व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संभाषण सुरू करण्यासाठी

धडा २

स्वाभाविकपणे बोला

स्वाभाविकपणे बोला

तत्त्व:  “योग्य वेळी बोललेला शब्द किती चांगला असतो!”​—नीति. १५:२३.

फिलिप्पने काय केलं?

१. व्हिडिओ पाहा किंवा प्रेषितांची कार्यं ८:३०, ३१ वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  1.   क. फिलिप्पने बोलायला कशी सुरुवात केली?

  2.  ख. स्वाभाविकपणे बोलणं सुरू करायची आणि शास्त्रवचनांतून काहीतरी नवीन शिकवायची ही एक चांगली पद्धत का होती?

फिलिप्पकडून आपण काय शिकतो?

२. बोलण्याच्या ओघात आपण जर चर्चा सहज पुढे जाऊ दिली, तर समोरची व्यक्‍ती आपल्याशी आरामात बोलेल आणि आपला संदेश ऐकायला तयार असेल.

फिलिप्पने केलं तसं करा

३. पाहा, लक्ष द्या. एखाद्याच्या चेहऱ्‍यावरून किंवा हावभावांवरून आपल्याला बरंच काही समजू शकतं. समोरचा बोलायला तयार होईल असं वाटतं का? बायबलमधलं काहीतरी सांगण्यासाठी तुम्ही त्याला असा एक साधासा प्रश्‍न विचारू शकता: “तुम्हाला माहितीए . . . ?” पण जर त्याला बोलायची इच्छा नसेल, तर त्याला उगाच बोलायची बळजबरी करू नका.

४. धीर धरा. बायबलमधूल लगेचच काहीतरी सांगितलं पाहिजे असा विचार करू नका. योग्य वेळेची वाट पाहा. बोलता-बोलता विषय सहज बायबलच्या सत्याकडे वळवा. पहिल्याच भेटीत हे कदाचित शक्य होणार नाही; त्यासाठी तुम्हाला पुढच्या भेटीपर्यंतही वाट पाहावी लागेल.

५. विषयाशी जुळवून घ्या. तुम्ही कदाचित एका विशिष्ट विषयावर बोलायचं ठरवलं असेल. पण बोलता-बोलता समोरची व्यक्‍ती कदाचित वेगळाच विषय काढेल. अशा वेळी त्या बदललेल्या विषयाला धरून  काहीतरी बोलायला तयार असा.