व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

म्हातारपण; वयस्कर लोक

म्हातारपण; वयस्कर लोक

आपलं वय वाढत जातं तसं काय होतं?

स्तो ७१:९; ९०:१०

हेसुद्धा पाहा: “सांत्वन—आजारपणामुळे किंवा वाढत्या वयामुळे येणाऱ्‍या मर्यादा

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उप १२:१-८—शलमोन राजाने कवितेच्या रूपात सांगितलं की म्हातारपणामुळे कोणते त्रास होतात. जसं की, दृष्टी कमी होते (“खिडक्यांतून डोकावणाऱ्‍या स्त्रियांना बाहेर अंधार दिसेल”) आणि ऐकायला कमी येतं (“सगळ्या मुली अगदी हळू आवाजात गातील”)

वयस्कर लोकांना वाढत्या वयामुळे त्रास होत असला आणि मर्यादा येत असल्या तरी ते आनंदी राहू शकतात का?

२कर ४:१६-१८; याक १:२-४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १शमु १२:२, २३—शमुवेल संदेष्टा वृद्ध झाला होता, तरी देवाच्या लोकांसाठी प्रार्थना करत राहणं किती महत्त्वाचंय हे त्याला माहीत होतं

    • २शमु १९:३१-३९—वयस्कर बर्जिल्ल्यने दावीद राजाला केलेल्या मदतीसाठी दावीदने त्याचे आभार मानले आणि त्याला आणखी जबाबदारी दिली. पण बर्जिल्ल्यने आपल्या मर्यादा ओळखून ती नम्रपणे नाकारली

    • स्तो ७१:९, १८—दावीदचं वय झाल्यामुळे त्याला वाटलं, की तो आता यहोवाच्या काहीच कामाचा नाही. तेव्हा त्याने यहोवाला विनंती केली की त्याने त्याला सोडून देऊ नये, म्हणजे त्याला पुढच्या पिढीला यहोवाबद्दल सांगता येईल

    • लूक २:३६-३८—संदेष्टी हन्‍ना विधवा असून खूप म्हातारी झाली होती. पण तिने दाखवलेल्या विश्‍वासासाठी आणि सेवेसाठी यहोवाने तिला आशीर्वाद दिला

यहोवा वयस्कर लोकांना मौल्यवान समजतो हे तो त्यांना कसं दाखवून देतो?

स्तो ९२:१२-१४; नीत १६:३१; २०:२९; यश ४६:४; तीत २:२-५

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प १२:१-४—अब्राहाम ७५ वर्षांचा झाला, तेव्हा यहोवाने त्याला त्याचं जीवन बदलून टाकणारी नेमणूक दिली

    • दान १०:११, १९; १२:१३—नव्वदीत असलेल्या दानीएलला एक स्वर्गदूत भेटतो आणि त्याला सांगतो की तो यहोवासाठी खूप मौल्यवान आहे आणि त्याच्या विश्‍वासूपणासाठी यहोवा त्याला नक्की प्रतिफळ देईल

    • लूक १:५-१३—वयस्कर झालेल्या जखऱ्‍या आणि अलीशिबाला यहोवा चमत्कार करून एक मुलगा देतो. त्याचं नाव योहान

    • लूक २:२५-३५—पुढे जाऊन जो मसीहा होणार होता, त्याला पाहायचा एक मोठा बहुमान यहोवाने वयस्कर झालेल्या शिमोनला दिला. आणि शिमोनने देवाच्या प्रेरणेने मसीहाबद्दल एक भविष्यवाणी केली

    • प्रेका ७:२३, ३०-३६—यहोवाने त्याच्या लोकांचं, इस्राएलचं नेतृत्व करण्यासाठी मोशेला निवडलं, तेव्हा तो ८० वर्षांचा होता

विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करणाऱ्‍या वयस्क भाऊबहिणींशी आपण कसं वागलं पाहिजे?

लेवी १९:३२; १ती ५:१

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प ४५:९-११; ४७:१२—योसेफ आपल्या वृद्ध वडिलांना, याकोबला त्याच्याकडे बोलावून घेतो आणि शेवटपर्यंत त्यांची काळजी घेतो

    • रूथ १:१४-१७; २:२, १७, १८, २३—रूथने वृद्ध नामीला आपल्या शब्दांनी आधार दिला. तसंच, तिच्यासाठी चांगल्या गोष्टीही केल्या

    • योह १९:२६, २७—येशूने मृत्यूआधी आपल्या आईची जबाबदारी त्याच्या प्रिय प्रेषिताला, योहानला दिली

ख्रिश्‍चन कोणत्या व्यावहारिक मार्गांनी मंडळीतल्या वयस्कर भाऊबहिणींना मदत करू शकतात?