे वागला आणि त्यामुळे त्यांचा राग शांत झाला