व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शिष्य बनवण्यासाठी

धडा ११

सोप्या पद्धतीने शिकवा

सोप्या पद्धतीने शिकवा

तत्त्व:  “जर तुम्ही सहज समजेल अशा भाषेत बोलला नाहीत, तर तुम्ही काय म्हणत आहात हे कोणाला कसं कळेल?”​—१ करिंथ. १४:९.

येशूने काय केलं?

१. व्हिडिओ पाहा किंवा मत्तय ६:२५-२७ वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  1.   क. यहोवाला आपली काळजी आहे हे येशूने उदाहरणातून कसं शिकवलं?

  2.  ख. येशूला पक्ष्यांबद्दल बरंच काही माहीत होतं. पण तरी त्याने कोणत्या एका साध्याशा गोष्टीकडे लोकांचं लक्ष वेधलं? आणि शिकवण्याची ही पद्धत चांगली होती असं का म्हणता येईल?

आपण येशूकडून काय शिकतो?

२. आपण जेव्हा सहज आणि सोप्या पद्धतीने शिकवतो, तेव्हा ते लोकांच्या मनापर्यंत पोहोचतं आणि त्यांच्या लक्षात राहतं.

येशूने केलं तसं करा

३. जास्त बोलू नका. एखाद्या विषयाबद्दल आपल्याला बरंच काही माहीत असेल. पण प्रकाशनातल्या माहितीवरच चर्चा करा. प्रश्‍न विचारल्यावर विद्यार्थ्याने उत्तर देऊपर्यंत थोडं थांबा. त्याला कदाचित उत्तर माहीत नसेल किंवा तो बायबल शिकवणींच्या विरोधात असलेलं मत सांगेल. अशा वेळी योग्य उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी छोटे-छोटे प्रश्‍न विचारा. एकदा का बायबल विद्यार्थ्याला मुख्य मुद्दा समजला की लगेच पुढच्या मुद्द्‌याकडे वळा.

४. नवीन गोष्टी, आत्तापर्यंत शिकलेल्या गोष्टींशी जोडायला विद्यार्थ्याला मदत करा. उदाहरणार्थ, पुनरुत्थानाचा धडा सुरू करण्याआधी मेलेल्यांच्या स्थितीबद्दल विद्यार्थी जे बायबलमधून शिकलाय त्यावर तुम्ही थोडक्यात उजळणी करू शकता.

५. विचार करून उदाहरणं वापरा. उदाहरण देण्याआधी स्वतःला विचारा:

  1.   क. ‘हे उदाहरण सोपं आहे का?’

  2.  ख. ‘विद्यार्थ्याला हे लगेच समजेल का?’

  3.  ग. ‘विद्यार्थ्याला फक्‍त उदाहरण नाही, तर मुख्य मुद्दाही लक्षात राहील का?’