व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संभाषण सुरू करण्यासाठी

धडा ४

नम्रपणे वागा

नम्रपणे वागा

तत्त्व:  “नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.”​—फिलिप्पै. २:३.

पौलने काय केलं?

१. व्हिडिओ पाहा किंवा प्रेषितांची कार्यं २६:२, ३ वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  1.   क. अग्रिप्पा राजासोबत बोलताना पौलने नम्रता कशी दाखवली?

  2.  ख. पौलने स्वतःकडे लक्ष वेधण्याऐवजी यहोवा आणि शास्त्रवचनांकडे कसं लक्ष वेधलं?​—प्रेषितांची कार्यं २६:२२ पाहा.

पौलकडून आपण काय शिकतो?

२. आपण जेव्हा नम्रपणे आणि आदराने संदेश सांगतो तेव्हा लोकांना तो जास्त ऐकायला आवडतो.

पौलने केलं तसं करा

३. स्वतःला श्रेष्ठ समजू नका. आपल्यालाच सगळं माहीत आहे आणि समोरच्याला काहीच माहीत नाही असं वागू नका. उलट त्याच्याशी आदराने बोला.

४. तुम्ही जे काही सांगत आहात ते बायबलमधून आहे हे स्पष्टपणे सांगा. देवाचं वचन एखाद्याच्या विचारांवर आणि भावनांवर प्रभाव पाडू शकतं. म्हणून बायबलचा उपयोग करा. त्यामुळे तुम्ही जे शिकवता ते बायबलमधून आहे हे त्यांना कळेल. आणि त्यावरचा त्यांचा विश्‍वास वाढेल.

५. शांतपणे बोला. आपलाच मुद्दा बरोबर आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करू नका. आपल्याला वाद घालायचा नाही. त्याऐवजी आपण शांत राहिलं पाहिजे आणि वाद सुरू होण्याआधीच तिथून निघून गेलं पाहिजे. असं करून आपण नम्रता दाखवतो. (नीति. १७:१४; तीत ३:२) शांतपणे बोलल्यामुळे पुढच्या वेळी ती व्यक्‍ती कदाचित आनंदाचा संदेश ऐकायला तयारही होईल.