व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी


या पत्रिकेतल्या धड्यांचा पूर्ण फायदा घेण्यासाठी

या पत्रिकेतल्या धड्यांचा पूर्ण फायदा घेण्यासाठी

मदत घ्या: ज्यांनी तुम्हाला ही पत्रिका दिली, त्यांना तुमच्यासोबत बायबल अभ्यास करायची विनंती करा. किंवा jw.org या आमच्या वेबसाईटवर दिलेला विनंती फॉर्म भरा.

पहिला भाग

प्रत्येक परिच्छेद वाचा. मुख्य मुद्द्‌यांकडे लक्ष वेधणारे (१) ठळक अक्षरातले प्रश्‍न आणि (२) वचनं वाचा. तसंच, “वाचा” असा उल्लेख केलेल्या वचनांकडेही खास लक्ष द्या.

दुसरा भाग

आणखी जाणून घेऊ या  याखाली दिलेली (३) सुरुवातीची वाक्यं पुढे दिलेल्या माहितीचा सारांश देतात. (४) उपशीर्षकं धड्यातल्या मुख्य मुद्द्‌यांकडे लक्ष वेधतात. वचनं वाचा, प्रश्‍नांची उत्तरं द्या आणि (५) व्हिडिओ पाहा.

(६) चित्रं आणि त्याखालच्या वाक्यावर विचार करा. त्यानंतर (७) काही जण म्हणतात  यातल्या विधानांना कसं उत्तर देता येईल याचा विचार करा.

तिसरा भाग

धड्याच्या शेवटी (८) थोडक्यात  आणि उजळणी  हे भाग आहेत. धडा संपवला, ती तारीख लिहून ठेवा. (९) ध्येय यात करण्यासारख्या काही गोष्टी सुचवल्या आहेत. (१०) हेसुद्धा पाहा यात आवडीप्रमाणे पाहण्यासाठी व्हिडिओ आणि लेखही आहेत.

बायबलची वचनं कशी शोधायची?

बायबलच्या वचनांत सगळ्यात आधी (१) पुस्तकाचं नाव, मग (२) अध्याय आणि त्यानंतर (३) वचन किंवा वचनं दिलेली असतात. उदाहरणार्थ योहान १७:३ म्हणजे योहानच्या पुस्तकामध्ये, १७ व्या अध्यायातलं, ३ रं वचन.