व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आज्ञा पाळणं

आज्ञा पाळणं

आज्ञा पाळणं का महत्त्वाचंय?

निर्ग १९:५; अनु १०:१२, १३; उप १२:१३; याक १:२२

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १शमु १५:१७-२३—शौल राजाने आज्ञा मोडल्यामुळे शमुवेल संदेष्ट्याने त्याला फटकारलं; नंतर आज्ञा पाळण्याचं महत्त्व त्याला समजावलं

    • इब्री ५:७-१०—येशू नेहमीच आपल्या पित्याच्या आज्ञेत राहिला. पण पृथ्वीवर त्याला खूप काही सोसावं लागलं आणि त्यांतून तो आज्ञाधारकता शिकला

एखाद्या अधिकाऱ्‍याने आपल्याला देवाची आज्ञा मोडायला लावली तर आपण काय केलं पाहिजे?

प्रेका ५:२९

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • दान ३:१३-१८—जीवाला धोका असतानाही तीन विश्‍वासू इब्री तरुणांनी, नबुखद्‌नेस्सर राजाने उभ्या केलेल्या मूर्तीची उपासना केली नाही

    • मत्त २२:१५-२२—येशूने सांगितलं की सरकारी अधिकारी जोपर्यंत त्याच्या शिष्यांना देवाच्या आज्ञा मोडायला लावत नाहीत, तोपर्यंत त्यांनी त्यांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत

    • प्रेका ४:१८-३१—अधिकाऱ्‍यांनी प्रेषितांना प्रचारकार्य थांबवायचा आदेश दिला, पण तरीही ते धैर्याने प्रचार करत राहिले

आपल्याला नेहमी यहोवाच्या आज्ञांचं पालन करता यावं म्हणून आपण काय केलं पाहिजे?

अनु ६:१-५; स्तो ११२:१; १यो ५:२, ३

हेसुद्धा पाहा: स्तो ११९:११, ११२; रोम ६:१७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • एज ७:७-१०—विश्‍वासू एज्रा याजकाने देवाच्या नियमशास्त्राचं पालन करण्याच्या बाबतीत आणि ते इतरांना शिकवण्याच्या बाबतीत चांगलं उदाहरण मांडण्यासाठी स्वतःचं मन तयार केलं

    • योह १४:३१—पित्याने आज्ञा दिल्याप्रमाणेच आपण काम का करतो हे येशूने सांगितलं

यहोवा आणि येशूची आज्ञा पाळायला आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे प्रेरणा मिळते?

आज्ञा पाळण्यावरून आपला विश्‍वास कसा दिसतो?

रोम १:५; १०:१६, १७; याक २:२०-२३

हेसुद्धा पाहा: अनु ९:२३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प ६:९-२२; इब्री ११:७—यहोवाने आज्ञा दिली होती अगदी त्याच प्रकारे नोहाने जहाज बनवलं. अशा प्रकारे, त्याला सांगितलं होतं ‘अगदी तसंच त्याने केलं’

    • इब्री ११:८, ९, १७—अब्राहामने देवाच्या आज्ञेवरून ऊर देश तर सोडलाच, पण तो आपल्या मुलाचं अर्पण द्यायलाही तयार झाला. यावरून त्याने देवावरचा आपला विश्‍वास दाखवून दिला

आज्ञांचं पालन करणाऱ्‍यांना यहोवा कसा आशीर्वाद देतो?

यिर्म ७:२३; मत्त ७:२१; १यो ३:२२

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • लेवी २६:३-६—यहोवाच्या आज्ञांचं पालन करणाऱ्‍यांना तो वचन देतो, की तो त्यांची काळजी घेईल आणि त्यांना आशीर्वाद देईल

    • गण १३:३०, ३१; १४:२२-२४—कालेबने नेहमी यहोवाचं ऐकलं म्हणून यहोवाने त्याला आशीर्वाद दिले

आपण आज्ञांचं पालन केलं नाही तर काय होईल?

रोम ५:१९; २थेस १:८, ९

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प २:१६, १७; ३:१७-१९—आदाम-हव्वाने देवाची आज्ञा मोडल्यामुळे त्यांनी नंदनवनासारखं आपलं घर, परिपूर्णता आणि सर्वकाळाचं जीवन गमावलं

    • अनु १८:१८, १९; प्रेका ३:१२, १८, २२, २३—यहोवाने भविष्यवाणी केली की मोशेपेक्षा एक मोठा संदेष्टा येईल आणि जे त्याच्या आज्ञेचं पालन करणार नाहीत त्यांना तो शिक्षा करेल

    • यहू ६, ७—बंडखोर स्वर्गदूतांनी आणि सदोम व गमोरामध्ये राहणाऱ्‍या लोकांनी यहोवाची आज्ञा पाळली नाही आणि त्यामुळे यहोवाचा राग भडकला

आपण येशू ख्रिस्ताची आज्ञा का पाळली पाहिजे?

उत्प ४९:१०; मत्त २८:१८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • योह १२:४६-४८; १४:२४—येशूने सांगितलं की त्याच्या आज्ञा न पाळणाऱ्‍यांना भयानक परिणाम भोगावे लागतील

भाऊबहीण मंडळीत नेतृत्व करणाऱ्‍यांच्या आज्ञेत का राहतात?

ख्रिस्ती पत्नीने आपल्या पतीच्या अधीन का असलं पाहिजे?

मुलांनी आईवडिलांच्या आज्ञेत का राहिलं पाहिजे?

नीत २३:२२; इफि ६:१; कल ३:२०

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प ३७:३, ४, ८, ११-१३, १८—योसेफ तरुण असताना त्याचे भाऊ त्याचा द्वेष करायचे, तरी त्याने आपल्या पित्याची आज्ञा पाळली आणि तो त्यांना भेटायला गेला

    • लूक २:५१—येशू परिपूर्ण होता पण तरी तो आपल्या अपरिपूर्ण आईवडिलांच्या, योसेफ आणि मरीयाच्या अधीन राहिला

कामाच्या ठिकाणी आपल्याला कोणी पाहत नसलं तरी आपण आपल्या मालकाच्या अधीन का राहिलं पाहिजे?

आपण सरकारच्या अधीन का राहतो?