व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रार्थना

प्रार्थना

यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो आणि त्यांची उत्तरं देतो हे कशावरून कळतं?

स्तो ६५:२; १४५:१८; १यो ५:१४

हेसुद्धा पाहा: स्तो ६६:१९; प्रेका १०:३१; इब्री ५:७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १रा १८:३६-३८—कर्मेल डोंगरावर बआलच्या संदेष्ट्यांचा सामना करताना एलीया संदेष्ट्याने प्रार्थना केली तेव्हा यहोवाने ती लगेच ऐकली

    • मत्त ७:७-११—येशूने आपल्याला सतत प्रार्थना करायचं प्रोत्साहन दिलं आणि याची खातरी दिली, की आपला प्रेमळ पिता यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो

ख्रिश्‍चनांनी फक्‍त कोणाला प्रार्थना केली पाहिजे?

आपण कोणाच्या नावाने प्रार्थना करतो?

यहोवा कोणाच्या प्रार्थना ऐकतो?

यहोवा कोणाच्या प्रार्थना ऐकत नाही?

नीत १५:२९; २८:९; यश १:१५; मीख ३:४; याक ४:३; १पेत्र ३:७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • यहो २४:९, १०—यहोवाने बलामची प्रार्थना ऐकली नाही, कारण त्याने जे मागितलं ते यहोवाच्या इच्छेविरुद्ध होतं

    • यश १:१५-१७—यहोवाने त्याच्या लोकांच्या प्रार्थना ऐकल्या नाहीत, कारण ते ढोंगी आणि रक्‍तदोषी होते

प्रार्थनेच्या शेवटी आपण काय म्हटलं पाहिजे, आणि का?

आपण एका विशिष्ट स्थितीतच प्रार्थना केली पाहिजे असं बायबल सांगतं का?

आपण उपासनेसाठी एकत्र येतो तेव्हा कोणकोणत्या गोष्टींसाठी आपण प्रार्थना करू शकतो?

प्रेका ४:२३, २४; १२:५

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १इत २९:१०-१९—इस्राएली लोकांनी मंदिराच्या बांधकामासाठी वेगवेगळ्या गोष्टी दान केल्या, तेव्हा दावीद राजाने सगळ्या लोकांसमोर प्रार्थना केली

    • प्रेका १:१२-१४—येशूचे प्रेषित, त्याचे भाऊ, त्याची आई मरीया आणि इतर विश्‍वासू स्त्रिया यरुशलेममध्ये माडीवरच्या खोलीत एकत्र मिळून प्रार्थना करत होते

प्रार्थना करताना आपण बढाई मारायचा किंवा इतरांवर छाप पाडायचा प्रयत्न का करू नये?

जेवणाआधी आपण प्रार्थना का केली पाहिजे?

आपण यहोवाला नियमित प्रार्थना का केली पाहिजे?

रोम १२:१२; इफि ६:१८; १थेस ५:१७; १पेत्र ४:७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • दान ६:६-१०—यहोवाला प्रार्थना केल्यामुळे आपल्याला मृत्यूदंड दिला जाईल हे माहीत असूनही दानीएल संदेष्ट्याने आपल्या सवयीनुसार उघडपणे प्रार्थना केली

    • लूक १८:१-८—आपण वारंवार प्रार्थना केली तर यहोवा लगेच उत्तर देईल, ही गोष्ट समजावण्यासाठी येशूने एका अनीतिमान न्यायाधीशाचं उदाहरण दिलं; हा न्यायाधीश एका विधवेने वारंवार केलेली विनंती शेवटी ऐकतो

आपण क्षमेसाठी केलेल्या प्रार्थना यहोवाने ऐकाव्यात असं आपल्याला वाटत असेल तर आपली मनोवृत्ती कशी असली पाहिजे?

२इत ७:१३, १४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २रा २२:११-१३, १८-२०—योशीया राजा नम्र झाला आणि त्याने यहोवाचं मन आनंदित करायचा प्रयत्न केला, म्हणून यहोवाने त्याला दया दाखवली

    • २इत ३३:१०-१३—मनश्‍शे राजाने नम्र होऊन यहोवाला प्रार्थना केली. त्यामुळे यहोवाने त्याला माफ केलं आणि त्याचं राज्यपद त्याला परत दिलं

यहोवाने आपल्याला क्षमा करावी म्हणून आपण काय केलं पाहिजे?

यहोवाची इच्छा पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटतं, ही गोष्ट आपण त्याला प्रार्थनेत का सांगितली पाहिजे?

आपल्या स्वर्गातल्या पित्यावर आपला विश्‍वास आहे हे आपल्या प्रार्थनांमधून का दिसून आलं पाहिजे?

आपण कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना केली पाहिजे?

देवाचं नाव पवित्र होण्यासाठी

पृथ्वीवर देवाचं राज्य येण्यासाठी

यहोवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी

आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी

आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी

मोहांपासून संरक्षण करण्यासाठी

आभार मानण्यासाठी

देवाच्या इच्छेबद्दलचं ज्ञान मिळवण्यासाठी, समजशक्‍तीसाठी आणि बुद्धीसाठी

नीत २:३-६; फिलि १:९; याक १:५

हेसुद्धा पाहा: स्तो ११९:३४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १रा ३:११, १२—शलमोन राजाने यहोवाकडे समजशक्‍ती मागितली. त्यामुळे यहोवा खूश झाला आणि यहोवाने त्याला मोठ्या प्रमाणात बुद्धी दिली

पवित्र शक्‍ती मिळण्यासाठी

भाऊबहिणींसाठी आणि छळाचा सामना करणाऱ्‍यांसाठी

देवाची स्तुती करण्यासाठी

स्तो ८६:१२; यश २५:१; दान २:२३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • लूक १०:२१—यहोवाने नम्र लोकांना सत्य कळू दिलं म्हणून येशूने उघडपणे त्याची स्तुती केली

    • प्रक ४:९-११—यहोवाचं स्वर्गातलं कुटुंब त्याचा गौरव आणि सन्मान करतं; कारण तो त्यालाच मिळाला पाहिजे

अधिकाऱ्‍यांनी आपल्याला शांतीने यहोवाची उपासना आणि प्रचार करू द्यावा यासाठी

बाप्तिस्म्याच्या वेळी प्रार्थना करणं योग्य आहे का?

यहोवासोबतचं नातं कमजोर झालेल्यांसाठी प्रार्थना करणं योग्य आहे का?

ख्रिस्ती बांधव प्रार्थना करताना सहसा डोकं का झाकत नाहीत, आणि ख्रिस्ती बहिणी काही वेळा प्रार्थना करताना डोकं का झाकतात?

आपल्या प्रार्थना किती मोठ्या आहेत किंवा आपण त्या किती भावूकपणे करतो यापेक्षा काय जास्त महत्त्वाचंय?

विल ३:४१; मत्त ६:७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १रा १८:२५-२९, ३६-३९—एलीया संदेष्ट्याने बआलच्या संदेष्ट्यांना जेव्हा आव्हान दिलं, तेव्हा ते कितीतरी वेळ मोठमोठ्याने ओरडून त्यांच्या देवाचा धावा करत होते; पण काहीच उपयोग झाला नाही

    • प्रेका १९:३२-४१—इफिसमधले मूर्तिपूजक लोक अर्तमी देवीचा तब्बल दोन तास जीव तोडून धावा करत राहिले. पण त्यांना काहीच उत्तर मिळालं नाही; उलट नगर-प्रमुखाने त्यांना खडसावलं