व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पुन्हा भेटण्यासाठी

धडा ८

धीर धरा

धीर धरा

तत्त्व:  ‘प्रेम सगळ्या बाबतींत धीर धरतं.’​—१ करिंथ. १३:७.

येशूने काय केलं?

१. व्हिडिओ पाहा किंवा योहान ७:३-५ आणि १ करिंथकर १५:३, ४, वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  1.   क. सुरुवातीला येशूच्या भावांनी त्याचा संदेश ऐकला का?

  2.  ख. येशू त्याच्या भावाला, याकोबला मदत करत राहिला हे कशावरून दिसतं?

येशूकडून आपण काय शिकतो?

२. काही लोक आनंदाच्या संदेशावर लगेच विश्‍वास ठेवतात, तर काहींना वेळ लागतो. त्यामुळे आपण धीर धरला पाहिजे.

येशूने केलं तसं करा

३. वेगळी पद्धत वापरून पाहा. एखादी व्यक्‍ती बायबल अभ्यासासाठी लगेच तयार झाली नाही तर तिला बळजबरी करू नका. बायबल अभ्यास कसा चालवला जातो आणि त्याचा कसा फायदा होतो हे समजावून सांगण्यासाठी योग्य वेळ पाहून, काही व्हिडिओ किंवा लेख दाखवा.

४. तुलना करू नका. प्रत्येक व्यक्‍ती वेगळी असते. आपला नातेवाईक किंवा पुनर्भेट केलेली एखादी व्यक्‍ती जर बायबल अभ्यास करायला कचरत असेल किंवा बायबलची एखादी शिकवण मान्य करायला तिला कठीण जात असेल, तर त्यामागचं कारण काय हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. एखादी धार्मिक शिकवण तिच्यासाठी खूप महत्त्वाची असल्यामुळे ती अभ्यास करायला मागेपुढे पाहत असेल का? नातेवाइकांच्या किंवा आजूबाजूच्या लोकांच्या भीतीमुळे ती कचरत असेल का? तुम्ही जे सांगता त्यावर विचार करायला आणि बायबल जे शिकवतं ते किती मोलाचं आहे हे समजायला तिला पुरेसा वेळ द्या.

५. आवड दाखवलेल्या व्यक्‍तीसाठी प्रार्थना करा. त्या व्यक्‍तीच्या बाबतीत आशा सोडू नका. तसंच तिच्याशी नेहमी विचार करून बोलायला आणि समजूतदारपणे वागायला यहोवाकडे मदत मागा. एखाद्या व्यक्‍तीला आवड नसेल तर ते ओळखायला आणि तिच्याकडे जाणं कधी बंद करायचं हे समजायला यहोवाकडे समजबुद्धी मागा.​—१ करिंथ. ९:२६.