व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उपासना

उपासना

आपण फक्‍त कोणाची उपासना केली पाहिजे?

निर्ग ३४:१४; अनु ५:८-१०; यश ४२:८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • मत्त ४:८-१०—सैतानाने येशूपुढे असा प्रस्ताव मांडला, की त्याने जर फक्‍त एकदा त्याची उपासना केली, तर तो जगातली सगळी राज्यं त्याला देईल. पण येशूने सैतानाला नकार दिला, कारण फक्‍त यहोवाची उपासना करण्याचा त्याचा निश्‍चय पक्का होता

    • प्रक १९:९, १०—प्रेषित योहानने एका शक्‍तिशाली स्वर्गदूताची उपासना करायचा प्रयत्न केला, तेव्हा स्वर्गदूताने त्याला तसं करण्यापासून थांबवलं

आपली उपासना कशी केली जावी अशी यहोवा अपेक्षा करतो?

योह ४:२४; याक १:२६, २७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • यश १:१०-१७—जे लोक ढोंगीपणे यहोवाची उपासना करतात आणि त्याच्या स्तरांनुसार जगत नाहीत, अशा लोकांच्या उपासनेचा यहोवाला तिरस्कार आहे आणि तो ती स्वीकारत नाही

    • मत्त १५:१-११—येशूच्या शब्दांवरून कळतं, की मानवी परंपरांवर आधारित असलेली उपासना देव स्वीकारत नाही. कारण या परंपरा देवाच्या नियमांपेक्षा मानवांनी बनवलेल्या नियमांना जास्त महत्त्व देतात

जेव्हा-जेव्हा शक्य असेल तेव्हा-तेव्हा आपण कोणासोबत यहोवाची उपासना केली पाहिजे?

इब्री १०:२४, २५

हेसुद्धा पाहा: स्तो १३३:१-३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • प्रेका २:४०-४२—पहिल्या शतकातले ख्रिस्ती सोबत मिळून प्रार्थना करायचे, सोबत वेळ घालवायचे आणि पवित्र शक्‍तीने प्रेरित झालेल्या शिकवणींचा अभ्यास करायचे

    • १कर १४:२६-४०—प्रेषित पौलने मंडळ्यांना सांगितलं की त्यांच्या सभा सुव्यवस्थित आणि प्रोत्साहन देणाऱ्‍या असल्या पाहिजेत. यामुळे ऐकणाऱ्‍यांना शिकवलेल्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजतील

यहोवाला आपली उपासना मान्य असण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

मत्त ७:२१-२४; १यो २:१७; ५:३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • इब्री ११:६—प्रेषित पौलने सांगितलं की यहोवाने आपली उपासना स्वीकारावी असं जर आपल्याला वाटत असेल तर, आपल्यामध्ये विश्‍वास असणं महत्त्वाचंय

    • याक २:१४-१७, २४-२६—येशूचा भाऊ याकोबने समजवलं की विश्‍वासासोबत कार्यं करणंही महत्त्वाचंय; कारण विश्‍वास आपल्याला कार्यं करायचं प्रोत्साहन देतो