व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संभाषण सुरू करण्यासाठी

धडा ६

धैर्य दाखवा

धैर्य दाखवा

तत्त्व:  ‘तुम्हाला आनंदाचा संदेश सांगण्यासाठी आम्ही आमच्या देवाच्या मदतीने धैर्य एकवटलं.’​—१ थेस्सलनी. २:२.

येशूने काय केलं?

१. व्हिडिओ पाहा किंवा लूक १९:१-७ वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  1.   क. काही लोक जक्कयपासून चार हात लांब का राहायचे?

  2.  ख. असं असलं तरी येशूने त्याला आनंदाचा संदेश का सांगितला?

आपण येशूकडून काय शिकतो?

२. कोणताही भेदभाव न करता आनंदाचा संदेश सांगण्यासाठी आपल्याला धैर्याची गरज आहे.

येशूने केलं तसं करा

३. यहोवावर भरवसा ठेवा. पवित्र शक्‍तीमुळे येशूने धैर्याने प्रचार केला. तुम्हालाही यहोवा तसंच धैर्य देऊ शकतो. (मत्त. १०:१९, २०; लूक ४:१८) आपल्याला ज्यांची भीती वाटते त्यांना प्रचार करण्यासाठी यहोवाकडे धैर्य मागा.​—प्रे. कार्यं ४:२९.

४. लोकांबद्दल आधीच मत बनवू नका. काही लोकांचं दिसणं, समाजातलं स्थान, धनसंपत्ती, धार्मिक विश्‍वास यांमुळे आपण त्यांच्याशी बोलायला कचरू शकतो. पण लक्षात ठेवा:

  1.   क. लोकांच्या मनात काय चाललंय हे यहोवा आणि येशू ओळखू शकतात, आपण नाही.

  2.  ख. यहोवा कोणत्याही प्रकारच्या व्यक्‍तीला त्याच्याकडे आकर्षित करू शकतो.

५. धैर्याने, पण आदराने आणि विचार करून बोला. (मत्त. १०:१६) वाद घालायचं टाळा. समोरच्याला जर आनंदाचा संदेश ऐकायची इच्छा नसेल किंवा तुम्हाला असुरक्षित वाटत असेल, तर आदराने संभाषण तिथेच थांबवा.​—नीति. १७:१४.