व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संभाषण सुरू करण्यासाठी

धडा १

इतरांचा विचार करा

इतरांचा विचार करा

तत्त्व:  “फक्‍त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू नका, तर इतरांच्या फायद्याचाही विचार करा.”​—फिलिप्पै. २:४.

येशूने काय केलं?

१. व्हिडिओ पाहा किंवा योहान ४:६-९ वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  1.   क. येशूने त्या स्त्रीशी बोलण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या?

  2.  ख. येशू म्हणाला: “मला प्यायला पाणी दे.” एखाद्याशी बोलायला सुरुवात करायची ही एक चांगली पद्धत होती असं आपण का म्हणू शकतो?

येशूकडून आपण काय शिकतो?

२. आपण जर समोरच्या व्यक्‍तीच्या आवडत्या विषयावर बोलायला सुरुवात केली, तर खूप चांगली चर्चा होऊ शकते.

येशूने केलं तसं करा

३. वेगळ्या विषयावर बोलायला तयार असा. तुम्ही  एखाद्या विशिष्ट विषयावर बोलायचं ठरवलं असेल. पण त्याच विषयाला धरून बसू नका; तर सध्या लोक  जास्तकरून ज्या विषयावर बोलत आहेत तो विषय घेऊन सुरुवात करा. स्वतःला विचारा:

  1.   क. ‘आजकाल बातम्या कशाबद्दल आहेत?’

  2.  ख. ‘आजूबाजूचे, कामावरचे किंवा शाळा-कॉलेजमध्ये जाणारे सध्या कोणत्या विषयावर बोलत आहेत?’

४. पाहा, लक्ष द्या. स्वतःला विचारा:

  1.   क. ‘समोरची व्यक्‍ती काय करत आहे? ती कशाबद्दल विचार करत असेल?’

  2.  ख. ‘तिचे कपडे, दिसणं किंवा घर यांवरून काय कळतं? ती मुळात कुठून आहे किंवा कोणत्या धर्माची आहे?’

  3.  ग. ‘तिच्याशी बोलायची ही योग्य वेळ आहे का?’

५. ऐका.

  1.   क. स्वतःच बोलू नका.

  2.  ख. समोरच्याला जास्त बोलू द्या. गरज असेल, तर प्रश्‍न विचारा.