व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संभाषण सुरू करण्यासाठी

धडा ५

समजूतदारपणे वागा

समजूतदारपणे वागा

तत्त्व:  ‘तुम्ही उत्तर देण्यासाठी नेहमी तयार राहा, पण सौम्यतेने आणि मनापासून आदर दाखवून असं करा.’​—१ पेत्र ३:१५.

पौलने काय केलं?

१. व्हिडिओ पाहा किंवा प्रेषितांची कार्यं १७:२२, २३ वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  1.   क. अथेन्समधल्या खोट्या धार्मिक प्रथा पाहून पौलला कसं वाटलं?​—प्रेषितांची कार्यं १७:१६ पाहा.

  2.  ख. अथेन्सच्या लोकांना चुकीचं ठरवण्याऐवजी, पौलने त्यांच्याच धार्मिक विश्‍वासांचा आधार घेऊन समजूतदारपणे आनंदाचा संदेश कसा सांगितला?

पौलकडून आपण काय शिकतो?

२. लोकांशी काय, कसं आणि कधी बोलायचं याचा जर आपण व्यवस्थित विचार केला, तर ते आपलं ऐकण्याची जास्त शक्यता आहे.

पौलने केलं तसं करा

३. विचार करून बोला. उदाहरणार्थ, तुम्ही एका ख्रिश्‍चन नसलेल्या व्यक्‍तीशी बोलत असाल, तर अशा वेळी तुम्ही काय बोलून ‘बायबल’ किंवा ‘येशू’ यांचा उल्लेख करणार आहात याचा विचार करा.

४. समोरच्याचं बोलणं मधेच तोडू नका. समोरच्याला मनमोकळेपणे बोलू द्या. बायबल शिकवणींच्या विरोधात तो काही बोलला तर लगेच वाद घालू नका. (याको. १:१९) तुम्ही जर त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकलं, तर तो नेमकं असं का बोलतोय आणि त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तुम्हाला समजेल.​—नीति. २०:५.

५. शक्य तिथे सहमत व्हा आणि प्रशंसा करा. समोरच्याची कदाचित त्याच्या धार्मिक विश्‍वासांवर मनापासून आस्था असेल. म्हणून सुरुवातीला तुम्ही दोघं कोणत्या विषयावर सहमत आहात ते पाहा. आणि त्याबद्दल त्याची प्रशंसा करा. मग हळूहळू बायबल नेमकं काय शिकवतं ते समजायला त्याला मदत करा.