व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संभाषण सुरू करण्यासाठी

धडा ३

दयाळूपणे वागा

दयाळूपणे वागा

तत्त्व:  ‘प्रेम दयाळू असतं.’​—१ करिंथ. १३:४.

येशूने काय केलं?

१. व्हिडिओ पाहा किंवा योहान ९:१-७ वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  1.   क. येशूने आधी काय केलं, आंधळ्या माणसाला बरं केलं की त्याला साक्ष दिली?—योहान ९:३५-३८ पाहा.

  2.  ख. तो माणूस आनंदाचा संदेश लगेच ऐकायला तयार का झाला असेल?

येशूकडून आपण काय शिकतो?

२. आपल्याला समोरच्याची काळजी आहे हे त्याला जाणवलं, तर तो आपला संदेश ऐकून घ्यायची शक्यता जास्त आहे.

येशूने केलं तसं करा

३. समोरच्याला समजून घ्या. तुम्ही त्याच्या जागी असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं याचा विचार करा.

  1.   क. स्वतःला विचारा: ‘त्याला कशाची चिंता असेल? त्याला कशामुळे सांत्वन मिळेल किंवा काय ऐकल्याने त्याला बरं वाटेल?’ यांवर विचार केल्यामुळे तुम्हाला अगदी मनापासून त्याच्याशी दयाळूपणे वागता येईल.

  2.  ख. समोरच्याचं लक्ष देऊन ऐका. असं केल्यामुळे त्याच्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही मनापासून ऐकत आहात हे त्याला जाणवेल. त्याला काय वाटतं किंवा त्याने एखाद्या समस्येबद्दल सांगितलं तर विषय बदलू नका.

४. दयाळूपणे आणि आदराने बोला. तुम्हाला जर समोरच्याबद्दल सहानुभूती वाटत असेल आणि त्याला मनापासून मदत करावीशी वाटत असेल, तरच तुमच्या बोलण्यातून त्याला ते जाणवेल. म्हणून तुम्ही काय बोलता आणि कसं बोलता याचा नीट विचार करा. त्याला वाईट वाटेल असं काहीही बोलू नका.

५. मदत करा. व्यावहारिक मार्गाने समोरच्याला योग्य ती मदत कशी करता येईल याची संधी शोधा. दयाळूपणे वागल्यामुळे एका चांगल्या संभाषणाची सुरुवात व्हायला मदत होऊ शकते.