व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आनंदाच्या संदेशाचा प्रचार

आनंदाच्या संदेशाचा प्रचार

खरे ख्रिस्ती आपल्या विश्‍वासाबद्दल इतरांशी का बोलतात?

येशूसाठी प्रचार करणं किती महत्त्वाचं होतं?

लूक ८:१; योह १८:३७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • लूक ४:४२-४४—येशूने म्हटलं की त्याला प्रचार करण्यासाठी पृथ्वीवर पाठवण्यात आलंय

    • योह ४:३१-३४—येशूने सांगितलं की प्रचाराचं काम त्याच्यासाठी अन्‍नासारखं आहे

मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍या बांधवांवरच फक्‍त प्रचाराची जबाबदारी आहे का?

स्तो ६८:११; १४८:१२, १३; प्रेका २:१७, १८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २रा ५:१-४, १३, १४, १७​—एक लहान इस्राएली मुलगी नामानच्या बायकोला यहोवाच्या संदेष्ट्याबद्दल, अलीशाबद्दल सांगते

    • मत्त २१:१५, १६—मंदिरात लहान मुलं येशूची स्तुती करत होते तेव्हा मुख्य याजकांना आणि शास्त्र्यांना राग आला. पण येशूने त्यांना त्यांची चूक दाखवून दिली

मंडळीत पुढाकार घेणारे बांधव इतरांना आनंदाच्या संदेशाचा प्रचार करायला कसं शिकवू शकतात?

यहोवा आणि येशू आपल्याला प्रचाराचं काम करायला कशी मदत करतात?

२कर ४:७; फिलि ४:१३; २ती ४:१७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • प्रेका १६:१२, २२-२४; १थेस २:१, २—प्रेषित पौल आणि त्याच्या साथीदारांना खूप वाईट वागणूक देण्यात आली, पण तरी देवाच्या मदतीने ते धैर्याने प्रचाराचं काम करत राहिले

    • २कर १२:७-९—प्रेषित पौलच्या “शरीरात एक काटा रुतवण्यात आला” होता. ही कदाचित एक आरोग्याची समस्या असावी. पण तरी यहोवाच्या मदतीने तो आवेशाने प्रचाराचं काम करत राहिला

ख्रिश्‍चनांना प्रचार करायचा अधिकार कोणाकडून मिळालाय?

१कर १:२६-२८; २कर ३:५; ४:१३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • योह ७:१५—येशूने कोणत्याही धर्मगुरूंच्या शाळेतून शिक्षण घेतलं नव्हतं, तरी त्याला शास्त्राचं इतकं ज्ञान कसं आहे याचं लोकांना आश्‍चर्य वाटलं

    • प्रेका ४:१३—येशूचे शिष्य अशिक्षित आणि सर्वसाधारण आहेत असं काहींना वाटायचं. पण धैर्याने प्रचार करायला त्यांना भीती वाटली नाही

आपण इतरांना प्रचार करायचं आणि शिकवायचं प्रशिक्षण द्यावं अशी यहोवाची इच्छा आहे हे कशावरून कळतं?

मार्क १:१७; लूक ८:१; इफि ४:११, १२

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • यश ५०:४, ५—येशू पृथ्वीवर येण्याआधी यहोवाने स्वतः त्याला प्रशिक्षण दिलं

    • मत्त १०:५-७—पृथ्वीवर असताना येशूने धीराने त्याच्या शिष्यांना प्रचाराचं काम करायला शिकवलं

आनंदाचा संदेश सांगण्याच्या जबाबदारीबद्दल आपल्याला कसं वाटलं पाहिजे?

आपण प्रचार काम करतो तेव्हा आपल्याला कसं वाटतं?

आपण प्रचार करताना लोकांना कोणत्या गोष्टींबद्दल सांगतो?

आपण खोट्या शिकवणींचा पर्दाफाश का करतो?

२कर १०:४, ५

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • मार्क १२:१८-२७—सदूकी लोक पुनरुत्थानावर विश्‍वास ठेवत नव्हते. त्यामुळे येशूने शास्त्रवचनांतून त्यांना दाखवून दिलं की ते किती चुकीचा विचार करत होते

    • प्रेका १७:१६, १७, २९, ३०—प्रेषित पौलने अथेन्सच्या लोकांना तर्क करून सांगितलं, की मूर्तिपूजा करणं कसं चुकीचंय

प्रचाराचं काम कसं केलं जातं?

आपण सार्वजनिक साक्षकार्य का करतो?

प्रचाराच्या कामासाठी धीराची आणि चिकाटीची गरज का आहे?

प्रचार कामामुळे कोणते परिणाम दिसून येतात?

ख्रिश्‍चनांनी मिळेल त्या संधीचा उपयोग करून साक्ष का दिली पाहिजे?

१कर ९:२३; १ती २:४; १पेत्र ३:१५

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • योह ४:६, ७, १३, १४—येशू दमला होता तरी त्याने सार्वजनिक ठिकाणी असलेल्या विहिरीजवळ आलेल्या शोमरोनी स्त्रीला साक्ष दिली

    • फिलि १:१२-१४—प्रेषित पौल आपल्या विश्‍वासासाठी तुरुंगात होता, तरी इतरांना साक्ष आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्याने मिळेल त्या संधीचा उपयोग केला

सगळेच लोक आपला संदेश ऐकतील अशी अपेक्षा आपण ठेवावी का?

योह १०:२५, २६; १५:१८-२०; प्रेका २८:२३-२८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • यिर्म ७:२३-२६—यहोवाच्या लोकांनी कशा प्रकारे वारंवार त्याच्या संदेष्ट्यांचं ऐकलं नाही, हे यहोवाने यिर्मया संदेष्ट्याद्वारे सांगितलं

    • मत्त १३:१०-१६—येशूने सांगितलं की यशयाच्या दिवसांप्रमाणेच बरेच लोक त्याचा संदेश ऐकतील खरं, पण तो स्वीकारणार नाहीत

आज बरेचसे लोक आपला संदेश ऐकत नाहीत याचं आपल्याला नवल का वाटत नाही?

काही जण सुरुवातीला संदेश ऐकतील आणि आवड घेतील, पण नंतर तो स्वीकारणार नाहीत हे कशावरून कळतं?

काही जण प्रचारकार्याचा विरोध करतील तेव्हा आपल्याला आश्‍चर्य वाटू नये, हे कोणत्या उदाहरणांवरून समजायला मदत होते?

प्रचारकार्याला विरोध झाल्यावर आपण काय करतो?

आनंदाचा संदेश काही जण ऐकून घेतील याची आपल्याला पक्की खातरी का आहे?

आनंदाचा संदेश माहीत झाल्यावर आपण काय केलं पाहिजे?

आपण सगळ्याच धर्माच्या, वंशाच्या आणि राष्ट्राच्या लोकांना प्रचार का केला पाहिजे?

आठवड्याच्या कोणत्याही दिवशी, इतकंच काय तर शब्बाथाच्या दिवशीही प्रचार करणं योग्य आहे का?

आपण सगळ्यांनाच, मग ज्यांच्याकडे बायबल आहे किंवा जे स्वतःचा धर्म पाळतात त्यांनाही आनंदाचा संदेश सांगितला पाहिजे हे कोणत्या उदाहरणांवरून कळतं?