व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नियमन मंडळाकडून पत्र

नियमन मंडळाकडून पत्र

प्रिय भाऊबहिणींनो:

देवावर आणि लोकांवर आपलं प्रेम असल्यामुळे आपण ‘सगळ्या राष्ट्राच्या लोकांना शिष्य बनवतो आणि त्यांना बाप्तिस्मा देतो.’ (मत्त. २८:१९, २०; मार्क १२:२८-३१) निःस्वार्थ प्रेमात खूप ताकद असते. त्यामुळे आपण “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असणाऱ्‍या” लोकांना मदत करू शकतो.—प्रे. कार्यं १३:४८.

पूर्वी आपण सादरीकरण पाठ करण्यावर आणि प्रकाशनं देण्यावर जास्त भर द्यायचो. पण आता लोकांशी सहजपणे बोलण्याचं कौशल्य आपण वाढवलं पाहिजे. लोकांना आवडणाऱ्‍या विषयांवर बोलून आपण त्यांच्यावर प्रेम असल्याचं दाखवतो. यासाठी आपण प्रत्येक व्यक्‍तीची आवड काय आहे आणि तिला कोणत्या गोष्टीची चिंता आहे, यावर विचार करून त्याप्रमाणे बदल करायला तयार असलं पाहिजे. असं करण्यासाठी हे माहितीपत्रक आपल्याला कशी मदत करू शकतं?

या माहितीपत्रकात १२ धडे आहेत. लोकांवर प्रेम करण्यासाठी आणि शिष्य बनवण्यासाठी जे गुण आपल्याला वाढवायची गरज आहे त्या गुणांबद्दल यांत सांगितलंय. प्रत्येक धडा एका बायबल अहवालावर आधारित आहे. त्यात येशूने किंवा पहिल्या शतकातल्या विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी सेवाकार्यात दाखवलेल्या एका विशिष्ट गुणाबद्दल सांगितलंय. आपला उद्देश सादरीकरण पाठ करणं नाही, तर लोकांना कोणत्या मार्गांनी प्रेम दाखवता येईल हे पाहणं आहे. खरंतर सेवाकार्याच्या सगळ्याच पैलूंमध्ये प्रत्येक गुण गरजेचा आहे. पण संभाषण सुरू करण्यासाठी, पुन्हा भेटण्यासाठी किंवा बायबल अभ्यास चालवण्यासाठी काही गुण जास्त गरजेचे आहेत. ते कोणते, त्यांबद्दलच आपण या माहितीपत्रकात पाहणार आहोत.

तुम्ही प्रत्येक धडा वाचता तेव्हा तुमच्या परिसरातल्या लोकांशी बोलताना तो गुण कसा दाखवू शकता याचा विचार करा. यहोवावर आणि लोकांवर असलेलं प्रेम आणखी वाढवायचा प्रयत्न करा. कोणत्याही विशिष्ट पद्धतीपेक्षा हे प्रेमच तुम्हाला शिष्य बनवायचं ध्येय पूर्ण करायला मदत करेल.

तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणं हा आमच्यासाठी खरंच खूप मोठा बहुमान आहे. (सफ. ३:९) तेव्हा लोकांवर प्रेम करा आणि शिष्य बनवा! आणि तुमच्या या कामावर यहोवा असाच भरभरून आशीर्वाद देवो!

तुमचे भाऊ,

यहोवाच्या साक्षीदारांचं नियमन मंडळ