व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शिष्य बनवण्यासाठी

धडा १२

स्पष्टपणे सल्ला द्या

स्पष्टपणे सल्ला द्या

तत्त्व:  “तेल आणि धूप यांमुळे जसा मनाला आनंद होतो, तसाच प्रामाणिक सल्ल्याने जुळलेल्या मैत्रीच्या गोड नात्यानेही होतो.”​—नीति. २७:९.

येशूने काय केलं?

१. व्हिडिओ पाहा किंवा मार्क १०:१७-२२ वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  1.    येशूने त्या श्रीमंत तरुण अधिकाऱ्‍यामध्ये कोणते चांगले गुण पाहिले असतील?

  2.   त्या माणसाला सल्ला देण्यासाठी येशूला त्याच्याशी स्पष्टपणे बोलण्याची गरज का होती? आणि यावरून येशूचं प्रेम कसं दिसून येतं?

आपण येशूकडून काय शिकतो?

२. बायबल विद्यार्थ्यांनी प्रगती करण्यासाठी आपण त्यांच्याशी प्रेमाने बोललं पाहिजे. पण गरज पडली तर त्यांना स्पष्टपणे सल्लाही दिला पाहिजे.

येशूने केलं तसं करा

३. विद्यार्थ्याला ध्येयं ठेवण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी मदत करा.

  1.   क. कायम जीवनाचा आनंद घ्या!  याच्या प्रत्येक धड्यातल्या “ध्येय” या भागाचा उपयोग करा.

  2.  ख. विद्यार्थ्याला छोटी आणि मोठी ध्येयं नेमकी कशी गाठता येतील हे समजायला मदत करा.

  3.  ग. विद्यार्थी प्रगती करत असताना वेळोवेळी त्याचं कौतुक करा.

४. विद्यार्थ्याच्या प्रगतीत कोणते अडथळे येतात ते ओळखा आणि त्यांवर मात करायला त्याला मदत करा.

  1.   क. स्वतःला विचारा:

    • ‘कोणती गोष्ट माझ्या विद्यार्थ्याला बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करायला रोखत आहे?’

    • ‘मी त्याला नेमकी कशी मदत करू शकतो?’

  2.  ख. विद्यार्थ्याला काय करायची गरज आहे हे स्पष्टपणे आणि प्रेमळपणे सांगता यावं यासाठी प्रार्थनेत हिंमत मागा.

५. प्रगती करत नसलेले अभ्यास बंद करा.

  1.   क. बायबल विद्यार्थी प्रगती करत आहे का हे ओळखण्यासाठी स्वतःला विचारा:

    • ‘शिकलेल्या गोष्टींप्रमाणे माझा विद्यार्थी बदल करत आहे का?’

    • ‘तो सभांना येतो का आणि सत्याबद्दल इतरांना सांगतो का?’

    • ‘बऱ्‍याच काळापासून त्याचा अभ्यास चालू असेल, तर त्याला आता यहोवाचा साक्षीदार बनायची इच्छा आहे का?’

  2.  ख. जर बायबल विद्यार्थी प्रगती करत नसेल तर:

    • कोणती गोष्ट त्याला पाऊल उचलायला रोखत आहे यावर त्याला विचार करायला सांगा.

    • तुम्ही त्याच्यासोबत अभ्यास का बंद करत आहात हे त्याला प्रेमळपणे सांगा.

    • पुन्हा अभ्यास सुरू करायचा असेल तर त्याने आधी कोणती पावलं उचलली पाहिजेत हे त्याला सांगा.