व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पुन्हा भेटण्यासाठी

धडा ९

सहानुभूती दाखवा

सहानुभूती दाखवा

तत्त्व:  “आनंद साजरा करणाऱ्‍यांसोबत आनंद साजरा करा; रडणाऱ्‍यांसोबत रडा.”​—रोम. १२:१५.

येशूने काय केलं?

१. व्हिडिओ पाहा किंवा मार्क ६:३०-३४ वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  1.   क. येशू आणि प्रेषितांना “एकांत” का हवा होता?

  2.  ख. येशू लोकांच्या समुदायाला शिकवायला कशामुळे तयार झाला?

येशूकडून आपण काय शिकतो?

२. सहानुभूती असल्यामुळे आपण फक्‍त संदेश सांगण्यावरच भर देणार नाही, तर लोकांचाही विचार करू.

येशूने केलं तसं करा

३. लक्ष देऊन ऐका. समोरच्याला मनमोकळेपणाने बोलू द्या. त्याचं बोलणं मधेच तोडू नका. जर तो त्याच्या चिंता, भावना किंवा वेगळं मत मांडत असेल तर दुर्लक्ष करू नका. लक्ष देऊन ऐकल्यामुळे त्याला जाणवेल की त्याचे विचार तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत.

४. समोरच्याचा विचार करा. आतापर्यंत त्याच्यासोबत झालेली चर्चा लक्षात ठेवून स्वतःला विचारा:

  1.   क. ‘त्याला सत्य का माहीत झालं पाहिजे?’

  2.  ख. ‘बायबलचा अभ्यास केल्यामुळे त्याचं सध्याचं जीवन आणि भविष्य कसं चांगलं होऊ शकतं?’

५. समोरच्या व्यक्‍तीच्या गरजेनुसार माहिती द्या. बायबल अभ्यासामुळे समोरच्याला त्याच्या प्रश्‍नांची उत्तरं कशी मिळू शकतात हे शक्य तितक्या लवकर सांगायचा प्रयत्न करा. तसंच प्रत्येक बाबतीत व्यावहारिक सल्ले कसे मिळू शकतात हेही सांगा.